भारत बनणार Ai हब! 'या' शहरात सुरू होणार ChatGPT बनवणाऱ्या OpenAI चे पहिले ऑफिस

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2025 15:17 IST2025-08-22T15:13:09+5:302025-08-22T15:17:10+5:30

OpenAI लवकरच भारतात आपले पहिले ऑफिस सुरू करणार आहे; यासाठी भरतीही सुरू झाली आहे.

India will become an Ai hub! The first office of OpenAi will open in delhi | भारत बनणार Ai हब! 'या' शहरात सुरू होणार ChatGPT बनवणाऱ्या OpenAI चे पहिले ऑफिस

भारत बनणार Ai हब! 'या' शहरात सुरू होणार ChatGPT बनवणाऱ्या OpenAI चे पहिले ऑफिस


आयटी कंपन्यांसाठी भारत एक मोठी बाजारपेठ आहे. गेल्या काही दशकांमध्ये अनेक दिग्गज आयटी कंपन्यांनी भारतातील विविध शहरांमध्ये आपले ऑफिस सुरू केले आहे. यामध्ये हजारो भारतीय काम करतात. यामध्ये ChatGPT तयार करणारी कंपनी OpenAI ची भर पडणार आहे. कंपनी या वर्षाच्या अखेरीस नवी दिल्लीत आपले पहिले ऑफिस उघडणार आहे. 

भारतात आपले पहिले ऑफिस उघडण्यामागील कारण म्हणजे, ओपनएआय आता आपली उपस्थिती आणखी मजबूत करू इच्छिते. कंपनीसाठी भारत एक मोठी आणि महत्त्वाची बाजारपेठ आहे. भारतात उघडल्या जाणाऱ्या या नवीन ऑफिससाठी स्थानिक टीम नियुक्त करण्याचे काम देखील सुरू झाले आहे. OpenAI ची ही नवीन टीम स्थानिक भागीदार, सरकार, विकासक, व्यावसायिक कंपन्या आणि शैक्षणिक संस्थांशी संबंध मजबूत करण्यावर लक्ष केंद्रित करेल.

भारतात उत्तम प्रतिभा 
ओपनएआयचे सीईओ सॅम ऑल्टमन म्हणाले की, भारतात Ai साठी अविश्वसनीय संधी आहे. जागतिक एआय लीडर बनण्यासाठी भारतात सर्व आवश्यक घटक आहेत, जसे की अद्भुत तंत्रज्ञान, जागतिक दर्जाचे डेव्हलपर इकोसिस्टम आणि इंडियाएआय मिशनद्वारे मजबूत सरकारी पाठिंबा. देशभरात एआय अधिक सुलभ बनवण्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पहिले पाऊल आहे आणि भारतासाठी आणि भारतासोबत एआय तयार करण्याची आमची वचनबद्धता आहे.

केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले...
केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की, भारतात कंपनी स्थापन करण्याचा ओपनएआयचा निर्णय डिजिटल नवोन्मेष आणि एआय स्वीकारण्यात देशाच्या वाढत्या नेतृत्वाचे प्रतिबिंब आहे. डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा, एआय प्रतिभा आणि एंटरप्राइझ स्केल सोल्यूशन्समध्ये मजबूत गुंतवणूकीसह, भारत एआय परिवर्तनाच्या पुढील लाटेला चालना देण्यासाठी अद्वितीय स्थितीत आहे. प्रत्येक नागरिकापर्यंत एआयचे फायदे पोहोचवण्यासाठी या दृष्टिकोनाला पुढे नेण्यासाठी ओपनएआयच्या भागीदारीचे आम्ही स्वागत करतो.

Web Title: India will become an Ai hub! The first office of OpenAi will open in delhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.