ट्रिपल रिअर कॅमेरा असलेला Huawei Mate 20 Pro स्मार्टफोन भारतात लाँच
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2018 15:06 IST2018-11-27T14:56:22+5:302018-11-27T15:06:37+5:30
चीनची स्मार्टफोन कंपनी Huawei ने आपला नवीन स्मार्टफोन भारतीय बाजारात आणला आहे. कंपनीने Huawei Mate 20 Pro हा स्मार्टफोन लाँच केला आहे.

ट्रिपल रिअर कॅमेरा असलेला Huawei Mate 20 Pro स्मार्टफोन भारतात लाँच
नवी दिल्ली : चीनची स्मार्टफोन कंपनी Huawei ने आपला नवीन स्मार्टफोन भारतीय बाजारात आणला आहे. कंपनीने Huawei Mate 20 Pro हा स्मार्टफोन लाँच केला आहे. हा स्मार्टफोन मिडनाइट ब्लू, ब्लॅक आणि ट्वाइलाइट या तीन कलरमध्ये ग्राहकांना मिळणार आहे. तसेच, 4 जीबी रॅम आणि 128 जीबी मेमरी असलेल्या या स्मार्टफोनची किंमत 69,990 रुपये इतकी आहे.
दरम्यान, लाँचिंगच्या ऑफरनुसार कंपनी सनहायजर कंपनीचा हेडफोन 2000 रुपयांना देत आहे. याची मूळ किंमत 29,000 रुपये इतकी असल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या हा स्मार्टफोन अॅमेझॉनच्या वेबसाइटवर ग्राहक खरेदी करु शकणार आहेत. अॅमेझॉनवर 71,990 रुपयांना हा स्मार्टफोन मिळणार आहे. तसेच, सेलची सुरुवात प्राइम मेंबर्ससाठी 3 डिसेंबरपासून सुरु होणार आहे.
Huawei Mate 20 Pro चे स्पेसिफिकेशन्स
- ड्युअल सिम
- अॅन्ड्राईड 9.0 पाय बेस्ड EMUI 9.0
- 6.39 इंचाचा क्वॉड एचडी प्लस डिस्प्ले
- OLED डिस्प्ले पॅनल यूज
- 6GB/ 8GB रॅमसोबत फ्लॅगशिप HiSilicon Kirin 980 प्रोसेसर
- इंटरनल मेमरी 128/ 256GB
- ट्रिपल कॅमेरा सेटअप
- 4,200mAh क्षमतेची बॅटरी
- 4G LTE, Wi-Fi 802.11ac, ड्युअल बँड ब्लूट्यूथ v5.0, aptX सोबत ब्लूट्यूथ v5.0 LE, GPS/ A-GPS, ग्लोनास आणि एक USB टाइप-C पोर्टचा सपोर्ट.