जिओचा फुल-ऑन एंटरटेनमेंट प्लॅन, फक्त १७५ रुपयांमध्ये डेटासह १० ओटीटी अॅप्स
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2025 12:04 IST2025-02-08T12:04:26+5:302025-02-08T12:04:36+5:30
Jio 175 Plan : जिओ सिनेमा प्रीमियमचे २८ दिवसांचे सबस्क्रिप्शन कूपन तुमच्या माय जिओ अकाउंटमध्ये जमा केले जाईल.

जिओचा फुल-ऑन एंटरटेनमेंट प्लॅन, फक्त १७५ रुपयांमध्ये डेटासह १० ओटीटी अॅप्स
Jio 175 Plan : ओटीटी (OTT) प्लॅटफॉर्मवर नवीन चित्रपट आणि वेब सिरीज पाहण्याची आवड असणाऱ्यांसाठी चांगली बातमी आहे. अशा एक प्लॅन आहे, तो फक्त १७५ रुपयांमध्ये डेटासह १० ओटीटी अॅप्सचा मोफत अॅक्सेस देतो. हा स्वस्त एंटरटेनमेंट प्लॅन रिलायन्स जिओकडे आहे. १७५ रुपयांमध्ये १० जीबी हाय स्पीड डेटासह, तुम्हाला सोनी लाईव्ह, झी ५, जिओसिनेमा प्रीमियम, लायन्सगेट प्ले, डिस्कव्हरी प्लस, सन नेक्स्ट, कांचा लंका, प्लॅनेट मराठी, चौपाल, होईचोई यांचा फ्री अॅक्सेस दिला जात आहे.
जिओचा १७५ रुपयांचा प्लॅन
जिओ सिनेमा प्रीमियमचे २८ दिवसांचे सबस्क्रिप्शन कूपन तुमच्या माय जिओ अकाउंटमध्ये जमा केले जाईल. उर्वरित अॅप्स तुम्ही जिओ टीव्ही मोबाईल अॅपद्वारे अॅक्सेस करू शकता. दरम्यान, लक्षात ठेवा की, हा एक OTT पॅक आहे, म्हणून या प्लॅनमध्ये कॉलिंग किंवा एसएमएसचा लाभ मिळणर नाही. रिलायन्स जिओचा हा १७५ रुपयांचा प्रीपेड प्लॅन २८ दिवसांच्या व्हॅलिडिटीसह येतो. म्हणजेच या प्लॅनमध्ये वरती नमूद केलेच्या १० ओटीटी अॅप्सचे फायदे २८ दिवसांसाठी घेऊ शकाल.
एअरटेलचा १८१ रुपयांचा प्लॅन
जिओ व्यतिरिक्त, एअरटेलकडेही असाच स्वस्त ओटीटी प्लॅन आहे.१८१ रुपयांच्या एअरटेल प्रीपेड प्लॅनमध्ये १५ जीबी हाय स्पीड डेटा व्यतिरिक्त २२ ओटीटी अॅप्सचा फायदा मिळतो. कंपनीच्या अधिकृत साइटवरील माहितीनुसार, युजर्स सोनी लाईव्ह, लायन्सगेट प्ले, आहा, चौपाल, होईचोई आणि सन नेक्स्ट सारख्या २२ ओटीटीचा लाभ घेऊ शकतील. तसेच, या एअरटेलच्या १८१ रुपयांच्या रिचार्ज प्लॅनसह, कंपनी ३० दिवसांची व्हॅलिडिटी देत आहे. याचा अर्थ असा की तुम्ही ३० दिवसांसाठी २२ ओटीटी अॅप्स आणि १५ जीबी हाय स्पीड डेटाचे फायदे घेऊ शकाल.