iPhone 17: अ‍ॅपल आज मोठा धमाका करणार! पहिल्यांदाच आयफोनमध्ये 'हे' ४ फीचर्स मिळण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2025 14:15 IST2025-09-09T14:13:43+5:302025-09-09T14:15:23+5:30

Awe Dropping: आज अ‍ॅपल कंपनी त्यांच्या 'अवे ड्रॉपिंग' लाईव्ह इव्हेंटमध्ये भारतासह जगभरात आयफोन १७ मालिका लॉन्च करणार आहे.

iPhone 17, iPhone 17 Pro, iPhone 17 Pro Max and iPhone 17 Air launching tonight | iPhone 17: अ‍ॅपल आज मोठा धमाका करणार! पहिल्यांदाच आयफोनमध्ये 'हे' ४ फीचर्स मिळण्याची शक्यता

iPhone 17: अ‍ॅपल आज मोठा धमाका करणार! पहिल्यांदाच आयफोनमध्ये 'हे' ४ फीचर्स मिळण्याची शक्यता

आज अ‍ॅपल कंपनी त्यांच्या 'अवे ड्रॉपिंग' लाईव्ह इव्हेंटमध्ये भारतासह जगभरात आयफोन १७ मालिका लॉन्च करणार आहे. मात्र, लॉन्चपूर्वीच या आगामी फोनबद्दल काही महत्त्वपूर्ण माहिती लीक झाली आहे. त्यानुसार, अ‍ॅपल आयफोन १७, आयफोन १७ प्रो आणि आयफोन १७ प्रो मॅक्ससह एकूण सात नवीन उत्पादने लाँच करण्याची शक्यता आहे. आयफोन १७ मालिकेत अनेक मोठे बदल अपेक्षित आहेत.

लीक झालेल्या माहितीनुसार, अ‍ॅपल कंपनी त्यांच्या नवीन आयफोन १७ मालिकेत चार नवीन मॉडेल्स लॉन्च करणार असल्याची माहिती आहे. गेल्या वर्षीच्या 'प्लस' मॉडेलऐवजी यावेळी कंपनी 'आयफोन १७ एअर' हे त्यांचे आतापर्यंतचे सर्वात पातळ मॉडेल लॉन्च करेल, असेही सांगितले जात आहे.  आयफोन १७ ची डिझाइन गेल्या वर्षीच्या आयफोन १६ सारखीच असेल. आयफोन १७ प्रो, आयफोन १७ प्रो मॅक्स आणि आयफोन १७ एअर यांची डिझाइन समान असण्याची शक्यता आहे. नवीन आयफोन १७ मालिका गेल्या वर्षाच्या तुलनेत सुमारे $५० (जवळपास ४,००० रुपये) महाग असू शकते. अधिकृत माहितीसाठी अ‍ॅपलच्या आजच्या 'अवे ड्रॉपिंग' लाईव्ह इव्हेंटची वाट पाहावी लागेल. 

 

अपेक्षित बदल

डिस्प्ले: आयफोन १७ मध्ये १२० हर्ट्झ (Hz) रिफ्रेश रेट असलेला डिस्प्ले असू शकतो. याआधी बेस मॉडेल्समध्ये फक्त ६० हर्ट्झ रिफ्रेश रेट मिळत होता. या बदलामुळे डिस्प्लेचा अनुभव अधिक चांगला होईल.

टेलिफोटो कॅमेरा: आतापर्यंत फक्त प्रो मॉडेल्समध्ये उपलब्ध असलेली ऑप्टिकल झूम लेन्स अपग्रेड केली जाण्याची शक्यता आहे. काही रिपोर्ट्सनुसार, आयफोन १७ मध्ये ४८ एमपीचा टेलिफोटो लेन्स दिला जाऊ शकतो.

सेल्फी कॅमेरा: आयफोन १७ सीरिजमध्ये सेल्फी कॅमेरा सुधारला जाण्याची शक्यता आहे. तर, समोरच्या बाजूला २४ एमपीचा फ्रंट कॅमेरा मिळू शकतो.

एआय फीचर्स: इतर कंपन्यांच्या तुलनेत अ‍ॅपल अजूनही एआयमध्ये मागे आहे, पण या इव्हेंटमध्ये कंपनी अ‍ॅपल इंटेलिजन्स अंतर्गत काही नवीन एआय फीचर्सची घोषणा करू शकते.

 

अपेक्षित किंमत

आयफोन १७: ८४,९०० रुपये 

आयफोन १७ एअर: १ लाख ०९ हजार ९०० रुपये

आयफोन १७ प्रो: १ लाख २४ हजार ९०० रुपये

आयफोन १७ प्रो मॅक्स: १ लाख ६४ हजार ९०० रुपये

Web Title: iPhone 17, iPhone 17 Pro, iPhone 17 Pro Max and iPhone 17 Air launching tonight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.