स्वस्त गेमिंग स्मार्टफोन HP Victus भारतात लाँच; जाणून घ्या स्पेसिफिकेशन्स आणि किंमत 

By सिद्धेश जाधव | Published: July 28, 2021 04:59 PM2021-07-28T16:59:44+5:302021-07-28T17:00:46+5:30

HP Victus 16 Gaming laptops: HP Victus चे किफायतशीर गेमिंग लॅपटॉप भारतात लाँच झाले आहेत. या लॅपटॉप्सची किंमत 64,999 रुपयांपासून सुरु होत आहे.  

hp victus gaming laptop india price specs | स्वस्त गेमिंग स्मार्टफोन HP Victus भारतात लाँच; जाणून घ्या स्पेसिफिकेशन्स आणि किंमत 

स्वस्त गेमिंग स्मार्टफोन HP Victus भारतात लाँच; जाणून घ्या स्पेसिफिकेशन्स आणि किंमत 

googlenewsNext

HP ने भारतात नवीन किफायशीर गेमिंग लॅपटॉप आपल्या Victus सीरिज अंतर्गत लाँच केले आहेत. एचपी विक्टस सीरिज Intel आणि AMD अश्या दोन्ही प्रोसेसरसह सादर करण्यात आली आहे. भारतात खूप कमी गेमिंग लॅपटॉप्स आहेत जे एएमडी ग्राफिक कार्डसह येतात त्यापैकी एक एचपी विक्टस एका आहे. हे लॅपटॉप्स भारतीय ग्राहकांचा विचार करून बनवण्यात आले आहेत, तसेच यांची किंमत देखील भारतीयांच्या खिशाला परवडेल अशी ठेवण्यात आली आहे, असे कंपनीचे म्हणणे आहे.  (HP Victus 16 Gaming Laptops With Nvidia GeForce RTX 30 Series GPUs Launched in India)

HP Victus ची किंमत  

HP Victus E सीरिजचे AMD Ryzen प्रोसेसर असलेले लॅपटॉप अ‍ॅमेझॉनवर खरेदीसाठी उपलब्ध होतील, यांची किंमत 64,999 रुपयांपासून सुरु होईल. HP Victus D सीरिजच्या लॅपटॉप्समध्ये 11th-gen Intel Tiger Lake प्रोसेसर देण्यात आला आहे आणि हे लॅपटॉप्स रिलायन्स डिजिटलवरून विकत घेता येतील. डी सीरिज एचपी विक्टसची आरंभिक किंमत 74,999 रुपये असेल.  

HP Victus चे स्पेसिफिकेशन्स  

वर सांगितल्याप्रमाणे HP Victus लॅपटॉप्स Intel आणि AMD प्रोसेसर्ससह उपलब्ध होतील. या सीरिजमध्ये AMD चे Ryzen 5 5600H आणि Ryzen 7 5800H या दोन प्रोसेसरमधून निवड करता येईल. सोबत AMD Radeon RX 5600M किंवा Nvidia GeForce RTX 3060 ग्राफिक कार्डचा पर्याय मिळेल. Intel चे चाहते Core i5-11300H किंवा Core i7-11800H पैकी एक प्रोसेसर निवडू शकतात. यासोबत GeForce RTX 3060 जीपीयू देण्यात येईल. हे दोन्ही HP Victus मॉडेल 16GB रॅम (32GB पर्यंत एक्सपांडेबल) आणि 512GB NVMe SSD ला सपोर्ट करतात.  

HP Victus मध्ये 16-इंचाचा फुल एचडी आयपीएस स्क्रीन 144Hz रिफ्रेश रेटसह देण्यात आली आहे. या लॅपटॉप्समध्ये तीन USB Type-A पोर्ट्स, एक HDMI 3.2 Gen2 पोर्ट, एक HDMI 2.1 पोर्ट आणि एक RJ-45 Ethernet पोर्ट देण्यात आला आहे. त्याचबरोबर एसडी कार्ड रीडर आणि 3.5mm कॉम्बो ऑडिओ जॅक देण्यात आला आहे. HP Victus मध्ये कंपनीने 70Wh ची बॅटरी दिली आहे.  

Web Title: hp victus gaming laptop india price specs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.