शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

PF रेकॉर्डमध्ये जन्मतारीख चुकली? तर डोंट वरी; जाणून घ्या, घरबसल्या DOB बदलण्याची ऑनलाइन पद्धत

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2021 18:39 IST

PF अकाउंटच्या रोकॉर्डमध्ये काही चूक झाल्यास आपल्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. अनेक प्रकरणांमध्ये तर पीएफ रेकॉर्डमध्ये लोकांची जन्मतारीख चुकल्याचे दिसून आले आहे. यामुळे आपल्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

आपल्या सर्वांनाच माहित आहे, की नोकरी करणाऱ्या लोकांसाठी पीएफ अकाउंट हे अत्यंत महत्वाचे आहे. साधारणपणे नोकरी करणाऱ्या सर्वच लोकांच्या पगारातून पीएफ अर्थात भविष्य निर्वाह निधीअंतर्गत एक विशिष्ट रक्कम कापली जाते. यात एक भाग कंपनीचा आणि दुसरा भाग कर्मचाऱ्यांचा असतो. 

अशा या PF अकाउंटच्या रोकॉर्डमध्ये काही चूक झाल्यास आपल्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. अनेक प्रकरणांमध्ये तर पीएफ रेकॉर्डमध्ये लोकांची जन्मतारीख चुकल्याचे दिसून आले आहे. यामुळे आपल्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. (How To Update Wrong DOB In PF Account)

आपल्यासोबतही असेच काही घडले असेल, तर आम्ही आपल्याला एका सोप्या प्रक्रियेसंदर्भात माहिती देणार आहोत. या माध्यमाने आपण, घर बसल्या आपल्या स्मार्टफोनच्या सहाय्याने PF रिकॉर्ड्समध्ये आपली डेट ऑफ बर्थ व्यवस्थित करू शकता. तर जाणून घेऊया यासंदर्भातली संपूर्ण प्रक्रिया.

PF रिकॉर्डवरील डेट ऑफ बर्थ अशी करा बरोबर -- PF रिकॉर्डवरील अपनी डेट ऑफ बर्थ बरोबर करण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम सोबत देण्यात आलेल्या वेबसाइटवर जावे लागेल. https://unifiedportal-mem.epfindia.gov.in/memberinterface/- यानंतर आपल्याला आपला UAN नंबर, पासवर्ड आणि कॅप्चा कोडही  टाकावा लागेल.- यानंतर एक नवे पेज ओपन होईल. यात आपल्याला काही पर्याय दिसतील. यांपैकी आपल्याला Manage टॅबवर क्लिक करावे लागेल.- यानंतर आपल्याला Modify Basic Details ऑप्शनवर क्लिक करावे लागेल.- यानंतर आपल्याला काही पर्याय दिले जातील. यात आपल्याला आपले नाव आणि आपली योग्य जन्म तारीख टाकावी लागेल. - नंतर, खाली दिलेल्या कॉलममध्ये आपल्याला टीक करावे लागेल. ज्यात 'I hereby consent to provide my Aadhaar Number, Biometric and/or One Time Pin (OTP) data for Aadhaar based authentication for the purpose of establishing my identity and seeding it with UAN', असे लिहिलेले असेल.- यानंतर खाली देण्यात आलेल्या Update बटनवर टॅप करा.- यानंतर आपली ही माहिती आपल्या एंप्लॉयरकडे अप्रूव्ह होण्यासाठी जाईल.- आपल्या एंप्लॉयरने हे अप्रूव्ह केल्यानंतर, आपली जन्म तारीख PF रिकॉर्डमध्ये बदलली जाईल.

 

टॅग्स :Provident Fundभविष्य निर्वाह निधीEmployeeकर्मचारीInvestmentगुंतवणूक