QR कोड खरा आहे की खोटा कसं ओळखायचं?, ऑनलाईन पेमेंट करण्यापूर्वी हे नक्की तपासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2025 18:14 IST2025-01-26T18:13:12+5:302025-01-26T18:14:05+5:30

डिजिटल पेमेंटच्या युगात, पैशांच्या व्यवहारांसाठी QR कोडचा सर्वाधिक वापर केला जातो.

how to identify real and fake qr codes always be alert before online payment | QR कोड खरा आहे की खोटा कसं ओळखायचं?, ऑनलाईन पेमेंट करण्यापूर्वी हे नक्की तपासा

QR कोड खरा आहे की खोटा कसं ओळखायचं?, ऑनलाईन पेमेंट करण्यापूर्वी हे नक्की तपासा

डिजिटल पेमेंटच्या युगात, पैशांच्या व्यवहारांसाठी QR कोडचा सर्वाधिक वापर केला जातो. रिक्षापासून ते मोठ्या मॉल्सपर्यंत, पेमेंट हे QR कोडद्वारे केले जातात. पेमेंटसाठी याचा व्यापक वापर होत असल्याने आता स्कॅमर आणि सायबर गुन्हेगारांनीही लोकांची फसवणूक करण्यासाठी याचा वापर करण्यास सुरुवात केली आहे. जर तुम्ही पेमेंट करण्यासाठी QR कोड वापरत असाल तर सावधगिरी बाळगली पाहिजे.

मध्य प्रदेशातून अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे ज्यामध्ये लोकांची फसवणूक करण्यासाठी QR कोडचा वापर करण्यात आला. म्हणून, पेमेंट करण्यापूर्वी QR कोड व्हेरिफाय करणं हे महत्त्वाचं आहे. जर तुम्ही निष्काळजी करत तर QR कोड स्कॅन करणं तुमच्यासाठी घातक ठरू शकतं.

फसवणुकीपासून राहा सावध

मध्य प्रदेशात उघडकीस आलेल्या घटनेत, पेट्रोल पंपांसह अनेक दुकानांचे QR कोड बनावट QR कोडमध्ये बदलण्यात आले. यानंतर जे कोणी ते QR कोड स्कॅन करून पेमेंट करतं, त्याची रक्कम थेट स्कॅमर्सच्या खात्यात पोहोचते. ऑनलाइन फसवणुकीच्या या पद्धतीमध्ये, स्कॅमर पेमेंट करणाऱ्या ग्राहकाची माहिती देखील चोरतात. अशा परिस्थितीत, ऑनलाइन पेमेंट करताना तुम्हाला काळजी घेणे आवश्यक आहे.

QR कोड खरा आहे की खोटा कसं ओळखायचं?, 

बहुतेक QR कोड सारखे दिसतात. अशा परिस्थितीत, ऑनलाइन पेमेंट करताना, ते खरे आहेत की खोटे ओळखणं आवश्यक आहे. बनावट QR कोडपासून सुरक्षित राहण्यासाठी तुम्ही साउंड बॉक्स वापरावा. जर तुमच्या खात्यात पैसे पोहोचले असतील तर तुम्हाला त्याबद्दल माहिती साउंड बॉक्समधून मिळेल.

जर तुम्ही QR कोड स्कॅन करून पेमेंट करत असाल, तर व्यवहार करण्यापूर्वी, दुकान मालकाकडून किंवा ज्या व्यक्तीकडून तुम्ही पेमेंट करत आहात त्यांच्याकडून त्यावर दाखवलेले नाव एकदा पडताळून पाहा. अशा परिस्थितीत, तुम्हाला खऱ्या मालकाचं नाव कळेल.

जर तुम्हाला कोणत्याही QR कोडबद्दल शंका असेल, तर तुम्ही प्रथम तो QR कोड Google Lens वर स्कॅन करावा. यामुळे तुम्हाला कळेल की तो QR कोड कुठे रीडायरेक्ट होत आहे.
 

Web Title: how to identify real and fake qr codes always be alert before online payment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.