आता Google Pay वरून करा ट्रेन तिकीट बुक! पद्धत आहे एकदम सोपी, समजून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2023 03:00 PM2023-10-17T15:00:13+5:302023-10-17T15:11:51+5:30

ट्रेनचं तिकीट बूक करण्यासाठी गुगल पे सुरक्षित

how to book confirm train ticket from google pay app know the procedure tips tricks | आता Google Pay वरून करा ट्रेन तिकीट बुक! पद्धत आहे एकदम सोपी, समजून घ्या

आता Google Pay वरून करा ट्रेन तिकीट बुक! पद्धत आहे एकदम सोपी, समजून घ्या

Train Ticket Booking on Google Pay : गुगल पे हे डिजिटल वॉलेट प्लॅटफॉर्म आहे जिथून तुम्ही कोणालाही सहजपणे पेमेंट करू शकता. अगदी छोटं किराणा दुकान असो किंवा मोठ्या मॉलमधले शॉपिंग असो, तुम्ही विनाविलंब पेमेंट करू शकता. तुम्हाला हे सर्व माहित असेलच, पण तुम्हाला माहित आहे का की तुम्ही रेल्वेचे तिकीट देखील याच पेमेंट प्लॅटफॉर्मवरून करू शकता. रेल्वे तिकीट बूक करण्यासाठी Google Pay चा वापर कसा केला जाऊ शकतो, जाणून घेऊया.

Google Pay द्वारे रेल्वे तिकीट कसे बुक करावे:-

  1. सर्व प्रथम तुमच्या फोनमध्ये Google Pay उघडा.
  2. यानंतर सर्च बारमध्ये जाऊन ConfirmTkt वर क्लिक करा.
  3. खाली Open Website वर टॅप करा. यानंतर एक नवीन पेज उघडेल.
  4. तुम्हाला From आणि To मधील स्थानकांची नावे निवडावी लागतील. त्यानंतर तारीख निवडावी लागेल.
  5. त्यानंतर Search Train वर टॅप करा. आता तुम्हाला सर्व ट्रेन्सची माहिती मिळेल.
  6. सीट आणि ट्रेनच्या उपलब्धतेनुसार ट्रेन निवडा.
  7. त्यानंतर तुम्हाला Sign in करण्यास सांगितले जाईल, त्यावर Continue करा.
  8. जो तपशील (Details) विचारला जाईल तो भरून घ्या.
  9. यानंतर पुन्हा एकदा ट्रेन निवडा. ट्रेनचा Class निवडा आणि नंतर Book वर टॅप करा. वेबपेजच्या तळाशी रक्कम लिहिली जाईल.
  10. त्यानंतर तुम्हाला IRCTC अकाऊंटचा तपशील टाकावे लागतील. तुमच्याकडे अकाऊंट नसेल तर नवे अकाऊंट क्रिएट करा.
  11. यानंतर प्रवाशांचे तपशील भरा.
  12. सर्व तपशील भरून झाल्यावर पुष्टी करा आणि Continue वर क्लिक करा.
  13. नंतर पेमेंट पद्धत निवडा. यानंतर Proceed to continue क्लिक करा.
  14. त्यानंतर UPI पिन टाका. त्यानंतर IRCTC पासवर्ड आणि capcha कोड टाका.
  15. शेवटी Submit बटणवर क्लिक करा. तुमचे तिकीट बूक केले जाईल आणि स्क्रीनवर Confirmation Message देखील दिसेल.

Web Title: how to book confirm train ticket from google pay app know the procedure tips tricks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.