बस आणि ट्रेनमध्ये बाजूला बसलेल्या व्यक्तीला दिसणार नाही तुमचं चॅट, ‘हे’ अॅप करा आत्ताच डाउनलोड
By सिद्धेश जाधव | Updated: April 2, 2022 19:55 IST2022-04-02T19:55:40+5:302022-04-02T19:55:51+5:30
आजूबाजूला कोणी असल्यास चॅटिंग करणं कठीण काम असतं कारण शेजारी बसलेल्या लोकांना आपली स्क्रीन दिसत असते.

बस आणि ट्रेनमध्ये बाजूला बसलेल्या व्यक्तीला दिसणार नाही तुमचं चॅट, ‘हे’ अॅप करा आत्ताच डाउनलोड
WhatsApp, फेसबुक मेसेंजर, टेलिग्राम किंवा अन्य कोणत्याही मेसेजिंग अॅपकडे युजर्सच्या एका समस्येवर उपाय नाही. ती समस्या म्हणजे शेजारी बसलेल्या व्यक्तीपासून आपलं चॅट कसं लपवायचं? व्हॉट्सअॅप ओपन केल्यावर लोकांना आपले जुने मेसेजेस दिसू नये म्हणून अनेक उपाय उपलब्ध आहेत. परंतु सुरु असलेलं संभाषण घर, बस, ट्रेन, मेट्रो किंवा ऑफिसमध्ये आपल्या बाजूला बसलेल्या व्यक्तीपासून कसं लपवायचं? चला जाणून घेऊया या समस्येवरचा नामी उपाय.
तुमची स्क्रीन शेजारी बसलेल्या व्यक्तीपासून लपवायची असेल तर तुम्हाला एक अॅप डाउनलोड करावं लागेल. Mask Chat-Hides Chat नावचं अॅप गुगल प्ले स्टोरवर उपलब्ध आहेत. जे अँड्रॉइड युजर्स त्यांच्या स्मार्टफोनमध्ये डाउनलोड करू शकतात. या अॅपचा वापर करून तुम्ही गर्दीतही गुपचूप चॅट करू शकाल. इतकंच नव्हे तर बँकिंग ट्रँजॅक्शनही करू शकाल तेही तुमचा पासवर्ड न दाखवता.
असा करा वापर
सर्वप्रथम हे अॅप तुमच्या स्मार्टफोनमध्ये इंस्टॉल करा. त्यानंतर हे अॅप ओपन करा, अॅप तुमच्याकडे थीम स्टोरेजची परवानगी ती मान्य करा. त्यानंतर तुम्ही तुमच्या आवडीची थीम निवडू शकता. वर उजव्या कोपऱ्यात असलेलं टॉगल बटन ऑन करा. अॅप तुमच्याकडे इतर अॅप्सच्या वर डिस्प्ले करण्याची परवानगी मागेल ती मान्य करा. आता तुमच्या स्क्रीनवर एक फ्लोटिंग मास्क चॅट आयकॉन येईल. जेव्हा तुम्हाला स्क्रीनवरील कंटेंट लपवायचा असेल तेव्हा तुम्ही या आयकॉनवर क्लिक करू शकता. त्यामुळे तुमच्या फोन स्क्रीनवर एक व्हर्च्युअल पडदा येईल. जो तुमच्या सोयीनुसार कमी जास्त करून हवी तेवढी स्क्रीन झाकून ठेऊ शकता.
फक्त चॅट नव्हे तर इतर अॅप्स वापरताना देखील या व्हर्च्युअल पडद्याचा वापर करता येईल. यात फेसबुक मेसेंजर, टेलिग्राम आणि सिग्नल सारख्या मेसेजिंग अॅप्सचा समावेश आहे. तसेच बँकिंग पासवर्ड टाईप करताना देखील तुमची माहिती लपवण्यासाठी याचा उपयोग करता येईल. हे अॅप उपयुक्त तर आहे परंतु हे किती सुरक्षित आहे याची खात्री देता येतं नाही.