शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

तुम्ही जे बोलता, तेच इन्स्टाग्रामवर दिसतं? हा जादुई प्रकार नाही तर डेटाचा खेळ आहे; जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2026 18:56 IST

आपण एखाद्या वस्तूबद्दल मित्रांशी बोलतो आणि काही वेळातच त्याच वस्तूची जाहिरात आपल्या इन्स्टाग्राम फीडवर झळकू लागते. हे पाहून अनेकदा आपण चक्रावून जातो.

अनेकदा आपल्याला असा अनुभव येतो की, आपण एखाद्या वस्तूबद्दल मित्रांशी बोलतो आणि काही वेळातच त्याच वस्तूची जाहिरात आपल्या इन्स्टाग्राम फीडवर झळकू लागते. हे पाहून अनेकदा आपण चक्रावून जातो. इन्स्टाग्राम आपले बोलणे चोरून ऐकतेय की काय? असा प्रश्न युजर्सना पडतो. जरी इन्स्टाग्रामचे प्रमुख ॲडम मोसेरी यांनी हे दावे फेटाळले असले, तरी तुमच्या प्रत्येक हालचालीवर कंपनीचे बारीक लक्ष असते. या 'हायपर-पर्सनलाइज्ड' जाहिरातींपासून सुटका मिळवायची असेल, तर काही महत्त्वाच्या सेटिंग्ज बदलणे गरजेचे आहे.

इन्स्टाग्रामला कसे कळते तुमचे मन?

इन्स्टाग्राम तुमचे बोलणे ऐकत नाही, पण तुमचे ॲपमधील वर्तन टिपते. तुम्ही कोणत्या पोस्ट लाईक करता, काय सर्च करता आणि कोणत्या प्रोफाईलवर जास्त वेळ घालवता, याचा सखोल अभ्यास केला जातो. याशिवाय 'मेटा पिक्सेल' आणि 'कुकीज'च्या मदतीने तुम्ही इतर वेबसाइट्सवर काय पाहता, याची माहितीही इन्स्टाग्रामकडे पोहोचते. याच डेटाच्या जोरावर तुम्हाला अगदी तुमच्या आवडीच्या जाहिराती दाखवल्या जातात.

'पर्सनल ॲड्स' कशा थांबवायच्या?

जर तुम्हाला या जाहिराती त्रासदायक वाटत असतील, तर खालील सोप्या स्टेप्स फॉलो करा:

१. Meta Accounts Centre मधून जाहिरातींच्या सेटिंग्ज बदला:

- इन्स्टाग्राम ॲपमध्ये जाऊन तुमच्या प्रोफाइलवरील उजव्या कोपऱ्यातील तीन ओळींवर (मेनू) क्लिक करा.

- 'Accounts Centre' मध्ये जा.

- खाली स्क्रोल केल्यावर 'Ad preferences' हा पर्याय दिसेल.

- तिथे 'Manage info' मध्ये जाऊन 'Activity information from ad partners' निवडा.

- आता 'Review setting' वर टॅप करा आणि तुमची माहिती जाहिरातींसाठी वापरली जाऊ नये, असा पर्याय निवडा.

२. Meta बाहेरील ट्रॅकिंग बंद करा:

-'Accounts Centre' मध्येच 'Your information and permissions' विभागात जा.

- तिथे 'Your activity off Meta technologies' हा पर्याय निवडा.

येथे तुम्ही तुमची जुनी अ‍ॅक्टिव्हिटी डिलीट करू शकता किंवा भविष्यातील ट्रॅकिंग पूर्णपणे बंद करू शकता. यामुळे तुम्ही बाहेर कोणत्या वेबसाईट पाहता, याची माहिती मेटाला मिळणार नाही.

हे लक्षात ठेवा...

या सेटिंग्ज बदलल्यामुळे इन्स्टाग्रामवर जाहिराती येणे पूर्णपणे बंद होणार नाही. मात्र, त्या तुमच्या खासगी आयुष्याशी किंवा तुम्ही केलेल्या सर्चशी संबंधित नसतील. हल्ली मेटा व्हॉट्सॲप स्टेटस आणि मेटा एआय चॅटबॉटमधील माहितीचाही वापर जाहिरातींसाठी करत आहे, त्यामुळे वेळोवेळी प्रायव्हसी सेटिंग्ज तपासणे तुमच्या हिताचे ठरेल.

English
हिंदी सारांश
Web Title : Instagram ads mirroring conversations? It's data, not magic, learn how.

Web Summary : Instagram personalizes ads by tracking your app activity and browsing history using Meta Pixel and cookies. To limit targeted ads, adjust ad preferences in Meta Accounts Centre and disable off-Meta tracking. This won't eliminate ads, but they'll be less personalized.
टॅग्स :Social Mediaसोशल मीडियाInstagramइन्स्टाग्रामtechnologyतंत्रज्ञान