तुमचं Instagram अकाऊंट होणार बंद; ‘हे’ छोटंसं काम न केल्यास कंपनी घेऊ शकते मोठा निर्णय 

By सिद्धेश जाधव | Published: May 5, 2022 04:36 PM2022-05-05T16:36:11+5:302022-05-05T16:36:31+5:30

Instagram युजर्सना त्यांचं अकाऊंट गमवावं लागू शकतं. कंपनीनं काही नियमांमध्ये बदल केले आहेत. ज्यांचं पालन न केल्यास तुमचं अकाऊंट बंद होऊ शकतं.  

Instagram Made It Compulsory For Every User To Submit Their Birth Date Know Why   | तुमचं Instagram अकाऊंट होणार बंद; ‘हे’ छोटंसं काम न केल्यास कंपनी घेऊ शकते मोठा निर्णय 

तुमचं Instagram अकाऊंट होणार बंद; ‘हे’ छोटंसं काम न केल्यास कंपनी घेऊ शकते मोठा निर्णय 

googlenewsNext

गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये, Instagram नं घोषणा केली होती की युजर्सना त्यांची जन्म तारीख अ‍ॅपमध्ये अपडेट करावी लागेल. यासाठी एक अलर्ट नोटिफिकेशन देखील जारी करण्यात येईल. योग्य जन्म तारीख अपडेट करणं फोटो शेयरिंग अ‍ॅपच्या प्रत्येक युजर्ससाठी बंधनकारक करण्यात आलं आहे. आता ज्या युजर्सनी आपलं प्रोफाईल बर्थ डेट टाकून अपडेट केलं नाही, त्यांना अ‍ॅप वापरता येणार नाही.  

युजर्सनी मात्र याविषयीच नाराजी ट्विटरवरून व्यक्त केली आहे. कारण जेव्हा युजर्स इंस्टाग्राम ओपन करत आहेत तेव्हा त्यांना बर्थ डेट विचारली जात आहे. युजर्स ही स्टेप वगळून अ‍ॅपचा वापर करता यावा, अशी मागणी करत आहेत. परंतु जन्म तारखे नसल्यामुळे इतकी कठोर कारवाई करण्यामागची दोन कारणं इंस्टाग्रामनं सांगितली आहेत. 

सुरक्षा 

इंस्टाग्राम युजरच्या वयानुसार अ‍ॅपवरील अनेक गोष्टी सेट केली जातात. Instagram च्या एका पॉलिसीनुसार 13 वर्षांपेक्षा लहान युजर्सना प्लॅटफॉर्मवर अकाऊंट बनवता येत नाही. तसेच 16 वर्षाखालील युजर्सचं अकाऊंट बाय डिफॉल्ट पर्सनलवर सेट करण्यात येत. सर्वात कमी वयाच्या युजर्सना सुरक्षित वाटावं म्हणून जन्मतारीख देणं बंधनकारक करण्यात आलं आहे.  

टारगेटेड पोस्ट आणि जाहिराती 

या प्लॅटफॉर्मवर युजर्सना त्यांच्या आवडीचा कंटेंट दाखवण्यासाठी जन्म तारीख आवश्यक आहे. तसेच जाहिराती देखील युजर्सच्या वयानुसार दाखवणं सोपं जाईल. Instagram नं मान्य केलं आहे कि ही माहिती युजर एक्सपीरियंस पर्सनलाइज्ड करण्यास मदत करेल.  

खोटी जन्मतारीख टाकली तर?   

इंस्टाग्रामनं याचा देखील विचार केला आहे. कंपनीला माहित आहे की काही लोक त्यांना चुकीची जन्मतारीख सांगू शकतात. यासाठी ते नवीन सिस्टम डेवलप करत आहेत. ज्यात आर्टिफिशियल इंटेलिजेंसचा वापर करून अन्दाज लावण्यात येईल. यासाठी युजर्सना टॅग करण्यात आलेल्या ‘हॅप्पी बर्थ डे’ पोस्ट्सचा वापर करण्यात येईल.  

Web Title: Instagram Made It Compulsory For Every User To Submit Their Birth Date Know Why  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.