जिओची शानदार ऑफर! स्वस्तात मिळतोय JioPhone Next, तम्ही 209 रुपयांच्या EMI वरही खरेदी करू शकता

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2022 03:45 PM2022-06-29T15:45:25+5:302022-06-29T15:46:02+5:30

jiophone next discount offer : तुम्ही Amazon वरून Jio चा स्मार्टफोन 4449 रुपयांच्या किंमतीत खरेदी करू शकता.

jiophone next discount offer on amazon check details | जिओची शानदार ऑफर! स्वस्तात मिळतोय JioPhone Next, तम्ही 209 रुपयांच्या EMI वरही खरेदी करू शकता

जिओची शानदार ऑफर! स्वस्तात मिळतोय JioPhone Next, तम्ही 209 रुपयांच्या EMI वरही खरेदी करू शकता

googlenewsNext

नवी दिल्ली : जिओने (Jio) आपला पहिला जिओ फोन लॉन्च केला, तेव्हा खरेदीदारांची रांग लागली होती. मात्र, जिओ फोन -2(Jio Phone 2) ला म्हणावे तितके यश मिळाले नाही. यानंतर कंपनीने जिओ फोन नेक्स्ट (JioPhone Next) लॉन्च केला, यामुळे ब्रँडला खूप आशा वाटत होत्या. मात्र, या फोनकडे सुद्धा लोकांनी विशेष लक्ष दिले नाही. 

आता हा फोन सवलतीत उपलब्ध आहे आणि तुमच्या बजेटमध्ये एक चांगला पर्याय आहे. दरम्यान, पहिल्या जिओ फोननंतर लोकांना अपेक्षा होती की जिओचा स्मार्टफोन खूपच कमी किंमतीत येईल. मात्र, असे झाले नाही आणि लोकांनी या फोनवर जास्त लक्ष केंद्रित केले नाही. दरम्यान, आता हा फोन डिस्काउंटनंतर 4,449 रुपयांना मिळत आहे, जी चांगली गोष्ट आहे. तुम्ही ते EMI वर देखील खरेदी करू शकता.

तुम्ही Amazon वरून Jio चा स्मार्टफोन 4449 रुपयांच्या किंमतीत खरेदी करू शकता. हा स्मार्टफोन 6,499 रुपये किमतीत लॉन्च करण्यात आला होता. मात्र, जिओ हा डिवाइस एक्सचेंज ऑफरवर 4,499 रुपयांना विकत आहे. तुम्हाला Amazon वर एक्सचेंज ऑफरची गरज नाही. ही एक चांगली डील आहे कारण तुम्ही हा फोन 5000 पेक्षा कमी किमतीत खरेदी करू शकता. हा फोन Amazon वर 209 रुपयांच्या EMI वर देखील उपलब्ध आहे.

काय आहे फीचर्स?
हा स्मार्टफोन Qualcomm Snapdragon 215 प्रोसेसरसह येतो. यात 2GB रॅम आणि 32GB इंटरनल स्टोरेज आहे. हँडसेट Android वर बेस्ड Pragati OS वर काम करतो. ही ऑपरेटिंग सिस्टीम खास भारतीय वापरकर्त्यांना लक्षात घेऊन तयार करण्यात आली आहे. यात 3500mAh बॅटरी आहे. ऑप्टिक्सबद्दल बोलायचे झाले तर, यात सिंगल रियर कॅमेरा आहे, जो 13MP चा आहे. समोर कंपनीने 8MP सेल्फी कॅमेरा दिला आहे. तसेच, फोन कॅरियर लॉकसह येतो. म्हणजेच या फोनमध्ये तुम्ही इतर कोणत्याही टेलिकॉम कंपनीचे सिमकार्ड वापरू शकणार नाही.
 

Web Title: jiophone next discount offer on amazon check details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.