शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
3
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
4
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
5
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
6
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
7
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
8
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
9
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
10
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
11
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
12
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
13
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
14
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
15
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
16
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
17
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
18
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
19
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
20
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे

हुआवे आणणार स्वत:ची ऑपरेटींग सिस्टीम

By शेखर पाटील | Updated: May 3, 2018 08:20 IST

स्मार्टफोनसह अन्य संगणकीय उपकरणांमधील आघाडीचे नाव असणार्‍या हुआवेने आता स्वत:ची ऑपरेटींग सिस्टीम विकसित करण्याचे संकेत दिले आहेत.

स्मार्टफोनसह अन्य संगणकीय उपकरणांमधील आघाडीचे नाव असणार्‍या हुआवेने आता स्वत:ची ऑपरेटींग सिस्टीम विकसित करण्याचे संकेत दिले आहेत. सध्या जगभरातील स्मार्टफोन्समध्ये अँड्रॉइड प्रणालीचा सर्वाधीक वापर केला जातो. याच्या खालोखाल आयओएसचा क्रमांक असला तरी या दोन्हींच्या मार्केट शेअरमध्ये प्रचंड तफावत आहे. अर्थात अँड्रॉइडच्या मिरासदारीला अ‍ॅपलची आयओएस प्रणाली टक्कर देऊ शकेल अशी आजची स्थिती नाही. अर्थात अँड्रॉइडच्या पहिला क्रमांकाला सध्या तरी धोका नसल्याची बाब उघड आहे. तथापि, आता हुआवे या मातब्बी चीनी कंपनीने स्वत:ची ऑपरेटींग प्रणाली विकसित करण्यास प्रारंभ केल्याची माहिती आता समोर आली आहे. हुआवे आणि या कंपनीचा ब्रँड असणार्‍या ऑनरने चीन, भारत व अमेरिकेसह अन्य राष्ट्रांमध्ये जोरदार मुसंडी मारली आहे. यांचे स्मार्टफोन हे अँड्रॉइड प्रणालीवर चालणारे आहेत. तथापि, अमेरिकेमध्ये लायसन्सींगच्या मुद्यावरून अनेक चीनी कंपन्यांवर तेथील सरकारची कडक नजर आहे. यातच आता अमेरिकन सरकारने याच कारणावरून झेडटीई या चीनी कंपनीचे लायसन्स रद्द केले आहे. हुआवेवरही भविष्यात या प्रकारची स्थिती ओढवू शकते. नेमक्या याच कारणामुळे हुआवेने आता अँड्रॉइड सोडून स्वत:ची ऑपरेटींग प्रणाली विकसित करण्यात सुरूवात केल्याची माहिती समोर आली आहे. हुआवेने याला दुजोरा दिला नसला तरी नकारदेखील दिलेला नाही हे विशेष.

दरम्यान, विविध लीक्सच्या माध्यमातून हुआवेच्या या आगामी ऑपरेटींग सिस्टीमची माहिती समोर आली आहे. यानुसार ही प्रणाली लिनक्स या मुक्तस्त्रोत ऑपरेटींग सिस्टीमपासूनच विकसित करण्यात येत आहे. सर्वात लक्षणीय बाब म्हणजे या प्रणालीच्या स्मार्टफोनवर अँड्रॉइडचे अ‍ॅप्सदेखील चालू शकणार आहेत. अर्थात अँड्रॉइडपासून पूर्णपणे विभक्त होण्याआधी हुआवे सावध पवित्रा घेत असल्याचे यातून स्पष्ट झाले आहे. येत्या कालखंडात याबाबत कंपनीतर्फे अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :technologyतंत्रज्ञान