शहरं
Join us  
Trending Stories
1
MVA MNS Morcha Live: ‘सत्याचा मोर्चा’साठी पुन्हा ठाकरे बंधू एकत्र; उद्धव अन् राज ठाकरे मोर्चास्थळी निघाले
2
"७५ वर्षांत काश्मीर ताब्यात घेता आले नाही अन्..."; तालिबानने पाकिस्तानच्या दुखऱ्या बाजूवर मीठ रगडले....
3
'या' रेल्वे कंपनीला मुंबई मेट्रोकडून मिळालं २४८१ कोटी रुपयांचं काम, फोकसमध्ये राहणार शेअर्स
4
मनसेचा 'सत्याचा मोर्चा', मुंबईच्या वाहतुकीत बदल;  'या' भागांत रस्त्यांवर निर्बंध, पोलिसांच्या सूचना
5
Plastic Bans: महाराष्ट्राच्या शेजारी राज्याने प्लास्टिक वापराबाबत उचललं कठोर पाऊल!
6
केरळमध्ये आता कुणीही 'अत्यंत गरीब' नाही, मुख्यमंत्री पिनराई विजयन यांचा मोठा दावा
7
टेस्ला... सॅम अल्टमन बुक करून फसला; साडे सात वर्षे झाली डिलिव्हरीच मिळाली नाही, रिफंड तर...
8
शुक्र गोचर २०२५: २ नोव्हेंबर, कार्तिकीच्या मुहूर्तावर 'मालव्य' राजयोगात ५ राशींना धन-समृद्धी योग!
9
SSC-HSC Exam Dates: महाराष्ट्र बोर्डाच्या दहावी-बारावी परीक्षा २०२६ चे वेळापत्रक जाहीर; पहिला पेपर कधी?
10
KYC पूर्ण नसेल तर FASTag बंद होणार का; पाहा NHAI काय म्हटलं? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
11
श्रेयस अय्यरबाबत मोठी अपडेट; रुग्णालयातून आज डिस्चार्ज मिळाला, लगेचच भारतात आणले जाणार?
12
Satyacha Morcha: राज ठाकरे लोकल ट्रेनमधून पोहोचले, तिकीटावर ऑटोग्राफ दिला; 'सत्याचा मोर्चा'ला अद्याप पोलिसांची परवानगी नाही
13
“प्रत्येक संकटाच्या डोळ्यात डोळे घालून तू लढतोस, जिंकतोस”; आदित्य ठाकरेंची राऊतांसाठी पोस्ट
14
IND vs SA World Cup Final: दक्षिण आफ्रिकेचा पुरुष संघ 'चोकर्स', महिलांचा संघ कसा? भारतासोबत ३४ सामने झाले, त्यापैकी...
15
ट्रेन तिकीट बुकिंगचे नियम बदलले, या लोकांना मिळणार लोअर बर्थ; झोपण्याची वेळही ठरली!
16
Social Viral: उत्तराखंडच्या 'या' सरोवरात पाणी नाही, तर आहेत फक्त सांगाडे; काय आहे गूढ?
17
एकीकडे पाकिस्तानसोबत युद्धविराम, मात्र दुसरीकडे अफगाणिस्तानने दिला मोठा इशारा! काय आहे प्रकरण?
18
UPI New Rules: ३ नोव्हेंबरपासून युपीआय पेमेंटमध्ये होणार मोठा बदल! पटापट करा चेक
19
"मी दोन दिवसांपूर्वीच रोहित आर्याला भेटलेलो...", मराठी अभिनेत्याचा मोठा खुलासा, म्हणाला- "त्याच्यावर शंका आली नाही कारण..."
20
Tarot Card: नवा उत्साह, चैतन्य आणि आशादायी चित्र घेऊन येणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य

Whatsapp वर घ्या इन्स्टाग्राम रील्सचा भरपूर आनंद; पद्धत आहे फारच सोपी, फॉलो करा 'या' स्टेप्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2025 11:48 IST

Whatsapp : Whatsapp युजर्ससाठी खूशखबर आहे. ते Whatsapp वर रील्स शोधू शकतात. तुमचा विश्वास बसत नसला तरी ते शक्य आहे.

रील्स पाहण्यासाठी प्रत्येकजण आपल्या फोनवर इन्स्टाग्राम सुरू करतं. तुम्ही इतर कोणत्याही एपवर असलात तरी, तुम्हाला रील्ससाठी इन्स्टाग्रामवर स्विच करावं लागतं. पण Whatsapp युजर्ससाठी खूशखबर आहे. ते Whatsapp वर रील्स शोधू शकतात. तुमचा विश्वास बसत नसला तरी ते शक्य आहे. रील्स Whatsapp वर मिळू शकतात आणि नंतर तुम्ही तुम्हाला आवडणारे रील्स पाहू शकता. काही ट्रिकच्या मदतीने अँड्रॉइड आणि आयओएस युजर्स त्यांच्या Whatsappवर रील्स शोधू शकतात.

जर तुम्हाला WhatsApp वर रील्स पाहायचे असतील तर सर्वप्रथम तुमचं एप ओपन करा. मेटा आयकॉन दिसेल. अँड्रॉइड आणि आयफोनमध्ये त्याची प्लेसमेंट वेगळी असू शकते. काही लोकांना हे आयकॉन अगदी खाली दिसेल, तर काहींना तो थोडा वर दिसेल. मेटा आयकॉनवर क्लिक केल्यानंतर, तुमच्यासमोर एक नवीन युजर इंटरफेस दिसेल. मग तुम्हाला कमांड द्यावी लागेल. शो मी रील्स किंवा शो मी बॉलिवूड रील्स अशी कमांड द्यावी लागेल. यानंतर मेटा एआय तुम्हाला ४ ते ५ रील्स दाखवेल.

जर तुम्हाला मेटा एआयने दाखवलेले रील्स समजत नसतील, तर तुम्ही दुसऱ्या कमांड देऊ शकता. जर तुम्हाला टेक्नॉलॉजीवरचे रील्स पाहायचे असतील तर तशी कमांड द्या. जर तुम्हाला मोबाईल अनबॉक्सिंगवर रील पाहायचे असेल तर ती कमांड द्या. लक्षात ठेवा की, तुम्हाला तुमचा मेसेज चॅटबॉक्समध्ये लिहावा लागेल. मेटा एआय तुम्हाला रील्स दाखवत राहील.

जर तुम्हाला मेटा एआयने दाखवलेली कोणतीही रील आवडली आणि तुम्ही त्यावर क्लिक केलं तर तुम्हाला इन्स्टाग्रामवरच स्विच केलं जाईल. म्हणजे तुम्हाला ती रील Whatsapp वर मिळाली, पण ती इन्स्टाग्रामवर सुरू होईल. Whatsapp वरील मेटा एआयचे हे इंटीग्रेशन युजर्सना रील्स दाखवण्यासोबतच त्यांच्यासाठी इतर अनेक कामं देखील पूर्ण करू शकतं. युजर्ससाठी Whatsapp नवनवीन फीचर्स आणत असतं. 

टॅग्स :WhatsAppव्हॉट्सअ‍ॅपInstagramइन्स्टाग्रामtechnologyतंत्रज्ञान