अँड्रॉइडची बोलती बंद करण्यासाठी येतोय iPhone 14; लाँच डेट झाली लीक, या दिवशी येणार बाजारात  

By सिद्धेश जाधव | Published: May 19, 2022 04:52 PM2022-05-19T16:52:21+5:302022-05-19T16:52:38+5:30

आयफोन 14 सीरिजची लाँच डेट ऑनलाईन लीक झाली आहे. या सीरिजमध्ये iPhone 14, iPhone 14 Pro, iPhone 14 Max आणि iPhone 14 Pro Max मॉडेल्स येऊ शकतात.  

iPhone 14 Launch Date Leaked Along With Price   | अँड्रॉइडची बोलती बंद करण्यासाठी येतोय iPhone 14; लाँच डेट झाली लीक, या दिवशी येणार बाजारात  

अँड्रॉइडची बोलती बंद करण्यासाठी येतोय iPhone 14; लाँच डेट झाली लीक, या दिवशी येणार बाजारात  

Next

iPhone लाँच फक्त अ‍ॅप्पल प्रेमींसाठी नव्हे तर अन्य स्मार्टफोन युजर्ससाठी महत्वाचा असतो. या इव्हेंटमधून जगासमोर ठेवलेल्या फीचर्सचं अनुकरण इतर कंपन्या देखील करतात. त्यामुळे नवीन आयफोन्सच्या लाँचची वाट जगभरात बघितली जाते. सध्या iPhone 14 वर सर्वांचं लक्ष आहे, आता या हँडसेटच्या लाँचची तारीख ऑनलाईन लीक झाली आहे.  

रिपोर्टनुसार आयफोन 14 सीरीज यंदा 13 सप्टेंबरला सादर करण्यात येईल. याबाबत Apple नं कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही. यावर्षी देखील कंपनी लाँच इव्हेंट ऑनलाइन करू शकते. तसेच लीक रिपोर्टनुसार, आयफोन 14 सह कंपनी आपले इतरही काही प्रोडक्ट्स बाजारात आणू शकते. ज्यात AirPods Pro 2, AirPods Pro 3 आणि तीन नवीन अ‍ॅपल वॉचचा समावेश असू शकतो.  

रिपोर्टनुसार, 13 सप्टेंबरला अ‍ॅपल आयफोन 14 सीरिजमध्ये 4 मॉडेल सादर केले जाऊ शकतात. कंपनी iPhone 14, iPhone 14 Pro, iPhone 14 Max आणि iPhone 14 Pro Max एकत्र बाजारात आणेल. या स्मार्टफोन्सच्या स्पेक्स आणि फीचर्सची बरीचशी माहिती ऑनलाईन लीक झाली आहे. परंतु ठोस स्पेक्स लाँच इव्हेंटच्या दिवशीच समजतील.  

लिक्समधून आयफोन 14 ची किंमत देखील समजली आहे. iPhone 14 ची किंमत 799 डॉलरपासून सुरु होतील. तर iPhone 14 Pro Max सीरिजमध्ये सर्वात वर असेल. ज्याची किंमत जवळपास 2 हजार डॉलर असू शकते. रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे की, iPhone 14 Max एक अलग व्हर्जन असेल ज्याची किंमत 899 डॉलर पर्यंत असू शकते.  

Web Title: iPhone 14 Launch Date Leaked Along With Price  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Apple Incअॅपल