Jio चा शानदार प्लॅन! Hotstar, Netflix आणि Amazon Prime मिळेल मोफत

By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2022 02:38 PM2022-04-07T14:38:26+5:302022-04-07T14:39:13+5:30

Jio : रिलायन्स जिओ 399 रुपयांच्या रिचार्जवर 75 जीबी हाय-स्पीड डेटा मिळतो. यासोबतच कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि 100 दिवसांसाठी दररोज 100 एसएमएस मोफत उपलब्ध आहेत

jio best postpaid plan recharge with 399 rupess and jio 599 rupees to get free amazon prime netflix for 1 year  | Jio चा शानदार प्लॅन! Hotstar, Netflix आणि Amazon Prime मिळेल मोफत

Jio चा शानदार प्लॅन! Hotstar, Netflix आणि Amazon Prime मिळेल मोफत

Next

नवी दिल्ली : दिग्गज दूरसंचार कंपनी रिलायन्स जिओ आपल्या युजर्ससाठी एकापेक्षा जास्त मोठे प्लॅन ऑफर करते. रिलायन्स जिओ 600 रुपयांपेक्षा कमी किमतीत शानदार पोस्टपेड प्लॅन ऑफर करत आहे, ज्यामध्ये हाय-स्पीड डेडासह OTT अॅप्सचा भरपूर आनंद घेता येतो. दरम्यान, अशाच एक प्लॅन आहे, ज्यामध्ये Disney Plus Hotstar, Netflix आणि Amazon Prime Video या तिन्ही OTT अॅप्सचा फायदा दिला जातो.

399 रुपयांचा प्लॅन
रिलायन्स जिओ 399 रुपयांच्या रिचार्जवर 75 जीबी हाय-स्पीड डेटा मिळतो. यासोबतच कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि 100 दिवसांसाठी दररोज 100 एसएमएस मोफत उपलब्ध आहेत. डेटा संपल्यानंतर, 10 रुपये प्रति जीबी शुल्क लागू होते. या प्लॅनमध्ये कंपनी 1 वर्षासाठी Disney + Hotstar, Amazon Prime Video आणि Netflix चा लाभ देते. याशिवाय Jio Tv, Jio Cinema यासह इतर Jio अॅप्सवर मोफत अॅक्सेस देखील मिळत आहे.

599 रुपयांचा प्लॅन
रिलायन्स जिओच्या 599 रुपयांच्या रिचार्जवर 100 GB हाय-स्पीड डेटा उपलब्ध आहे. यासोबतच कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएस पाठवण्याची सुविधा मोफत देण्यात आली आहे. यासोबतच या प्लॅनमध्ये 200 GB डेटा रोलओव्हर सुविधाही उपलब्ध आहे. या प्लॅनमध्ये कंपनी Disney + Hotstar, 1 वर्षासाठी Amazon Prime Video आणि Netflix चा लाभ देत आहे. याशिवाय Jio Tv, Jio Cinema यासह इतर Jio अॅप्सवर मोफत अॅक्सेस देखील मिळत आहे.

म्हणजेच, या दोन्ही प्लॅनमध्ये तुम्हाला Disney + Hotstar, Amazon Prime Video आणि Netflix मध्ये काहीही पाहायचे असेल, तर सबस्क्रिप्शन घेण्याची गरज नाही, आणि तुम्ही त्याचा मोफत आनंद घेऊ शकता.

Web Title: jio best postpaid plan recharge with 399 rupess and jio 599 rupees to get free amazon prime netflix for 1 year 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.