जगातील सर्वात शक्तिशाली प्रोसेसरसह येतोय ‘हा’ फोन; शाओमी-वनप्लसच्या अडचणी वाढल्या  

By सिद्धेश जाधव | Published: April 19, 2022 07:45 PM2022-04-19T19:45:18+5:302022-04-19T19:45:28+5:30

iQOO Neo 6 स्मार्टफोन BIS वर दिसला आहे, त्यामुळे लवकरच याची एंट्री भारतात होणार हे निश्चित झालं आहे.  

iQOO Neo 6 Spotted On BIS India Launch Soon  | जगातील सर्वात शक्तिशाली प्रोसेसरसह येतोय ‘हा’ फोन; शाओमी-वनप्लसच्या अडचणी वाढल्या  

जगातील सर्वात शक्तिशाली प्रोसेसरसह येतोय ‘हा’ फोन; शाओमी-वनप्लसच्या अडचणी वाढल्या  

Next

iQOO असा ब्रँड आहे जो दिवसेंदिवस आपली लोकप्रियता वाढवत आहे. कंपनीनं यावर्षी भारतात फ्लॅगशिप आणि बजेट सेगमेंटमध्ये दमदार स्मार्टफोन सादर केले आहेत. आता मिड रेंजमध्ये फ्लॅगशिप लेव्हल स्पेक्ससह नवा हँडसेट आणण्याची तयारी सुरु झाली आहे. iQOO Neo 6 स्मार्टफोन भारतीय सर्टिफिकेशन साईट BIS वर दिसला आहे. 

iQOO Neo 6 सोबत कंपनीचा iQOO Z6 Pro 5G हँडसेट देखील ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्सनं सर्टिफाय केला आहे, अशी माहिती टिपस्टर मुकुल शर्मानं दिली आहे. झेड6 प्रो भारतात 27 एप्रिलला लाँच केला जाणार आहे. तसेच आता iQOO Neo6 देखील मे महिन्यात भारतीयांच्या भेटीला येऊ शकतो.  

iQOO Neo 6 चे स्पेसिफिकेशन्स  

iQOO Neo 6 लेटेस्ट अँड्रॉइड 12 आधारित ओरिजन ओएससह लाँच झाला आहे. या फोनमध्ये क्वॉलकॉमचा सर्वात स्नॅपड्रॅगन 8 जेन 1 चिपसेट देण्यात आला आहे. यात 12GB पर्यंत LPDDR5 RAM आणि 256GB पर्यांतची UFS 3.1 storage आहे. फोन थंड ठेवण्यासाठी वीसी कूलिंग सिस्टम मिळते. बेसिक कनेक्टिव्हिटी फीचर्ससह या स्मार्टफोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. 

आयकू नियो 6 मध्ये 6.62 इंचाचा फुलएचडी+ अ‍ॅमोलेड डिस्प्ले आहे, जो 120हर्ट्ज रिफ्रेश आणि 360हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करतो. फोनच्या मागे ओआयएस असलेला ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. ज्यात एलईडी फ्लॅशसह 64 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, 12 मेगापिक्सलची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सलची पोर्टरेट लेन्स मिळते. सेल्फीसाठी 16 मेगापिक्सलचा सेन्सर आहे. पावर बॅकअपसाठी हा मोबाईल फोन 4,700एमएएचच्या बॅटरीला सपोर्ट करतो जी 80वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह येते.   

Web Title: iQOO Neo 6 Spotted On BIS India Launch Soon 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.