Intex ने लॉन्च केला ड्यूल सेल्फी कॅमेराचा स्वस्तात मस्त स्मार्टफोन!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2018 11:30 AM2018-09-21T11:30:39+5:302018-09-21T11:31:19+5:30

भारतीय मोबाईल कंपनी इंटेक्सने आपला नवा Intex Staari 11 हा स्मार्टफोन लॉन्च केला आहे. Intex Staari 11 हा स्मार्टफोन एक्सक्लूसिव्ह Snapdeal वर विक्रीसाठी ठेवण्यात आला आहे.

Intex Staari 11 launched in India with dual selfie camera | Intex ने लॉन्च केला ड्यूल सेल्फी कॅमेराचा स्वस्तात मस्त स्मार्टफोन!

Intex ने लॉन्च केला ड्यूल सेल्फी कॅमेराचा स्वस्तात मस्त स्मार्टफोन!

googlenewsNext

नवी दिल्ली : भारतीय मोबाईल कंपनी इंटेक्सने आपला नवा Intex Staari 11 हा स्मार्टफोन लॉन्च केला आहे. Intex Staari 11 हा स्मार्टफोन एक्सक्लूसिव्ह Snapdeal वर विक्रीसाठी ठेवण्यात आला आहे. हा फोन दोन कलर व्हेरिएंटमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. या स्मार्टफोनची खासियत म्हणजे यात बोकेह इफेक्ट, बॅकग्राऊंड चेंड, नाइट शॉट, फेस ब्यूटी, फेस डिटेक्शन, पॅनोरामा आणि बर्स्ट मोडसारखे कॅमेरा फीचर्स देण्यात आले आहेत. 

Intex Staari 11 ची किंमत

Intex Staari 11 या स्मार्टफोनची किंमत ४, ९९९ रुपये ठेवण्यात आली आहे. या फोनची विक्री ई-कॉमर्स साइट स्नॅपडीलवर केली जाईल. जर तुम्ही SBI डेबिट कार्ड यूजर असाल तुम्हाला फोन खरेदीवर १० टक्क्यांची सूटही दिली जाणार आहे. 

Intex Staari 11 चे स्पेसिफिकेशन

Intex Staari 11 मध्ये ५ इंच एचडी आयपीएस स्क्रीन डिस्प्ले आहे. स्क्रीन रिझोल्यूशन 1280x720 पिक्सल आहे आणि सुरक्षेसाठी  2.5डी कर्व्ड ग्लास दिला आहे. तसेच फोनमध्ये 1.3 गीगाहर्ट्ज क्वाड-कोर प्रोसेसर आहे. त्यासोबतच या फोनमध्ये 2 जीबीची रॅम आणि १६ जीबी स्टोरेज दिलं आहे. स्टोरेज तुम्ही १२८ जीबीपर्यंत वाढवू शकता. 

फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये फ्लॅशसोबतच ८ मेगापिक्सल रिअर कॅमेरा देण्यात आला आहे. याच्या कॅमेराची खासियत म्हणजे याचा फ्रन्ट कॅमेरा आहे. सेल्फीची आवड असणाऱ्या डोळ्यासमोर ठेवून फोनमध्ये समोरच्या बाजूस ड्यूल कॅमेरा सेटअप दिला आहे. प्रायमरी सेंसर ८ मेगापिक्सलचा आहे आणि सेकंडरी सेंसर २ मेगापिक्सला आहे.

Web Title: Intex Staari 11 launched in India with dual selfie camera

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.