जगद्गुरू रामानंदाचार्य प्रवेशद्वाराचे लोकार्पण
By admin | Updated: August 19, 2015 22:27 IST
नाशिक : तपोवनात उभारण्यात आलेल्या साधुग्राममध्ये महापालिकेने कायमस्वरूपी उभारलेल्या जगद्गुरू रामानंदाचार्य प्रवेशद्वाराचे लोकार्पण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले.
जगद्गुरू रामानंदाचार्य प्रवेशद्वाराचे लोकार्पण
नाशिक : तपोवनात उभारण्यात आलेल्या साधुग्राममध्ये महापालिकेने कायमस्वरूपी उभारलेल्या जगद्गुरू रामानंदाचार्य प्रवेशद्वाराचे लोकार्पण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. तपोवनात सुमारे ३३५ एकर जागेवर साधुग्रामची उभारणी होत असतानाच दीड-दोन महिन्यांपूर्वी औरंगाबादरोड मार्गावरील संत जनार्दन स्वामी आश्रमालगत तात्पुरत्या स्वरूपात प्रवेशद्वार उभारण्याचा प्रस्ताव महापालिकेपुढे आला होता. परंतु, सदर प्रवेशद्वार कायमस्वरूपी उभारण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आणि त्यासाठी सुमारे एक कोटी रुपयांची तरतूद केली. सदर प्रवेशद्वाराचे संकल्पचित्र नाशिकच्या वास्तुविशारद अमृता पवार यांनी तयार केल्यानंतर महिनाभरात प्रवेशद्वार उभारणीचे काम पूर्ण करण्यात आले. चारही बाजूला दीपमाळेच्या स्वरूपात असलेल्या या प्रवेशद्वाराचे जगद्गुरु रामानंदाचार्य प्रवेशद्वार असे नामकरण करण्यात आले. या प्रवेशद्वाराचे लोकार्पण बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते अमृता पवार आणि मक्तेदार राहुल सूर्यवंशी यांचा सत्कार करण्यात आला. फोटो कॅप्शन- १९ पीएचअेयु १२५तपोवनातील साधुग्राममध्ये महापालिकेच्या वतीने उभारण्यात आलेल्या जगद्गुरू रामानंदाचार्य प्रवेशद्वाराचे लोकार्पण श्रीफळ वाढवून करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. समवेत डावीकडून दिल्लीतील खासदार महेश गिरी, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह, महंत ग्यानदास महाराज, हंसदेवाचार्य महाराज, नरेंद्राचार्य महाराज, आमदार बाळासाहेब सानप, महंत धरमदास, पालकमंत्री गिरीश महाजन, महंत रामकिशोरदास महाराज, खासदार हरिश्चंद्र चव्हाण, महंत भक्तिचरणदास आदि.