itel Super Guru 4G फोन लाँच, किंमत 2 हजार रुपयांपेक्षा कमी, करू शकता UPI पेमेंट 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2024 10:33 AM2024-04-20T10:33:49+5:302024-04-20T10:34:48+5:30

itel Super Guru 4G : हा एक की-पॅड फीचर फोन आहे, ज्यामध्ये कॅमेरा देखील देण्यात आला आहे.

itel super guru 4g price in india launch with upi youtube support | itel Super Guru 4G फोन लाँच, किंमत 2 हजार रुपयांपेक्षा कमी, करू शकता UPI पेमेंट 

itel Super Guru 4G फोन लाँच, किंमत 2 हजार रुपयांपेक्षा कमी, करू शकता UPI पेमेंट 

नवी दिल्ली : मोबाईल फोन निर्माता कंपनी itel ने आपला नवीन फोन लाँच केला आहे. या फोनची किंमत 2 हजार रुपयांपेक्षा कमी आहे. हा ब्रँडने  लाँच केलेला 4G फीचर फोन आहे. कंपनीने itel Super Guru 4G फोन लाँच केला आहे, ज्यामध्ये तुम्हाला अनेक भाषांचा सपोर्ट, यूट्यूब आणि UPI सारख्या अनेक फीचर्स देण्यात आले आहेत. 

या फोनवर तुम्हाला 13 भाषांचा सपोर्ट मिळेल. तसेच, हा एक की-पॅड फीचर फोन आहे, ज्यामध्ये कॅमेरा देखील देण्यात आला आहे. Itel Super Guru 4G कंपनीने 1799 रुपये किमतीत लाँच केला आहे. हा फोन ग्रीन, ब्लॅक आणि डार्क ब्लू अशा तीन कलरच्या ऑप्शनमध्ये खरेदी केला जाऊ शकतो. हा फीचर फोन कंपनीच्या अधिकृत वेबसाइट आणि Amazon वर विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे.

हा की-पॅड फीचर फोन आहे. itel Super Guru 4G मध्ये 2 इंचाचा डिस्प्ले आहे. डिव्हाइसला पॉवर देण्यासाठी 1000mAh बॅटरी देण्यात आली आहे. हा फोन VGA कॅमेरा सह येतो, ज्याच्या मदतीने तुम्ही UPI स्कॅन करून पेमेंट करू शकता. यामध्ये यूट्यूब प्लेबॅक सपोर्टही उपलब्ध आहे. युजर्स त्यावर यूट्यूब शॉर्ट्स स्ट्रीम करू शकतात. हँडसेटमध्ये 13 भाषांचा सपोर्ट आहे. 

याशिवाय इन्स्टंट मेसेजिंग ॲप LetsChat चा सपोर्ट आहे. या फोनमध्ये Sokoban, 2048 आणि Tetris सारखे गेम्स देखील उपलब्ध आहेत. तसेच, या डिव्हाइसमध्ये ड्युअल 4G कनेक्टिव्हिटी आणि VoLTE सपोर्ट उपलब्ध आहे. यावर तुम्ही सर्व टेलिकॉम ऑपरेटर वापरू शकता. याशिवाय, हे 2G आणि 3G सपोर्टसह देखील येते. या ब्रँडने या वर्षाच्या सुरुवातीला दोन स्मार्टफोनही लाँच केले आहेत.

Web Title: itel super guru 4g price in india launch with upi youtube support

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.