शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांची सरकारमधून बाहेर पडण्याची तयारी?; 'वर्षा'वरील बैठकीत दादा संतापले, दानवेंचा दावा
2
डॉ. मुजम्मिलच्या डायरीतून समोर आलं मोठं गुपित, 'कोड वर्ड'मध्ये लिहिला होता दहशतीचा प्लॅन! आणखी 25 नावं समोर
3
पार्थ पवारांच्या कंपनीला सूट द्यायची आहे का? बावनकुळेंच्या प्रश्नामुळे मुद्रांक शुल्क विभागच संभ्रमात
4
CM देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे एकाच मंचावर येणार; दोघांची भेट लक्षवेधी ठरणार
5
तहसीलदार पदावरून ४ वेळा निलंबन; ‘कामाची’ सवय असलेले सूर्यकांत येवले लाच प्रकरणांतही आघाडीवर
6
दिल्लीत स्फोटापूर्वी मशिदीत गेला होता दहशतवादी डॉ. उमर नबी; स्फोटाच्या आधीचे सीसीटीव्ही समोर
7
अल-कायदाचा माजी कमांडर; व्हाईट हाऊसमध्ये अल-शरा आणि डोनाल्ड ट्रम्प यांची ऐतिहासिक भेट
8
“बूट फेकीसारख्या घटना पुन्हा घडू नये यासाठी काय उपाय करता येईल?”; सुप्रीम कोर्टाचा सवाल
9
कर्तव्यनिष्ठेला सलाम! कुशीत बाळ अन् हातात मशीन... आई करतेय कंडक्टरचं काम; 'ती'चा संघर्ष
10
'या' सरकारी बँकेचा ग्राहकांना मोठा दिलासा; घर घेण्याच्या विचारात असाल तर, पाहा काय आहेत नवे दर?
11
Delhi Blast : व्हाईट कॉलर टेरर मॉड्यूल! दिल्ली स्फोट प्रकरणात आणखी एका डॉक्टरला घेतलं ताब्यात
12
PAK vs SL: पाकिस्तानात स्फोट, श्रीलंकन क्रिकेटर मायदेशी परतण्याची भीती, PCBचा मोठा निर्णय
13
Delhi Blast: दिल्ली बॉम्बस्फोटातील कारची ११ वर्षात ५ वेळा विक्री; खरा मालक कोण, शेवटचा व्यवहार कधी झाला?
14
नगरपरिषद निवडणुकीत नवी समीकरणे; बहुजन विकास आघाडी अन् मनसेची युती होणार? नेते म्हणाले...
15
Children's Day 2025: सुकन्या समृद्धी ते म्युच्युअल फंड SIP पर्यंत; बालदिनी तुमच्या मुलांना द्या खास आर्थिक गिफ्ट, जाणून घ्या स्कीम्स
16
बॉलिवूडच्या 'भट' कुटुंबात कटुता!, आलियाने सख्ख्या काकाला बोलवलं नाही लग्नाला अन् राहालाही नाही भेटवलं, मुकेश भट यांचा खुलासा
17
अंजली दमानियांकडून राजीनाम्याची मागणी; मला योग्य वाटेल ते मी करेन, अजित पवारांची प्रतिक्रिया
18
'अमेरिकन कामगारांना ट्रेन करा आणि घरी जा...' ट्रम्प प्रशासनाचं नवीन फर्मान; भारतीय IT अभियंते चिंतेत
19
"हिंदीतील लॉबीने मला स्वीकारलं नाही...", अजिंक्य देव स्पष्टच बोलले; अजय-सनीचं घेतलं नाव
20
डरानेवालो को डराओ! 'शिवतीर्थ'समोर बॅनरबाजी; उत्तर भारतीय सेनेने मनसे प्रमुख राज ठाकरेंना डिवचलं

भन्नाट फीचर्ससह शक्तिशाली गेमिंग फोन iQOO Z5 5G लाँच; जाणून घ्या किंमत आणि स्पेसिफिकेशन्स  

By सिद्धेश जाधव | Updated: September 23, 2021 17:30 IST

iQOO Z5 5G Price In India: iQOO Z5 5G स्नॅपड्रॅगन प्रोसेसर, वेगवान डिस्प्ले आणि फास्ट चार्जिंगसह सादर करण्यात आला आहे.  

विवोच्या सब-ब्रँड iQOO ने जागतिक बाजारात आपला नवीन गेमिंग फोन iQOO Z5 5G लाँच केला आहे. कंपनीने हा फोन 27 सप्टेंबरला भारतात सादर केला जाईल, अशी माहिती याआधीच दिली आहे. या ग्लोबल लाँचमुळे iQOO Z5 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स समोर आले आहेत. हा फोन स्नॅपड्रॅगन प्रोसेसर, वेगवान डिस्प्ले आणि फास्ट चार्जिंगसह सादर करण्यात आला आहे.  

iQOO Z5 5G चे स्पेसिफिकेशन्स  

iQOO Z5 5G मध्ये 6.67-इंचाचा फुलएचडी+ डिस्प्ले मिळतो. हा पंच होत डिजाईनसह सादर करण्यात आलेला डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेट आणि 240Hz टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करतो, जे गेमिंगसाठी खूप उपयुक्त ठरतात. हा फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 778G SoC वर चालतो, तर ग्राफिक्ससाठी एड्रेनो 670 GPU देण्यात आला आहे. हा फोन अँड्रॉइड 11 आधारित फनटच ओएसवर चालतो. 

या फोनमध्ये 12GB पर्यंतचा वेगवान LPDDR5 RAM आणि 256GB पर्यंतची UFS 3.1 इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. iQOO Z5 मध्ये 4GB एक्सटेंडेड रॅम, VC लिक्विड कूलिंग सिस्टम, सराऊंड साऊंडसह ड्युअल स्पिकर आणि 4D गेम व्हायब्रेशनसह लिनियर मोटार देण्यात आली आहे.सिक्योरिटीसाठी यात साईड माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर देण्यात आला आहे.  

iQOO Z5 5G मधील ट्रिपल कॅमेरा सेटअपमध्ये 64 मेगापिक्सलचा सॅमसंग ISOCELL GW3 मुख्य सेन्सर आहे. त्याचबरोबर 8 मेगापिक्सलची वाईड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सलचा मॅक्रो सेन्सर देण्यात आला आहे. यातील फ्रंट कॅमेरा 16 मेगापिक्सलचा आहे. पॉवर बॅकअपसाठी यात 5,000mAh ची बॅटरी मिळते, ही बॅटरी 44W फास्ट-चार्जिंगला सपोर्ट करेल.  

iQOO Z5 5G ची किंमत  

  • 8GB+128GB व्हेरिएंट: RMB 1899 (जवळपास 21,600 रुपये 
  • 12GB+256GB व्हेरिएंट: RMB 2099 (जवळपास 23,900 रुपये)  
  • 12GB+256GB व्हेरिएंट:  RMB 2299 (जवळपास 26,200 रुपये)  

हा डिवाइस ब्लू ओरिजिन, मॉर्निंग लाईट आणि ड्रीम स्पेस कलर ऑप्शनमध्ये सादर करण्यात आला आहे. 

टॅग्स :Smartphoneस्मार्टफोनAndroidअँड्रॉईड