नवीन वर्ष सुरु होण्यापूर्वी रिलायन्स जिओने आपल्या प्रीपेड ग्राहकांसाठी एक 'सुपर सेलिब्रेशन' प्लॅन लाँच केला आहे. केवळ ₹५०० किंमतीच्या या मासिक रिचार्ज प्लॅनमध्ये ग्राहकांना डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि एका डझनहून अधिक OTT प्लॅटफॉर्म्सचा अॅक्सेस तर मिळणार आहे.या बरोबरच तब्बल ₹३५,१०० किंमतीचे १८ महिन्यांसाठीचे Google Gemini Pro AI चे सबस्क्रिप्शन पूर्णपणे मोफत मिळणार आहे.
जिओच्या या नव्या घोषणेने दूरसंचार क्षेत्रात खळबळ उडाली असून, कंपनीने कनेक्टिव्हिटीसोबतच आर्टिफिशियल इंटेलिजन्स सेवांचे बंडल देण्याची नवीन रणनीती आणली आहे. एकीकडे रिचार्ज महाग होत असताना नेहमीच वेगळे काहीतरी देत नवा पायंडा पाडणाऱ्या जिओने आता एआय आणल्याने इतर कंपन्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे.
जिओने यासोबतच ₹३,५९९ चा वार्षिक प्लॅन आणि ₹१०३ चा फ्लेक्सी पॅक देखील लाँच केला आहे, ज्यात विविध डेटा आणि OTT सुविधा उपलब्ध आहेत. मात्र, ₹५०० चा प्लॅन त्याच्या प्रचंड OTT बंडल आणि गुगल जेमिनी प्रोच्या मोफत अॅक्सेसमुळे सर्वाधिक आकर्षक ठरत आहे.
५०० रुपयांच्या प्लॅनची वैधता ही २८ दिवसांची असणार आहे. याबरोबरच यूट्यूब प्रीमियम (YouTube Premium), जिओ हॉटस्टार, अमेझॉन प्राईम व्हिडीओ मोबाईल एडिशन, सोनी लिव, ZEE5, लायन्सगेट प्ले, डिस्कव्हरी+, सन NXT, फॅनकोड, होइचोई आणि इतर प्रादेशिक OTT सह एकूण १०+ प्लॅटफॉर्मचा अॅक्सेस दिला जाणार आहे. १८ महिन्यांसाठी Google Gemini Pro AI सबस्क्रिप्शन मोफत दिले जाणार आहे. यासाठी तुम्हाला दर महिन्याला ५०० रुपयांचे रिचार्ज मारावे लागणार आहे.