शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

ट्विटरच्या जन्मदात्याला पश्चात्ताप, जॅक डॉर्सी म्हणाले- मी सर्वांची माफी मागतो...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2022 14:54 IST

इलॉन मस्कने ट्विटर खरेदी करताच कारवाईचा धडाकाच सुरू केला आहे.

नवी दिल्ली:ट्विटर (Twitter) सध्या चांगलेच चर्चेत आहे, ते म्हणजे तेथील नियम आणि कारवायांमुळे. इलॉन मस्कने (Elon Musk) ट्विटर खरेदी करताच कारवाईचा धडाकाच सुरू केला आहे. अगदी ट्विटरचे सीईओ पराग अग्रवाल (Parag Agarawal) यांनाही नोकरी गमवावी लागली आहे. ट्विटरचा अनेकांना नोकरी सोडा, असा आदेशच आला आहे. यावर ट्विटरचे संस्थापक आणि माजी सीईओ जॅक डॉर्सी (Jack Dorsey) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

ज्या व्यक्तीने ट्विटरला जन्म दिला, त्यालाही आता मोठा पश्चात्ताप होऊ लागला आहे. विशेष म्हणजे, ट्विटरवरच त्यांनी नोकरी गमावलेल्या जगभरातील ट्विटर कर्मचाऱ्यांची माफी मागितली आहे. तुम्ही ज्या संकटातून जात आहात, त्याला मी जबाबदार आहे, असे म्हणत ट्विटरचे संस्थापक आणि माजी सीईओ जॅक डॉर्सी यांनी माफी मागितली.

शुक्रवारपासून ट्विटरचे नवे मालक इलॉन मस्क यांच्या आदेशानुसार, जवळपास ५० टक्के कर्मचाऱ्यांची कपात सुरू झाली. त्या पार्श्वभूमीवर, ‘ट्विटरचे आधीचे आणि सध्याचे कर्मचारी लोक कणखर आणि लवचिक आहेत. कितीही कठीण वेळ असली, तरीही त्यांना मार्ग सापडेल. अनेक जण माझ्यावर नाराज आहेत, याची कल्पना आहे. प्रत्येक जण ज्या परिस्थितीत आहे, त्याला मी जबाबदार आहे. मी कंपनी खूप लवकर मोठी केली. त्याबद्दल मी माफी मागतो,’ अशा आशयाचे ट्विट डॉर्सी यांनी केले.

टॅग्स :Twitterट्विटरelon muskएलन रीव्ह मस्क