Best Android Smartphones: थेट आयफोनला टक्कर देतात 'हे' ५ प्रीमिअम अँड्रॉइड स्मार्टफोन! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2025 13:29 IST2025-07-25T13:27:53+5:302025-07-25T13:29:38+5:30

iPhone vs Android Smartphones: भारतीय बाजारात असे काही प्रीमिअम अँड्रॉइड स्मार्टफोन आहेत, जे फीचर्स आणि डिझाइनच्या बाबतीत थेट आयफोनला टक्कर देतात.

iPhone vs Premium Android Smartphones: Samsung Galaxy Z Fold 6, Samsung Galaxy Z Flip 6, Vivo X200 Pro 2025, Motorola Razr 50 Ultra 2025, OnePlus One 2024 | Best Android Smartphones: थेट आयफोनला टक्कर देतात 'हे' ५ प्रीमिअम अँड्रॉइड स्मार्टफोन! 

Best Android Smartphones: थेट आयफोनला टक्कर देतात 'हे' ५ प्रीमिअम अँड्रॉइड स्मार्टफोन! 

भारतात आयफोनची क्रेझ दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. परंतु, भारतीय बाजारात असे काही प्रीमिअम अँड्रॉइड स्मार्टफोन आहेत, जे फीचर्स आणि डिझाइनच्या बाबतीत थेट आयफोनला टक्कर देतात. 

१) सॅमसंग गॅलेक्सी झेड फोल्ड ६
सॅमसंगचा नुकताच लॉन्च झालेला सॅमसंग गॅलेक्सी झेड फोल्ड ६ हा फोन ७.६ इंचाचा फोल्डेबल AMOLED २X डिस्प्ले आणि ६.३ इंचाचा कव्हर स्क्रीन बाजारात उपलब्ध ५आहे. मल्टीटास्किंग आणि फ्लेक्स मोड सारख्या फीचर्समुळे हा फोन एक शक्तिशाली फोन-टॅबलेट हायब्रिड बनतो. हा फोन २०२५ मधील सर्वोत्तम फोल्डेबल फोन आहे, असा दावा कंपनीने केला आहे. या फोनची किंमत १ लाख ५९ हजार ९९९ रुपये आहे.

२) सॅमसंग गॅलेक्सी झेड फ्लिप ६
सॅमसंग गॅलेक्सी झेड फ्लिप ६ हा फोन १ लाख ०९ हजार ९९९ रुपयांत उपलब्ध आहे.  हा फोन स्टायलिश डिझाइन आणि फ्लॅगशिप परफॉर्मन्सचे चांगले मिश्रण आहे. ३.९ इंचाचा मोठा कव्हर डिस्प्ले, स्नॅपड्रॅगन ८ जनरल ३ प्रोसेसर, १२ जीबी रॅम, ५० एमपी कॅमेरा आणि एआय आधारित बॅटरी ऑप्टिमायझेशनमुळे हा फोन आणखी आकर्षित ठरत आहे.

३) विवो एक्स २०० प्रो
हा फोन जुलै-ऑगस्ट २०२५ मध्ये लॉन्च केला जाऊ शकतो आणि त्याची अंदाजे किंमत ९४ हजार ९९९ रुपये असल्याचे सांगितले जात आहे. यात ZEISS क्वाड कॅमेरा सेटअप, १ इंचाचा सोनी सेन्सर, पेरिस्कोप लेन्स आणि बेस्ट नाईट फोटोग्राफीसारखे पर्याय मिळेल. हा फोन मीडियाटेक डायमेन्सिटी ९४०० प्रोसेसरवर चालेल आणि १२०Hz रिफ्रेश रेटसह २K वक्र AMOLED डिस्प्ले असेल, अशी माहिती लीक झाली आहे.

४) मोटोरोला रेझर ५० अल्ट्रा 
मोटोरोला रेझर ५० अल्ट्रा हा फोन स्टायलिश लूकसह बाजारात दाखल झाला आहे, ज्याची किंमत ९९ हजार ९९९ रुपये इतकी आहे.  वॉटर रेझिस्टन्स आणि प्रीमियम व्हेगन लेदर बॉडीमुळे हा फोन ग्राहकांना आकर्षित करत आहे.

५) वनप्लस वन 
१ लाख ३९ हजार ९९९ रुपयांना मिळणारा हा वनप्लस ओपन हा फोल्डेबल फोन आहे, ज्यामध्ये जवळजवळ कोणतेही क्रीज नाहीत आणि व्हेगन लेदरसारखे फिनिशिंग मिळते. हा फोन स्नॅपड्रॅगन ८ जनरल २ प्रोसेसर आणि १६ जीबी रॅमने सुसज्ज आहे. या फोनमध्ये ग्राहकांना ट्रिपल कॅमेरा सेटअपसह येतो. शिवाय, ४ हजार ८०५ एमएएच क्षमता असलेली बॅटरी मिळते, जी ६७ वॅटने सुपरफास्ट चार्ज होते आणि दिर्घकाळ टिकते.

Web Title: iPhone vs Premium Android Smartphones: Samsung Galaxy Z Fold 6, Samsung Galaxy Z Flip 6, Vivo X200 Pro 2025, Motorola Razr 50 Ultra 2025, OnePlus One 2024

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.