आजच्या काळात स्मार्टफोन आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनला आहे. पण काही महिने किंवा वर्षे वापरल्यानंतर फोनचा वेग मंदावतो. अॅप्स उघडायला वेळ लागणे किंवा फोन वारंवार हँग होणे अशा समस्या सुरू होतात. अनेकदा आपल्याला वाटते की फोन जुना झालाय म्हणून असं होतंय, पण तसं नसतं. फोनच्या सेटिंग्जमध्ये काही बदल केल्यास तो पुन्हा पहिल्यासारखा वेगवान होऊ शकतो.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
कसा वाढवाल तुमच्या फोनचा स्पीड? जाणून घ्या ५ सोपे उपाय:
सॉफ्टवेअर आणि अॅप्स अपडेट ठेवा : अनेकजण डेटा वाचवण्यासाठी किंवा कंटाळा म्हणून सिस्टीम अपडेटकडे दुर्लक्ष करतात. पण फोनचे सॉफ्टवेअर आणि अॅप्स नेहमी अपडेट ठेवल्याने फोनमधील बग्स निघून जातात आणि फोनची कार्यक्षमता सुधारते. अपडेटेड फोनवर सायबर हल्ल्याचा धोकाही कमी असतो.
अनावश्यक फीचर्स बंद करा : आपल्या फोनमधील ब्लूटूथ, वायफाय आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे 'लाईव लोकेशन' हे फीचर्स अनेकदा गरज नसतानाही सुरू असतात. यामुळे बॅटरी तर खर्च होतेच, पण प्रोसेसरवरही ताण येतो. काम झाल्यावर हे फीचर्स त्वरित बंद करा, जेणेकरून फोन स्मूद चालेल.
स्टोरेज रिकामे करा : जर तुमच्या फोनची मेमरी ९० टक्क्यांहून अधिक भरली असेल, तर फोन स्लो होणारच! त्यामुळे फोनमधील न लागणारे अॅप्स लगेच डिलीट करा. तसेच व्हॉट्सअॅपवरील अनावश्यक फोटो, व्हिडिओ आणि ड्युप्लिकेट फाईल्स काढून टाकून स्टोरेजमध्ये थोडी मोकळी जागा ठेवा.
फोन नियमित रिस्टार्ट करा : जसे आपल्याला आरामाची गरज असते, तसेच फोनलाही असते. आठवड्यातून किमान दोनदा फोन रिस्टार्ट केल्याने बॅकग्राउंडला सुरू असलेल्या अनावश्यक प्रक्रिया बंद होतात आणि फोनमधील तात्पुरते एरर्स दूर होऊन त्याला नवीन ऊर्जा मिळते.
फॅक्टरी रीसेट हा शेवटचा पर्याय : जर वरील सर्व उपाय करूनही फोनचा स्पीड वाढत नसेल, तर 'फॅक्टरी रीसेट' हा उत्तम मार्ग आहे. यामुळे फोनमधील सर्व सेटिंग्स आणि फाईल्स डिलीट होऊन फोन अगदी कोरा होतो. मात्र, हे करण्यापूर्वी तुमच्या महत्त्वाच्या डेटाचा बॅकअप नक्की घ्या, कारण या प्रक्रियेत फोनमधील सर्व काही पुसले जाते.
Web Summary : Is your smartphone slow? Update software, disable unnecessary features like live location, and free up storage. Restart regularly. Factory reset is the last option after backing up data.
Web Summary : क्या आपका स्मार्टफोन धीमा है? सॉफ्टवेयर अपडेट करें, लाइव लोकेशन जैसी अनावश्यक सुविधाओं को बंद करें और स्टोरेज खाली करें। नियमित रूप से रीस्टार्ट करें। डेटा का बैकअप लेने के बाद फैक्ट्री रीसेट अंतिम विकल्प है।