टाईप C पोर्ट अन् 48MP कॅमेरा; आज लॉन्च होणार iPhone 15; काय असेल किंमत? पाहा...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2023 03:21 PM2023-09-12T15:21:30+5:302023-09-12T15:24:26+5:30

iPhone 15 Price in India: Apple प्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. आज iPhone 15 सीरिज लॉन्च होणार आहे.

iPhone 15 Price in India: iPhone 15 will be launched today; What will be the price and features? see | टाईप C पोर्ट अन् 48MP कॅमेरा; आज लॉन्च होणार iPhone 15; काय असेल किंमत? पाहा...

टाईप C पोर्ट अन् 48MP कॅमेरा; आज लॉन्च होणार iPhone 15; काय असेल किंमत? पाहा...

googlenewsNext


iPhone 15 Price in India: Apple प्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. आज कंपनी Wanderlust Event 2023 मध्ये नवीन iPhone लॉन्च करणार आहे. या मेगा इव्हेंटसाठी (Apple Wonderlust 2023) फक्त काही तास उरले आहेत. Apple iPhone 15 लॉन्च होण्याआधी त्याचे अनेक फीचर्स लीक झाले आहेत. आता प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न येतोय की, या फोनची किंमत काय असेल? आम्ही तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरे देणार आहोत. 

अॅपल वंडरलस्ट इव्हेंट 2023
iPhone 15 सोबत iPhone 15 Plus, iPhone 15 Pro आणि iPhone 15 Pro Max देखील लॉन्च केले जाऊ शकतात. याशिवाय Apple Watch Series 9, iOS 17 अपडेट आणि USB-C केबल्सदेखील लॉन्च केले जाईल.

iPhone 15 चे फीचर्स
आयफोन 15 मॉडेलमध्ये डायनॅमिक आयलंड डिस्प्ले मिळू शकतो. यात पंच-होल डिस्प्ले डिझाइनदेखील मिळण्याची अपेक्षा आहे. आगामी फोन लाइटनिंग चार्जरसह येण्याऐवजी USB-C चार्जिंग सेटअपसह येऊ शकतो. iPhone 15 मध्ये तुम्हाला 48 मेगापिक्सेलचा कॅमेरा मिळण्याची शक्यता आहे.

iPhone 15 ची किंमत
आयफोन 15 सीरीजच्या किमतींबद्दल बोलायचे झाले तर, लॉन्च होण्यापूर्वीच त्याच्या संभाव्य किंमती समोर आल्या आहेत. भारतात या iPhone 15 चे बेस मॉडेल 79,900 रुपये असू शकते. या व्यतिरिक्त जर आपण iPhone 15 Plus च्या किंमतीबद्दल बोललो तर ते 89,900 रुपयांमध्ये येऊ शकते. त्यामुळे तुम्ही आतापासूनच पैशांचु जुळवाजूळव करू शकता.

अॅपल लॉन्च कुठे पहावे
अॅपलचा लॉन्च इव्हेंट अॅपल टीव्ही अॅपवर किंवा Apple च्या अधिकृत YouTube चॅनेलवर पाहू शकता. हा कार्यक्रम आज रात्री 10:30 वाजता सुरू होईल.

 

Web Title: iPhone 15 Price in India: iPhone 15 will be launched today; What will be the price and features? see

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.