स्मार्टफोन जगतात आपल्या परफॉर्मन्ससाठी ओळखल्या जाणाऱ्या आक्यूओओने मंगळवारी आज (२४ फेब्रुवारी २०२६) भारतात आपला नवीन प्रीमियम स्मार्टफोन आयक्यूओओ १५ आर लॉन्च केला आहे. आक्यूओओ हा विवोचा हा सब-ब्रँड आहे. हा फोन बाजारातील अनेक प्रिमियम स्मार्टफोनला टक्कर देईल, असा कंपनीचा विश्वास आहे.
आयक्यूओओ १५ आरमध्ये ६.५९ इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे. याचा व्हेरिएबल रिफ्रेश रेट ६० ते १४४ Hz असून, ५,००० निट्स इतका प्रचंड पीक ब्राइटनेस आहे, ज्यामुळे कडाक्याच्या उन्हातही स्क्रीन स्पष्ट दिसेल. फोटोग्राफीसाठी आयक्यूओओ १५ आरमध्ये ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप आहे. मुख्य कॅमेरा ५० मेगापिक्सेल आणि ८ मेगा पिक्सेल सेन्सर येतो. तर, सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी यात ३२ मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.
या फोनची खासियत म्हणजे, यात ७,६०० mAh बॅटरी मिळत आहे. इतकी मोठी बॅटरी असूनही फोन कॉम्पॅक्ट ठेवण्यात कंपनीला यश आले आहे. हा स्मार्टफोन अत्याधुनिक स्नॅपड्रॅगन ८ जनरल ५ (Snapdragon 8 Gen 5) प्रोसेसरवर चालतो. यात १२ GB पर्यंत LPDDR5X अल्ट्रा रॅम आणि ५१२ GB पर्यंत UFS ४.१ स्टोरेजचा पर्याय मिळतो. हा फोन लेटेस्ट अँड्रॉइड १६ वर आधारित OriginOS 6.0 वर कार्य करतो.
हा फोन 'ट्रायम्फ सिल्व्हर' आणि 'डार्क नाईट' या दोन आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध असेल. तसेच ८ जीबी रॅम/ २५६ जीबी स्टोरेज असलेल्या स्मार्टफोनची किंमत ४४ हजार ९९९ रुपये आहे. तर, १२ जीबी रॅम / २५६ जीबी स्टोरेज आणि १२ जीबी रॅम/५१२ जीबी स्टोरेज या दोन्ही स्मार्टफोनची किंमत अनुक्रमे ४७ हजार ९९९ रुपये आणि ५२ हजार ९९९ रुपये इतकी आहे. हा फोन ३ मार्चपासून ई-कॉमर्स वेबसाइट अॅमेझॉन आणि प्रमुख रिटेल स्टोअर्सवर विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे.
Web Summary : iQOO launched the iQOO 15R in India, boasting a 6.59-inch display, dual rear cameras, and a massive 7,600 mAh battery. Powered by Snapdragon 8 Gen 5, it offers up to 12GB RAM and 512GB storage. Available in two colors, starting at ₹44,999.
Web Summary : iQOO ने भारत में iQOO 15R लॉन्च किया, जिसमें 6.59 इंच का डिस्प्ले, ड्यूल रियर कैमरे और 7,600 mAh की बैटरी है। स्नैपड्रैगन 8 जेन 5 द्वारा संचालित, यह 12GB तक रैम और 512GB स्टोरेज प्रदान करता है। दो रंगों में उपलब्ध, शुरुआती कीमत ₹44,999 है।