1000 फूट उंचावरुन फेकला iPhone X आणि पाहा काय झालं ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2017 18:57 IST2017-11-08T18:53:32+5:302017-11-08T18:57:56+5:30

1000 फूट उंचावरुन फेकला iPhone X आणि पाहा काय झालं ?
मुंबई: भारतीय मोबाईल मार्केटमध्ये गेल्या काही दिवसांपासून बहुचर्चित 'आयफोन X' स्मार्टफोनची विक्री सुरू झाली आहे. सध्या या स्मार्टफोनची भरमसाठ किंमत असून देखील जोरदार विक्री सुरू आहे. सध्या ज्यांनी या स्मार्टफोनची प्री-बुकिंग केली होती, त्यांनाच हा फोन मिळतोय. दरम्यान, या स्मार्टफोनचे अनेक ड्रॉप टेस्ट समोर आले आहे. यातीलच एक टेस्ट करण्यात आलेल्या व्हिडिओ unlockriver.com ने आपल्या युट्युब चॅनेलवर अपलोड केला आहे. यामध्ये 'आयफोन X' स्मार्टफोन जवळजवळ 1000 फूट उंचीवरुन फेकण्यात आला आहे.
unlockriver.com ने अपलोड केलेल्या या 'आयफोन X' च्या व्हिडिओला एक्स्ट्रीम ड्रॉप टेस्ट असे नाव दिले आहे. व्हिडिओमध्ये नवीन 'आयफोन X' स्मार्टफोनला एका दोरीने ड्रोनला बांधण्यात आले आहे. त्यानंतर ड्रोन जवळपास 1000 फूट उंचीवर नेऊन स्मार्टफोनला खाली असलेल्या सिमेंटच्या फरशीवर फेकण्यात आले. खाली फरशीवर पडल्यानंतर 'आयफोन X' स्मार्टफोनची मागील बाजू फुटली. मात्र, या स्मार्टफोनच्या डिस्प्लेला काहीही धक्का लागला नाही. त्यानंतर या स्मार्टफोनला ऑपरेट करुन पाहिले असता, स्मार्टफोनमधील कॅमेरा सुरु होता आणि इतर फीचर्स सुद्धा व्यवस्थित ऑपरेट होत होते.
दरम्यान, या व्हिडिओच्या होस्टने असा दावा केला आहे, की आयफोन X हा इतर आयफोन स्मार्टफोनच्या तुलनेत मजबूत आहे. जर 1000 फूट उंचीवरुन हा स्मार्टफोन डिस्प्लेच्या बाजूने पडला असता, तरी सुद्धा काही फरक पडला नाही. याशिवाय, EverythingApplePro ची एक ड्रॉप टेस्ट घेण्यात आली होती. याचा पण व्हिडिओ अपलोड करण्यात आला होता. यामध्ये सुद्धा स्मार्टफोनच्या डिस्प्लेला काही नुकसान झाले नव्हते.
भारतात 'आयफोन X' 64GB व्हेरिअंटची किंमत 64 हजार रूपये आहे, तर 128GB व्हेरिअंटची किंमत 1लाख 2 हजार रुपये आहे.