सॉफ्टवेअर इंजिनिअर्ससाठी धोक्याची घंटा! ओपन एआयचा कोडिंग, डीबगिंग करणारा कोडेक्स AI लाँच झाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2025 09:18 IST2025-05-18T09:17:36+5:302025-05-18T09:18:17+5:30

Job Alert IT Employees: सॉफ्टवेअर इंजिनिअर्ससाठी ही धोक्याची घंटा असून कोडिंग एका फटक्यात करणारे कोडेक्स (Codex) टूल लाँच केले आहे.

Job Alert IT Employees: Warning bell for software engineers! Codex AI, a coding and debugging tool for open AI, launched | सॉफ्टवेअर इंजिनिअर्ससाठी धोक्याची घंटा! ओपन एआयचा कोडिंग, डीबगिंग करणारा कोडेक्स AI लाँच झाला

सॉफ्टवेअर इंजिनिअर्ससाठी धोक्याची घंटा! ओपन एआयचा कोडिंग, डीबगिंग करणारा कोडेक्स AI लाँच झाला

आर्टिफिशिअल इंटेलिजन्समध्ये खळबळ उडवून देणारी कंपनी ओपन एआयने शुक्रवारी आयटी क्षेत्रात भूकंप घडविला आहे. सॉफ्टवेअर इंजिनिअर्ससाठी ही धोक्याची घंटा असून कोडिंग एका फटक्यात करणारे कोडेक्स (Codex) टूल लाँच केले आहे. यामुळे कंपन्यांचे सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटचे काम झटक्यात होणार असून सॉफ्टवेअर इंजिनिअर्सच्या नोकरीवर गदा येणार आहे. 

चॅटजीपीटी प्रो, एंटरप्राइझ आणि टीम सबस्क्राइबर्ससाठी हे कोडेक्स उपलब्ध करण्यात आले आहे. कोडेक्स हा क्लाउडवर चालत असून अभियंत्यांसाठी "व्हर्च्युअल कोवर्कर" म्हणून काम करणार आहे. वेगाने कोड लिहिण्यास, बग्स दुरुस्त करण्यास मदत करू शकणार आहे. ओपनएआयचे सीईओ सॅम ऑल्टमन यांनी सोशल मीडियावर या कोडेक्सची घोषणा केली आहे. 

ऑल्टमन यांनी दिलेल्या माहितीनुसार कोडेक्स हा एक सॉफ्टवेअर अभियांत्रिकी एजंट आहे, जो एकाचवेळी अनेक प्रकारची कामे समांतररित्या करू शकतो. बग दुरुस्त करणे, कोडिंग करणे आदी कामे तुम्ही यावर करू शकता. महत्वाची बाब म्हणजे कामाच्या जटीलतेनुसार कोडेक्सला १ ते ३० मिनिटे लागू शकतात. म्हणजेच एक, दोन दिवसाचे काम कोडेक्स अर्ध्या तासाच्या आत करू शकतो. 

कोडेक्स कसा वापराल...

युजरला कोडेक्स वापरण्यासाठी ChatGPT वरील साइडबारवर जावे लागेल. प्रॉम्प्ट एंटर करून आणि 'कोड' वर क्लिक करून एआय एजंटला एक नवीन कोडिंग टास्क द्यावी लागेल. 

कोडेक्स काम करत असताना इंटरनेट अॅक्सेस काढून बंद केला जातो. कोडेक्स एजंट केवळ GitHub रिपॉझिटरीजद्वारे स्पष्टपणे प्रदान केलेल्या कोडपर्यंत मर्यादित राहतो. 

दिलेले काम पूर्ण झाले की कोडेक्स टर्मिनल लॉगद्वारे त्याने काय काय काम केले याची माहिती, पुराव्यांसह देतो. 

जर अडचण आली किंवा काही बग येत असेल तर त्याची माहिती त्वरीत युजरला दिली जाते, जेणेकरून युजर त्यानुसार पुढील निर्णय घेऊ शकतो. 

एआय जागा घेऊ लागला...

गुगल आणि मायक्रोसॉफ्ट सारख्या तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज कंपन्यांच्या सीईओंनी आता ३० टक्के कोडिंग एआय करत असल्याचे म्हटलेले आहे. कोडेक्समुळे ही गती आणखी वाढू शकते. 

Web Title: Job Alert IT Employees: Warning bell for software engineers! Codex AI, a coding and debugging tool for open AI, launched

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.