शहरं
Join us  
Trending Stories
1
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
2
मुंबईतील चुरशीच्या लढतीत आणखी एक ट्विस्ट; शेवटच्या दिवशी नवा उमेदवार मैदानात!
3
“३५ वर्षे राजकारणात, लढायचे अन् जिंकायचे एवढेच उद्दिष्ट”; रवींद्र वायकर स्पष्ट केली भूमिका
4
“राजकारणात माझा जन्म ४ दिवसांचा, पण...”; उज्ज्वल निकम मैदानात, विरोधकांना थेट आव्हान
5
राहुल गांधींनी रायबरेलीतून भरला उमेदवारी अर्ज, रस्त्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांची गर्दी
6
Share Market: सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, गुंतवणूकदारांनी 4 लाख कोटी गमावले...
7
ठरलं! पुढच्या महिन्यात लॉन्च होणार Bajaj ची जगातील पहिली CNG बाईक, किंमत किती..?
8
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
9
Varuthini Ekadashi 2024: एकादशीच्या व्रताला फराळी पदार्थांचे सेवन करणे योग्य की अयोग्य? वाचा शास्त्र!
10
'बोस यांनी मला स्पर्श केला अन्...'; महिलेच्या आरोपांवर राज्यपाल म्हणाले,'गोळी चालवा पण...'
11
Smriti Irani : "काँग्रेसने आपला पराभव स्वीकारला..."; स्मृती इराणींचा राहुल गांधींवर जोरदार निशाणा
12
बारामतीत 'इमोशनल इम्पॅक्ट' ओसरतोय?; सुनेत्रा पवारांच्या प्रचारातील 'या' फॅक्टर्समुळे वारं फिरण्याची शक्यता
13
कोविशील्ड लसीचे नेमके किती दुष्परिणाम?; कोरोना काळातील 'सुपरमॅन'ने सांगितलं 'सत्य'
14
"टीएमसी बंगालचे नाव खराब करत आहे", नरेंद्र मोदींचा ममता सरकारवर हल्लाबोल
15
Jairam Ramesh : "राहुल गांधी हे राजकारणातील अनुभवी खेळाडू, बुद्धिबळाच्या काही चाली बाकी आहेत"
16
अमिताभ बच्चन यांची एक पोस्ट अन् भाजप-ठाकरे गटात रंगलं ट्विटर वॉर, नेमकं काय घडलं ?
17
Share Market : शेअर बाजारात हाहाकार; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; रिलायन्स आपटला
18
MRF Share Price: एमआरएफ देणार आतापर्यंतचा सर्वाधिक डिविडंड, मोठ्या विक्रीमुळे शेअर्स ४ टक्क्यांपर्यंत घसरले
19
अ‍ॅडव्हान्स फीचर्ससह पल्सरचे नवीन मॉडेल लाँच, टॉप स्पीड पाहून बसेल धक्का!
20
पराभव, भीती की रणनीती...! राहुल गांधींनी अमेठीऐवजी रायबरेली मतदारसंघ का निवडला?

चॅटींगची गंमत वाढणार; आता लँडलाईन नंबरवरही WhatsApp चालणार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2019 10:07 AM

व्हॉट्सअ‍ॅप हे संवाद साधण्याचं अत्यंत प्रभावी माध्यम आहे. युजर्सचं चॅटिंग आणखी मजेशीर व्हावं यासाठी व्हॉट्सअ‍ॅप सातत्याने नवनवीन फीचर आणत असतं.

ठळक मुद्देव्हॉट्सअ‍ॅप हे संवाद साधण्याचं अत्यंत प्रभावी माध्यम आहे.युजर्स आपल्या लँडलाईन नंबरसोबत व्हॉट्सअ‍ॅप कनेक्ट करू शकतात.व्हॉट्सअ‍ॅपच्या या फीचरचा फायदा हा WhatsApp Business App युजर्सना अधिक होणार आहे.

नवी दिल्ली - व्हॉट्सअ‍ॅप हे संवाद साधण्याचं अत्यंत प्रभावी माध्यम आहे. युजर्सचं चॅटिंग आणखी मजेशीर व्हावं यासाठी व्हॉट्सअ‍ॅप सातत्याने नवनवीन फीचर आणत असतं. पण तुम्हाला माहित आहे का? WhatsApp आता लँडलाईन नंबरवरही चालणार आहे. युजर्स आपल्या लँडलाईन नंबरसोबत आपल्याला हवं असल्यास व्हॉट्सअ‍ॅप कनेक्ट करू शकतात यासाठी तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर कोणासोबत शेअर करण्याचीही गरज लागणार नाही व्हॉट्सअ‍ॅपच्या या फीचरचा फायदा हा WhatsApp Business App युजर्सना अधिक होणार आहे. या फीचरच्या मदतीने व्यावसायिक आपल्या लँडलाईन नंबरवरून आरामात व्हॉट्सअ‍ॅप  ऑपरेट करू शकतात. तसेच या फीचरचं वैशिष्ट्य म्हणजे युजर्सचा पर्सनल मोबाईल नंबर तुम्हाला नको असलेल्या लोकांसोबत शेअर करता येत नाही. 

लँडलाईन नंबरसोबत WhatsApp कनेक्ट करण्यासाठी 'या' स्टेप्स करा फॉलो

स्टेप-1

सर्वप्रथम युजर्सना आपल्या स्मार्टफोनमध्ये नॉर्मल WhatsApp किंवा WhatsApp Business App डाऊनलोड करणं गरजेचं आहे. त्यानंतर WhatsApp स्मार्टफोन, टॅबलेट आणि लॅपटॉपवर ओपन करा. 

WhatsApp चं भन्नाट फीचर; आपल्या मर्जीने ग्रुपमध्ये अ‍ॅड होणार युजर

स्टेप- 2

WhatsApp ओपन केल्यानंतर व्हॉट्सअ‍ॅप युजर्सकडे कंट्री कोड आणि मोबाईल नंबर मागतं. त्यावेळी लँडलाईन नंबर एंटर करा. 

WhatsApp चे 'हे' 5 फीचर्स करणार कमाल; चॅटिंग करताना येणार धमाल 

स्टेप-3

नंबर एंटर केल्यानंतर युजर्सचा नंबर व्हेरिफाय केला जाईल. त्यासाठी कॉल अथवा मेसेज पाठवला जाईल. त्यासोबतच त्यानंतर Call Me चा पर्याय मिळेल. त्यावर क्लिक करा. त्यानंतर व्हेरिफिकेशन प्रोसेस सुरू होईल. 

WhatsApp वर क्वालिटी खराब न करता 'असे' पाठवा फोटो

स्टेप-4

कॉल ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर तुमच्या लँडलाईन नंबरवर एक कॉल येईल. तो कॉल रिसीव्ह केल्यावर 6 डिजीटवाला एक व्हेरिफीकेशनवाला कोड सांगितला जाईल. त्यानंतर तो कोड टाकून पुढची प्रोसेस करा. तसेच प्रोफाईल फोटो, नाव आणि विचारण्यात आलेले इतर काही डिटेल्स देऊन सोप्या पद्धतीने व्हॉट्सअ‍ॅपचा वापर करू शकता. 

WhatsApp वर 'हे' जबरदस्त फीचर येणार, नको असलेल्या ग्रुपपासून सुटका होणार

असा तपासा व्हॉट्सअ‍ॅपवर येणारा फेक मॅसेज

निवडणुकीचा हंगाम, आरोग्य आणि इतर अनेक गोष्टींवर सकाळ संध्याकाळ व्हॉट्सअ‍ॅपवर मॅसेज येत असतात. जवळच्या व्यक्तीने पाठविला असल्याने आपण त्यावर लगेचच विश्वास ठेवतो. जरा थांबा. कशावरून त्या व्यक्तीने तो मॅसेज वाचूनच पुढे पाठविला असेल. खोटा मॅसेज परविणाऱ्याचे हेतू वेगवेगळे असतात. यामुळे व्हॉट्सअ‍ॅपने हे मॅसेज खरे की खोटे हे करण्यासाठी नुकतेच एक टूल लाँच केले आहे. यास 'Checkpoint Tipline' अस नाव दिले आहे. PROTO या भारतीय मीडिया स्टार्टअप कंपनीने हे टूल विकसित केले आहे. PROTO ही कंपनी निवडणूक काळात पसरविले जाणार मॅसेज त्यांच्यापर्यंत पोहोचविण्यासाठी काही संस्थांच्या शोधात आहे. अशा मॅसेजचा शोध लागल्यास त्याद्वारे होणाऱ्या दंगली, अफवा थांबविण्यात यश येणार आहे.

WhatsApp वर आलं नवं फीचर, मेसेज कितीवेळा फॉरवर्ड झाला हे समजणार

काही महिन्यांपूर्वी व्हॉट्सअ‍ॅपने फॉरवर्ड मेसेजवर मर्यादा आणली होती. मात्र आता त्यामध्ये बदल करत व्हॉट्सअ‍ॅपने एक नवीन फीचर आणलं आहे. व्हॉट्सअ‍ॅपच्या या नव्या फीचरमध्ये 'Forwarding Info' आणि 'Frequently Forwarded' यांचा समावेश करण्यात आला आहे. यातील फॉरवर्डिंग इन्फोमुळं मेसेज कितीवेळा फॉरवर्ड केला आहे याची माहिती मिळणार आहे. WABetaInfo ने दिलेल्या माहितीनुसार, कंपनीने हे नवे फीचर iOS आणि अ‍ॅन्ड्रॉईडच्या बीटा व्हर्जनवर लाँच केले आहे. iOS बीटा 2.19.40.23 आणि Android बीटा 2.19.86 व्हर्जनवर हे अपडेट दिसणार आहे.

WhatsApp वरच्या चॅटिंगची गंमत वाढणार, 230 नवीन इमोजी येणारव्हॉट्सअ‍ॅपवर शब्दांऐवजी भावना व्यक्त करण्यासाठी इमोजीचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. आता व्हॉट्सअ‍ॅपवरच्या चॅटिंगची गंमत आणखी वाढणार आहे कारण इमोजीच्या लिस्टमध्ये 230 नवीन इमोजींचा लवकरच समावेश होणार आहे. युनिकोडने 2019 साठी नवीन 230 इमोजीची अधिकृत लिस्ट जाहीर केली आहे. व्हॉट्सअ‍ॅपवरील इमोजीच्या लिस्टमध्ये 59 नवीन इमोजीमध्ये 171 व्हेरिअंटचा समावेश आहे. या नवीन इमोजीमध्ये प्राणी, फळ, भाज्या, मेकॅनिकल आर्म, वेफल, आईस क्यूब, ब्लड ड्रॉप, बटर, रिक्षा अशा अनेक इमोजींचा समावेश आहे.

 

टॅग्स :WhatsAppव्हॉटसअ‍ॅपtechnologyतंत्रज्ञानMobileमोबाइल