शहरं
Join us  
Trending Stories
1
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
2
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
3
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
4
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
5
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
6
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
7
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
8
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
9
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
10
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
11
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
12
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
13
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
14
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
15
दहशतवादी प्रकरणांतील फरारी गुन्हेगारांना परत आणण्यासाठी उपाययोजना करा: अमित शाह
16
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?
17
शाळेतील सुरक्षा उपायांचे ऑडिट आता अनिवार्य; केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना दिले आदेश
18
वादग्रस्त न्यायाधीश यशवंत वर्मांप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी
19
‘जन्माधारित नागरिकत्व’चा ट्रम्प यांचा निर्णय कोर्टाकडून स्थगित; अमेरिकेतील भारतीयांना दिलासा
20
थायलंड-कंबोडिया संघर्षात ३३ ठार, हजारो विस्थापित; पुरातन मंदिरावरून पेटला संघर्ष

जगातील सर्वात उंच युद्धभूमीवर आले 5G नेटवर्क; Reliance Jio ने केली मोठी कामगिरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2025 18:22 IST

Jio Tower on Siachen Glacier : या टॉवरमुळे भारतीय लष्कराची तांत्रिक क्षमता वाढेल, सैन्याला दळणवळणाच्या चांगल्या सुविधा मिळतील.

Jio Tower on Siachen Glacier : मुकेश अंबानी यांनी काही वर्षांपूर्वी भारतात टेलिकॉम क्रांती घडवली. त्यांच्या नेतृत्वाखालील रिलायन्स Jio ने आधी 4G आणि आता देशभरात 5G सेवा सुरू केली आहे. विशेष म्हणजे, आता कंपनीने जगातील सर्वात उंच्च युद्धक्षेत्रात आपली 5G सेवा सुरू केली आहे. रिलायन्सजिओ आणि भारतीय सैन्याने एकत्रितपणे जगातील सर्वात उंच युद्धभूमी असलेल्या सियाचीन ग्लेशियरवर पहिला 5G मोबाइल टॉवर यशस्वीरित्या स्थापित केला आहे.

सियाचीनमधील फॉरवर्ड पोस्टवर 5G टॉवर भारतीय लष्कराच्या 'फायर अँड फ्युरी' कॉर्प्सने 'एक्स'वर ही माहिती दिली. लष्कराच्या म्हणण्यानुसार, Jioआणि भारतीय लष्कराने एकत्रितपणे सियाचीन ग्लेशियरवर हा पहिला 5G मोबाइल टॉवर यशस्वीरित्या स्थापित केला आहे. सियाचीनमधील फॉरवर्ड पोस्टवर हा टॉवर तैनात करण्यात आला आहे. 15 जानेवारीला आर्मी डेच्या आधी सियाचीन ग्लेशियरवर 4G आणि 5G सेवा सुरू करून Jio ने ही अभूतपूर्व कामगिरी केली आहे. सियाचीन ग्लेशियरवर सेवा सुरू करणारी जिओ देशातील पहिली ऑपरेटर ठरली आहे. 

टॉवर उभारणीत अनेक आव्हानेएवढ्या उंचीवर टॉवर उभारणे अत्यंत अवघड होते. लष्कराने लॉजिस्टिकसह क्रू मेंबर्सची सुरक्षा सुनिश्चित केली. त्यामुळे जिओने त्याचे स्वदेशी फुल-स्टॅक 5G तंत्रज्ञान वापरले. फायर अँड फ्युरी सिग्नलर्स आणि सियाचीन वॉरियर्सने जिओ टीमसह उत्तर ग्लेशियरमध्ये 5G टॉवर स्थापित केले. विशेष म्हणजे, या भागातील तापमान -40 डिग्री सेल्सियस पर्यंत घसरते. थंड वारे आणि बर्फाचे वादळे येथे वारंवार येतात. अशा परिस्थितीत या टॉवर उभारणीचे काम पूर्ण केले.

या टॉवरमुळे भारतीय लष्कराची तांत्रिक क्षमता आणखी वाढेल आणि सैन्याला दळणवळणाच्या चांगल्या सुविधा उपलब्ध होतील, असे लष्कराने म्हटले आहे. 5G कनेक्टिव्हिटीद्वारे, सैनिकांना जलद आणि अधिक विश्वासार्ह दळणवळण सुविधा मिळतील.

टॅग्स :JioजिओRelianceरिलायन्सIndian Armyभारतीय जवानSiachenसियाचिन