शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

iQOO च्या पावरफुल 5G Phone वर जबरदस्त डिस्काउंट, 12GB रॅमसह मिळतेय 80W फास्ट चार्जिंग  

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2022 12:41 IST

iQOO Neo 6 5G स्मार्टफोन अ‍ॅमेझॉनच्या मान्सून कार्निवल सेलमध्ये 64MP कॅमेरा आणि 80W फास्ट चार्जिंगसह स्वस्तात विकला जात आहे.  

Amazon वर सध्या मान्सून कार्निवल सेल सुरु आहे, या सेलमध्ये अनेक स्मार्टफोन्स स्वस्तात मिळत आहेत. त्यामुळे तुम्ही 30 हजार रुपयांच्या बजेटयामध्ये एक दमदार स्मार्टफोन विकत घेण्याचा विचार करत असाल तर iQOO Neo 6 5G तुमच्यासाठीच मोठ्या डिस्काउंटसह उपलब्ध झाला आहे. ही सूट 12 जून 2022 पर्यंत उपलब्ध असेल.  

अशी आहे ऑफर  

iQOO Neo 6 5G स्मार्टफोनच्या 8 जीबी रॅम व 128 जीबी स्टोरेज मॉडेलची किंमत 29,000 रुपये आहे. तर 12 जीबी 256 जीबी मॉडेल 33,999 रुपयांमध्ये विकला जात आहे. अ‍ॅमेझॉन मान्सून कार्निवल सेलमध्ये मात्र तुम्ही 3,000 रुपयांची मोठी सूट मिळवू शकता. यासाठी तुम्हाला ICICI बँकेच्या क्रेडिट किंवा डेबिट कार्डचा वापर करून पेमेंट करावं लागेल. तसेच तुम्ही जुना फोन एक्सचेंज करून आणखी 13,500 रुपयांपर्यंतची बचत करू शकता.  

iQOO Neo 6 स्पेसिफिकेशन्स  

iQOO Neo 6 स्मार्टफोनमध्ये 6.62-इंचाचा FHD+ E4 AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. जो 120Hz रिफ्रेश रेट 1200Hz टच सॅम्पलिंग रेट आणि 1300 निट्स पीक ब्राईटनेसला सपोर्ट करतो. iQOO Neo 6 स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यात 64MP चा प्रायमरी कॅमेरा OIS ला सपोर्टसह मिळतो. सोबत 8MP ची अल्ट्रावाईड लेन्स आणि 2MP चा मॅक्रो कॅमेरा आहे. यात 16MP चा सेल्फी शूटर देण्यात आला आहे. 

iQOO Neo 6 स्मार्टफोनमध्ये क्वालकॉमचा Snapdragon 870 प्रोसेसर देण्यात आला आहे. जो जुन्या जेनरेशनचा फ्लॅगशिप प्रोसेसर आहे. सोबत 12GB पर्यंतचा LPDDR4x RAM आणि 256GB पर्यंतची वेगवान UFS 3.1 स्टोरेज मिळते. सोबत 4GB व्हर्च्युअल रॅम देखील मिळतो. आयकूचा हा अँड्रॉइड 12 स्मार्टफोन फनटच ओएस 12 वर चालतो. यातील लिक्विड कूलिंग सिस्टम हेवी परफॉर्मन्सनंतर देखील फोन थंड ठेवते.  

iQOO Neo 6 स्मार्टफोनमध्ये पावर बॅकअपसाठी 4,700mAh ची बॅटरी मिळते जी 80W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. तसेच यात X-अ‍ॅक्सिस लीनियर व्हायब्रेशन मोटर आणि इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर मिळतो. तर कनेक्टिव्हिटीसाठी Bluetooth 5.2, NFC, 5G, 4G LTE आणि Wi-Fi मिळतो.  

टॅग्स :Smartphoneस्मार्टफोन