करोडो बॅक्टेरिया असलेला मोबाईल, लॅपटॉप सॅनिटायझरने साफ केला तर...; कोरोनानंतरही तुम्ही असे करता...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2025 14:18 IST2025-01-02T14:18:09+5:302025-01-02T14:18:21+5:30
इकडचे-तिकडचे हात त्या मोबाईलला लागलेले असतात. तेच मग लॅपटॉपलाही लागते. अनेक संशोधनांत तर कुठे एवढे बॅक्टेरिया सापडणार नाहीत तेवढे मोबाईल आणि लॅपटॉपच्या किबोर्डवर सापडतात असेही समोर आले आहे.

करोडो बॅक्टेरिया असलेला मोबाईल, लॅपटॉप सॅनिटायझरने साफ केला तर...; कोरोनानंतरही तुम्ही असे करता...
आजकाल प्रत्येक ठिकाणी मोबाईल, लॅपटॉप नेण्याची लोकांना सवय झालेली आहे. अनेकजण तर बाथरुममध्ये देखील मोबाईल घेऊन बसतात. इकडचे-तिकडचे हात त्या मोबाईलला लागलेले असतात. तेच मग लॅपटॉपलाही लागते. अनेक संशोधनांत तर कुठे एवढे बॅक्टेरिया सापडणार नाहीत तेवढे मोबाईल आणि लॅपटॉपच्या किबोर्डवर सापडतात असेही समोर आले आहे. यामुळे दोन-चार महिन्यांतून अनेकांना मोबाईल, लॅपटॉप स्वच्छ करण्याची इच्छा होते आणि ते तो स्वच्छही करतात.
आपला मोबाईल, लॅपटॉप स्वच्छ, चकचकीत दिसण्यासाठी अनेकजण बाजारात मिळत असलेल्या सोल्यूशनचा वापर करतात, काहीजण सॅनिटायझरचा वापर करतात. कोरोना काळात तर लोकांनी छोट्यातल्या छोट्या वस्तू सॅनिटायझरने स्वच्छ केल्या आहेत. आता या वापरला लोक सरावले आहेत आणि आजही मोबाईल, लॅपटॉप स्वच्छ करण्यासाठी सॅनिटायझरचा वापर केला जात आहे. तुम्हीही करत असाल तर सावध रहा...
असे करून तुम्ही कळत नकळत तुमचे डिव्हाईस खराब करत आहात. अनेक प्रकारचे रासायनिक घटक या सॅनिटायझरमध्ये असतात. जसे अल्कोहोल आणि इतर एजंट सॅनिटायझरमध्ये आढळतात. यामुळे स्क्रीन खराब होऊ शकते. त्याचा जास्त प्रमाणात वापर केल्यास लॅपटॉप स्क्रीन खराब होऊ शकते तसेच तांत्रिक बिघाड होऊ शकतो.
या रसायनांमुळे स्क्रीनच्या काचेवर पांढरट डाग पडू शकतात. यामुळे स्क्रीनवर स्क्रॅचही येऊ शकतात. डिव्हाइस वारंवार स्वच्छ करण्याची गरज वाढते. टच स्क्रीनची सेन्सिटीव्हीटी देखील कमी होऊ शकते. यामुळे सॅनिटायझरने फोन निर्जंतुक करणे घातक ठरू शकते.