सर्व काही Unlimited! जिओच्या सर्वात स्वस्त प्लॅनमध्ये शानदार ऑफर्स, रिचार्जसाठी युजर्स उत्सुक
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2023 15:20 IST2023-01-09T15:20:18+5:302023-01-09T15:20:38+5:30
jio cheapest prepair recharge plan : या व्हॅलिडिटीसह ग्राहकांना या प्लॅनमध्ये 56 GB हायस्पीड इंटरनेट देखील मिळतो, जो व्हिडिओ प्ले करण्यासाठी आणि इंटरनेट सर्फिंगसाठी उपयुक्त आहे.

सर्व काही Unlimited! जिओच्या सर्वात स्वस्त प्लॅनमध्ये शानदार ऑफर्स, रिचार्जसाठी युजर्स उत्सुक
नवी दिल्ली : तुम्हाला अनलिमिटेड कॉलिंगचा आनंद घ्यायचा असेल, तोही देशात कुठेही...तर आज आम्ही तुमच्यासाठी जिओचा (Jio) सर्वात स्वस्त प्रीपेड रिचार्ज घेऊन आलो आहोत, जो तुमच्या बजेटमध्येच बसत नाही, तर सर्व फायदे देखील मिळतात, जे सामान्यतः महाग रिचार्जमध्ये दिसून येतात.
आज आम्ही तुम्हाला जिओच्या या प्लॅनच्या फिचर्सबद्दल सविस्तर सांगणार आहोत, जेणेकरुन तुम्हाला समजेल की हा प्लॅन तुमच्यासाठी कसा असणार आहे. आम्ही ज्या जिओच्या प्लॅनबद्दल बोलत आहोत, त्याची किंमत फक्त 299 रुपये आहे आणि यामध्ये ग्राहकांना एकापेक्षा जास्त बेनिफिट्स मिळतात. या प्लॅनमध्ये ग्राहकांना 28 दिवसांची व्हॅलिडिटी मिळते.
या व्हॅलिडिटीसह ग्राहकांना या प्लॅनमध्ये 56 GB हायस्पीड इंटरनेट देखील मिळतो, जो व्हिडिओ प्ले करण्यासाठी आणि इंटरनेट सर्फिंगसाठी उपयुक्त आहे. जर तुम्हाला असे वाटत असेल की बेनिफिट्स इथेच संपतात, तर तसे नाही. कारण या प्लॅनमध्ये तुम्हाला दररोज 2GB इंटरनेट, तसेच अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग मिळते, जे देशभरात कुठेही करता येते.
इतकेच नाही तर या प्लॅनचे बेनिफिट्स अद्याप बाकी आहेत, कारण यामध्ये तुम्हाला दररोज 100 एसएमएस देखील दिले जातात. याचबरोबर, कंपनी ग्राहकांच्या मनोरंजनाची देखील पूर्ण काळजी घेते आणि हे पाहता कंपनी Jio TV, Jio Cinema, Jio Security आणि Jio Cloud यासह आपल्या अनेक अॅप्सचे सबस्क्रिप्शन मोफत देत आहे.