एआय कपड्यांच्या आतमध्येही डोकावतेय का? तरुणीने धक्कादायक गैरप्रकार आणला समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2025 10:44 IST2025-09-20T10:43:15+5:302025-09-20T10:44:31+5:30
मेटाडेटा हटवा - छायाचित्रे अपलोड करण्याच्या आधी मेटाडेटा (लोकेशन व डिव्हाइस डिटेल) काढून टाकावीत. गोपनीय बाबींबद्दलचे धोरण तपासा-कोणत्याही ॲप किंवा प्लॅटफॉर्मचे माहितीचा वापर करण्याबाबतचे धोरण नीट वाचा.

एआय कपड्यांच्या आतमध्येही डोकावतेय का? तरुणीने धक्कादायक गैरप्रकार आणला समोर
नवी दिल्ली : एआयच्या माध्यमातून सुंदर छायाचित्रे तयार करण्यात अनेक धोके आहेत. गुगलच्या जेमिनी नॅनो बनाना एआय फोटो एडिटिंग टुलने निर्माण केलेल्या एआय साडी एडिट ट्रेंडमध्ये झलक भवनानी या महिलेबाबत जो गैरप्रकार घडला त्यामुळे हे धोके अधिक प्रकर्षाने जाणवले. लोकांच्या खासगी आयुष्यातील घटना, तसेच त्यांची गोपनीय गोष्टी यांचा एआयच्या माध्यमातून व्यवसायासाठी व त्यातून भरसमाठ पैसे कमवण्यासाठी वापर होत असल्याचे अशा उदाहरणांतून सिद्ध झाले आहे.
नेमक्या कोणत्या प्रकरणाची चर्चा
झलक या महिलेने एका पोस्टमध्ये म्हटले की, एआय साडी ट्रेंडसाठी मी माझे छायाचित्र अपलोड केले होते. त्यांनी या छायाचित्रात सूट परिधान केला आहे. मात्र एआयने जे छायाचित्र तयार केले त्यात त्यांना वेगळ्या वेशभूषेत दाखविण्यात आले. त्या छायाचित्रात त्यांच्या खांद्यावरील तीळ दाखविण्यात आला आहे. त्यावरून झलक यांनी एआयच्या गैरवापरावर टीका केली आहे.
जुनी छायाचित्रे कशी मिळवली?
एआय साडी ट्रेंडसाठी कोणीही आपली छायाचित्रे अपलोड करू नका, असे त्यांनी सर्वांना आवाहन केले आहे. झलक यांचे अयोग्य स्वरूपाचे छायाचित्र तयार करण्यासाठी एआयने परवानगी न घेता सोशल मीडिया अकाउंटवरून त्यांची जुनी छायाचित्रे मिळविली. त्यातून नवे छायाचित्र तयार केले.
अशी बाळगा सावधगिरी
मेटाडेटा हटवा - छायाचित्रे अपलोड करण्याच्या आधी मेटाडेटा (लोकेशन व डिव्हाइस डिटेल) काढून टाकावीत. गोपनीय बाबींबद्दलचे धोरण तपासा-कोणत्याही ॲप किंवा प्लॅटफॉर्मचे माहितीचा वापर करण्याबाबतचे धोरण नीट वाचा.
आपली माहिती संबंधित कंपनी एआयच्या प्रशिक्षणात वापरत असतील तर अशा ठिकाणी आपली छायाचित्रे अपलोड करू नका. खासगी तपशील देऊ नका- परिचित नसलेल्या ॲप किंवा प्लॅटफॉर्मवर आपली छायाचित्रे, आवाजाचा नमुना अपलोड करू नका.