iPhone 17 Series : आयफोन प्रेमींना मोठा झटका! नव्या 'आयफोन १७'साठी आता आणखी वाट बघावी लागणार; कारण काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2025 15:25 IST2025-09-15T15:22:31+5:302025-09-15T15:25:04+5:30
एकीकडे ग्राहकांची उत्सुकता शिगेला पोहोचलेली असताना, आता आयफोन १७च्या डिलिव्हरी मिळविण्यासाठी थोडी वाट पहावी लागू शकते.

iPhone 17 Series : आयफोन प्रेमींना मोठा झटका! नव्या 'आयफोन १७'साठी आता आणखी वाट बघावी लागणार; कारण काय?
IPhone 17 Series Delivery : गेल्या आठवड्यात 'अॅप्पल ऑ ड्रॉपिंग' या कार्यक्रमात ग्राहकांसाठी नवीन 'आयफोन १७' सीरिज आणि 'आयफोन एअर' लाँच करण्यात आले. अॅप्पलच्या नवीन सीरिजसाठी प्री-बुकिंग १२ सप्टेंबर पासून सुरू झाले आहे. आयफोनची ही नवीन सीरिज १९ सप्टेंबर पासून ग्राहकांना प्रत्यक्ष मिळण्यास सुरुवात होणार होती. एकीकडे ग्राहकांची उत्सुकता शिगेला पोहोचलेली असताना, आता ग्राहकांना डिलिव्हरी मिळविण्यासाठी थोडी वाट पहावी लागू शकते. म्हणजेच आता नाव आयफोन प्रत्यक्षात हातात येण्यासाठी ग्राहकांना आणखी काही दिवस वाट बघायला लागणार आहे. भारतातील किरकोळ विक्रेत्यांनाही स्टॉकची कमतरता भासत असल्याचे म्हटले जात आहे.
मनीकंट्रोलच्या अहवालानुसार, किरकोळ विक्रेत्यांनी देखील आयफोन १७ सीरिज आणि आयफोन एअरचा स्टॉक कमी मिळाल्याचे म्हटले आहे. आयफोनचा हा तुटवडा अॅप्पलच्या रिटेल नेटवर्कच्या विस्तारामुळे आहे, असे म्हटले जात आहे. विशेषतः आयफोन १७ प्रो आणि आयफोन १७ प्रो मॅक्सचा स्टोअर स्टॉक कमी झाला आहे.
कधी हातात येणार 'आयफोन १७'?
अॅप्पलच्या अधिकृत वेबसाइटनुसार, जर तुम्ही आज (१५ सप्टेंबर) आयफोन १७चा २५६ जीबी स्टोरेज व्हेरिएंट बुक केला, तर त्याची डिलिव्हरी २७ सप्टेंबर ते ५ ऑक्टोबर दरम्यान मिळेल. जर, तुम्ही आयफोन १७ प्रो ५१२ जीबी व्हेरिएंट बुक केला, तर डिलिव्हरी २७ सप्टेंबर ते ५ ऑक्टोबर दरम्यान मिळणार आहे.
जर, तुम्ही आयफोन १७ प्रो मॅक्स २ टीबी व्हेरिएंट बुक केला, तर डिलिव्हरीची तारीख ५ ऑक्टोबर ते ११ ऑक्टोबर दरम्यान आहे. जर, तुम्ही आज आयफोन १७ एअरचा बेस व्हेरिएंट (गोल्ड रोझ) बुक केला तर, त्याची डिलिव्हरी २७ सप्टेंबर ते ५ ऑक्टोबर दरम्यान मिळू शकते. आयफोनच्या डिलिव्हरीची तारीख वेगवेगळ्या स्टोरेज आणि कलर व्हेरिएंटनुसार बदलू शकते.
अहवालानुसार, भारतात नवीन आयफोन सीरिजचे उत्पादन सुरुवातीला बेस मॉडेलवर केंद्रित करण्यात आले आहे. प्रो आणि प्रो मॅक्स आयफोन मॉडेल्सच्या उत्पादनात काही आठवड्यांनंतर वाढ सुरू होते. सुमारे ५०० युनिट्सच्या शिपमेंटमध्ये, सुमारे ५० युनिट्स प्रोचे आहेत आणि १० युनिट्स प्रो मॅक्स मॉडेलचे आहेत. या अहवालानुसार, ५१२ जीबी आणि १ टीबी व्हेरिएंटचे युनिट्स देखील सध्या खूप कमी आहेत.