शहरं
Join us  
Trending Stories
1
"आशिष शेलारांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले.."; उद्धव ठाकरेंनी केले कौतुक, नेमकं काय म्हणाले?
2
'आमच्याकडे सर्वाधिक अणुबॉम्ब, पृथ्वी 150 वेळा नष्ट होईल', डोनाल्ड ट्रम्पचा यांचा धक्कादायक दावा
3
Gen Z युवकांना सरकार का घाबरतंय?; उद्धव ठाकरेंचा सवाल, शाखेत उभी राहणार 'मतदार ओळख केंद्र'
4
Gold Silver Price 3 Nov: सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा बदल; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट Gold चे लेटेस्ट रेट
5
पाकिस्तानने अण्वस्त्रचाचणी केली, डोनाल्ड ट्रम्प यांचा सनसनाटी दावा, दक्षिण आशियात तणाव वाढणार?
6
पडद्यामागचे तीन ‘शिल्पकार’! 'या' त्रिसूत्री धोरणासह भारतीय महिला संघानं लिहिली अविस्मरणीय स्क्रिप्ट
7
"मी तर चांगलं काम केलं होतं...", राष्ट्रीय पुरस्कार उशिरा मिळाल्याने शाहरुख खानने व्यक्त केली खंत
8
Tulasi Vivah 2025: तुलसी विवाहासाठी रामा तुळस योग्य की श्यामा? जाणून घ्या मुख्य भेद 
9
चीनला शह देण्याचा प्रयत्न! भारत ₹७००० कोटींपेक्षा अधिक रकमेची बनवतोय योजना
10
राज ठाकरे सकाळी ९च्या गर्दीत बदलापूर-कल्याणला चढून लोकल ट्रेनमध्ये विंडो सीट पकडू शकतील का?
11
Deepti Sharma : "मुलीला क्रिकेट खेळू देऊ नका..."; दीप्ती शर्माचे आई-वडील भावुक, सांगितला संघर्षमय प्रवास
12
टाटा ट्रस्ट्समध्ये नवा पेच! पुनर्नियुक्ती नाकारल्यानंतर मेहेली मिस्त्री यांचं मोठं पाऊल; सर्वांनाच पाठवली नोटीस
13
एकनाथ खडसेंच्या बंगल्यातून CD, पेनड्राईव्ह, कागदपत्रे चोरी झालेच नाहीत?, पोलीस तपासात काय समोर आलं?
14
राज ठाकरेंना दोन लाख मुस्लीम दुबार मतदार का दिसले नाहीत? शेलार म्हणाले, 'अजून वेळ गेलेली नाही'
15
'सीपीआर द्यायचं माहीत नाही, व्हिडीओ काढले'; महिला वकिलाचा कोर्टातच दुर्दैवी मृत्यू, शेजारीच होते रुग्णालय
16
हनिमूनसाठी जोडप्याने बुक केली दुबई ट्रीप, लाखो रुपये दिले; परदेशात पोहोचल्यावर बसला मोठा धक्का!
17
पाकिस्तानबद्दल एक गोष्ट सांगून डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचं टेंशन वाढवलं? असं काय म्हणाले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष?
18
यूपी, बंगाल, तामिळनाडूसह 12 राज्यांमध्ये उद्यापासून SIR प्रक्रिया सुरू; 'या' पक्षांचा तीव्र विरोध...
19
'भुल भूलैया ४'मध्ये अक्षय कुमार-कार्तिक आर्यन एकत्र येणार? चर्चा सुरु; दिग्दर्शक म्हणाले...

Huawei च्या नव्या फोनची हवाच निघते तेव्हा... जाहिरातींमध्ये असा दाखवतात क्लिअर सेल्फी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2018 18:51 IST

मोबाईल कंपन्यांच्या जाहिरातीची पोलखोल; व्यावसायिक स्पर्धेत स्मार्ट तरुणाईला मूर्ख बनविण्याचे धंदे

नवी दिल्ली : सेल्फीची क्रेझ असलेल्या तरुणाईला आपल्याकडे वळविण्यासाठी मोबाईल कंपन्या काय काय करतील याचा नेम नाही. काही कंपन्यांनी 13 मेगापिक्सलपासून तब्बल 24 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरे दिले आहेत. मात्र, या खेचाखेचीच्या स्पर्धेत याच स्मार्ट तरुणाईला मूर्ख बनविण्याचे धंदेही या कंपन्या करताना दिसत आहेत. 

 Huawei या कंपनीने नुकताच Nova 3 हा स्मार्टफोन लाँच केला आहे. याच्या जाहिरातीमध्ये या फोनच्या कॅमेरॅतून कसा एकदम नितळ, सुंदर सेल्फी काढता येतो याचा दावाही या कंपनीने केला आहे. मात्र, हा सेल्फी काढण्यासाठी कंपनीने नोव्हा 3 या फोनचा नव्हे तर चक्क डीएसएलआर या उच्च प्रतीच्या कॅमेऱ्याचा वापर केला आहे. या जाहिरातीमध्ये दिसणाऱ्या मॉडेलने चुकुन पोस्ट केलेल्या एका फोटोमुळे हुवाई या कंपनीचे बिंग फुटले आहे. 

या मॉडेलने सोशल मिडीयावर या जाहिरातीचा 'बिहाइंड द सीन'चा फोटो टाकल्याने Huawei या कंपनीची पोलखोल झाली आहे. या फोटोमध्ये मॉडेलला मोबाईल पकडल्याची अॅक्टींग करण्यास सांगण्यात आले व डीएसएलआर द्वारे फोटो काढल्याचे दिसत आहे. हुवाई कंपनीच्या नोव्हा 3 या फोनमध्ये 24 आणि 2 मेगापिक्सल असा ड्युअल फ्रँट कॅमेरा दिला आहे. कंपनीने या फोनला सेल्फी फोन असल्याचे सांगत लाँच केला आहे. 

यापूर्वीही कंपनीकडून फसवणूकया कंपनीने यापूर्वीही कंपनीने ग्राहकांची अशीच फसवणूक केली होती. P9 या स्मार्टफोनची जाहिरात करताना एक कॅमेरा क्वालिटी दाखविणारा फोटो गुगल प्लसवर टाकला होता. मात्र, हा फोटो Canon E)S 5D Mark III या उच्च दर्जाच्या डीएसएलआरद्वारे काढल्याचे स्पष्ट झाले होते. यानंतर कंपनीने माफीही मागितली होती.

टॅग्स :huaweiहुआवेtechnologyतंत्रज्ञानfraudधोकेबाजी