केंद्र सरकारने iPhone, iPad युजर्ससाठी एक सुरक्षा इशारा जारी केला आहे. या उपकरणांच्या ऑपरेटिंग सिस्टममधील त्रुटीमुळे हॅकिंगचा धोका वाढला आहे. इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम (CERT-In) ने Apple iPhone आणि iPad युजर्ससाठी जारी केलेल्या या इशाऱ्याला उच्च जोखमीच्या श्रेणीत ठेवले आहे. विशेष म्हणजे, सरकारच्या या इशाऱ्याला अॅपलनेही दुजोरा दिला आहे. या सुरक्षा चेतावणीत अॅपलचा नवीन आयफोन 16 देखील सामील आहे. कंपनी लवकरच यासाठी एक नवीन अपडेट जारी करेल.
CERT-In च्या मते, iOS च्या काही कोर फाइल्समध्ये ही समस्या दिसून आली आहे. हॅकर्स या सुरक्षा त्रुटीचा फायदा घेऊन अॅपल आयफोन आणि आयपॅड युजर्सना लक्ष्य करू शकतात. अहवालात म्हटले आहे की, Apple च्या CoreOS मधील एका बिघाडामुळे अॅप्स युजर्सना त्यांच्या परवानगीशिवाय नोटीफिकेशन पाठवू शकतात, ज्यामुळे स्कॅमर्सना डिव्हाइसमध्ये प्रवेश मिळण्याचा मार्ग मोकळा होतो. याचा फायदा घेत हॅकर्स असे अॅप्स तयार करू शकतात, जे युजर्सना बनावट सिस्टम सूचना पाठवू शकतात.
यामुळे, आयफोन किंवा आयपॅड युजर्सचे अॅप्स क्रॅश होऊ शकतात किंवा काम करणे थांबवू शकतात, जे खूप धोकादायक ठरू शकते. अहवालानुसार, iOS 18.3 च्या आधीच्या व्हर्जन्समध्ये ही समस्या येऊ शकते. तर, iPadOS 17.7.3 किंवा त्यापूर्वीच्या व्हर्जन्समध्ये ही समस्या दिसून येईल.
या iPad आणि iPhone वर होणार परिणाम
iPhone 16 SeriesiPhone 15 SeriesiPhone 14 SeriesiPhone 13 SeriesiPhone 12 SeriesiPhone 11 SeriesiPad Pro 13-inch and 12.9-inch (3rd gen and later)iPad Pro 11-inch (1st gen and later)iPad Air (3rd gen and later)iPad (7th gen and later)iPad mini (5th gen and later)
काय करावं?तुम्ही जुने iOS किंवा iPadOS आयफोन आणि आयपॅड वापरत असाल, तर आपला डिव्हाईस तात्काळ अपडेट करा. यासाठी डिव्हाईससच्या सेटिंग्समध्ये जाऊन सॉफ्टवेअर अपडेट करुन घ्या.