जो तो एआयच्या मागे लागलाय...! इंटेलच्या CEO नी यासाठी राजीनामा दिला; आता ₹९१५ कोटी लावून...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2025 14:06 IST2025-10-29T14:05:38+5:302025-10-29T14:06:18+5:30
Intel's CEO Patrick Gelsinger resigned: इंटेलचे माजी सीईओ पॅट्रिक गेलसिंगर यांनी पद सोडून ₹९१५ कोटी गुंतवून 'ख्रिश्चन AI' प्रकल्प सुरू केला आहे. येशू ख्रिस्ताच्या पुनरागमनावर मोठा दावा. ग्लू (Gloo) कंपनीच्या माध्यमातून AI आणि धर्माचा संगम घडवणार आहेत.

जो तो एआयच्या मागे लागलाय...! इंटेलच्या CEO नी यासाठी राजीनामा दिला; आता ₹९१५ कोटी लावून...
जगातील सर्वात मोठी चिप उत्पादक कंपनी इंटेलचे मुख्य कार्यकारी अधिकारी पॅट्रिक गेलसिंगर यांनी तंत्रज्ञान क्षेत्रात एक मोठा आणि अनोखा निर्णय घेतला आहे. त्यांनी आपले पद सोडून आता धार्मिक मूल्यांवर आधारित AI तयार करण्याच्या एका नवीन मिशनला सुरुवात केली आहे. या प्रकल्पासाठी त्यांनी सुमारे ₹९१५ कोटी ($११० दशलक्ष) इतकी मोठी रक्कम उभी केली आहे.
गेलसिंगर, जे स्वतःला 'बॉर्न-अगेन ख्रिश्चन' मानतात, ते आता 'ग्लू' या त्यांच्या नव्या कंपनीच्या माध्यमातून AI ला ख्रिस्ती मूल्यांशी जोडण्याचे काम करत आहेत. ज्याप्रमाणे मार्टिन ल्यूथर यांनी प्रिंटिंग प्रेसचा वापर करून धर्मसुधार केला, त्याचप्रमाणे AI हे येशू ख्रिस्ताचे पुनरागमन लवकर होण्यास मदत करेल, असे त्यांना वाटत असल्याचे वृत्त 'द गार्डियन'ने दिले आहे.
ग्लू कंपनी चर्च, पाद्री आणि धार्मिक संस्थांना आधुनिक AI साधनांनी सशक्त करत आहे. ही कंपनी मोठ्या भाषा मॉडेल्सवर आधारित असे टेक उत्पादने तयार करत आहे, जी वापरकर्त्यांच्या धार्मिक श्रद्धांना प्रतिबिंबित करतील. गेलसिंगर हे आता ग्लू कंपनीचे कार्यकारी अध्यक्ष आणि तंत्रज्ञान प्रमुख बनले आहेत.
सिलिकॉन व्हॅलीत वाढता धार्मिक प्रभाव
गेलसिंगर यांचा हा निर्णय अशा वेळी आला आहे, जेव्हा सिलिकॉन व्हॅलीमध्ये, जो एकेकाळी नास्तिकतेचा गड मानला जात होता, तेथे धार्मिक (विशेषतः ख्रिस्ती) विचारांचा प्रभाव वाढत आहे. पीटर थीएल आणि आंद्रेसेन होरोविट्झच्या कॅथरीन बॉयलसारख्या अनेक महत्त्वाच्या व्यक्ती या बदलामध्ये सहभागी आहेत.