शहरं
Join us  
Trending Stories
1
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
2
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
3
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
4
"त्यांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही"; डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणात उदयनराजेंनी लोकांना काय केले आवाहन?
5
अजबच! गावठी कुत्रा बनला ज्वेलरी शॉपचा रखवालदार, गळ्यात घालतो ५० तोळ्यांची सोन्याची चेन
6
Inspiring Story: तरुणीला किडनीची गरज, तरुणाला कर्करोग...; गोष्ट एका अनोख्या प्रेमाची!
7
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
8
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
9
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
10
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
11
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
12
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
13
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?
14
दादर रेल्वे स्टेशनवर धक्कादायक प्रकार! तरुणाने स्वत:वरच केला चाकूहल्ला.. घटना CCTVमध्ये कैद
15
'आपण मोठी चूक करतोय', भारतावर कर लादल्यामुळे माजी अमेरिकन मंत्र्यांची ट्रम्प सरकारवर टीका
16
"टीम इंडियावर कारवाई करायची नाही... BCCIकडून आलेला फोन"; माजी मॅच रेफरीच्या आरोपांमुळे खळबळ
17
अजानमुळे सोनू निगमने कॉन्सर्ट थांबवला, आधी कौतुक झाले मग आठवला जुना वाद, एका ट्वीटमुळे झालेला गोंधळ
18
कर्नाटकमध्ये संघावर निर्बंध, हायकोर्टाचा काँग्रेस सरकारला दणका, दिले असे आदेश 
19
सलमान खानने केलेलं लाँच, आता १० वर्षांनंतर प्रसिद्ध स्टारकिडने बॉलिवूडमधून घेतला संन्यास, चाहत्यांना धक्का!
20
लोकांत असंतोष, भारतात नेपाळसारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते: प्रकाश आंबेडकरांचा इशारा

WhatsApp वरच्या सीक्रेट गोष्टी Gmail वर करता येतात सेव्ह, कसं ते जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2020 14:44 IST

व्हॉट्सअ‍ॅपवरच्या महत्वाच्या गोष्टी डिलीट झाल्यास अनेक समस्यांचा सामना करावा लागतो.

नवी दिल्ली - नातेवाईक, मित्रमैत्रिणींशी संवाद साधण्यासाठी मोठ्या प्रमाणात व्हॉट्सअ‍ॅपचा वापर केला जातो. व्हॉट्सअ‍ॅप हे संवाद साधण्याचं प्रभावी माध्यम आहे. मेसेजसोबतच फोटो आणि व्हिडीओ शेअर करून चॅटिंगची गंमत वाढवता येते. व्हॉट्सअ‍ॅपवर अनेकांशी संवाद साधत असताना त्यातील काही व्यक्ती या खास असतात. तर काही मेसेज हे अत्यंत महत्त्वाचे असल्याने ते सेव्ह करणं गरजेचं असतं. 

व्हॉट्सअ‍ॅपवरच्या महत्त्वाच्या गोष्टी डिलीट झाल्यास अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. व्हॉट्सअ‍ॅप नेहमीच आपल्या युजर्ससाठी सातत्याने नवनवीन फीचर्स आणत असतं. असंच एक भन्नाट फीचर व्हॉट्सअ‍ॅपमध्ये आहे ज्याच्यामदतीने खास मेसेज सेव्ह करता येतात. व्हॉट्सअ‍ॅपवरच्या अशा सीक्रेट गोष्टी, मेसेज हे जीमेलमध्ये कशा सेव्ह करायच्या हे जाणून घेऊया. 

WhatsApp वरच्या सीक्रेट गोष्टी Gmail वर करता येतात सेव्ह, कसं ते जाणून घ्या

- सर्वप्रथम फोनमध्ये व्हॉट्सअ‍ॅप ओपन करा.

- व्हॉट्सअ‍ॅपमध्ये कोपऱ्यात देण्यात आलेल्या तीन डॉटवर क्लिक करा.

- सेटींग ऑप्शनमध्ये जाऊन अकाऊंटच्या खाली देण्यात आलेल्या चॅट्स सेक्शनमध्ये जा. 

- चॅट हिस्ट्री ऑप्शन देण्यात आला आहे त्यावर क्लिक करा. 

- Export chat वर टॅप करा. त्यानंतर पूर्ण चॅट लिस्ट ओपन होईल. 

- जो कॉन्टॅक्ट नंबरची चॅट हिस्ट्री सेव्ह करायची आहे किंवा एक्सपोर्ट करायची आहे ती सिलेक्ट करा. 

- Without Media आणि Include Media चा यानंतर ऑप्शन मिळेल. 

- चॅट मीडिया फाईल्ससोबत सेव्ह करायचं असल्यास Include Media सिलेक्ट करा.

- मीडिया फाईलसोबत 10 हजार चॅट आणि फाईल्स शिवाय 40 हजार चॅट एक्सपोर्ट करता येतं. 

- असं केल्यानंतर व्हॉट्सअ‍ॅप चॅट शेअर करण्यासाठी एक ऑप्शन सिलेक्ट करायला सांगेल.

- जीमेल सिलेक्ट करून ईमेल आयडी आणि अन्य माहिती द्या.

- व्हॉट्सअ‍ॅपवरचं चॅट यानंतर ईमेल इनबॉक्समध्ये .txt फॉरमॅटमध्ये पोहोचेल. 

WhatsApp स्टेटसमधले फोटो आणि व्हिडीओ सेव्ह करायचेत? कसं ते जाणून घ्या

Whatsapp's New Feature : व्हॉट्सअ‍ॅप आणणार 'मिस्टर इंडिया' फीचर; जाणून घ्या खास बात!

व्हॉट्सअ‍ॅप एक भन्नाट फीचर व्हॉट्सअ‍ॅप लवकरच आणणार आहे. डिसअ‍ॅपेरिंग मेसेज असं या नव्या फीचरचं नाव असून यामध्ये मेसेजचा वेळ ठरवता येणार आहे. WABetaInfo ने दिलेल्या माहितीनुसार, व्हॉट्सअ‍ॅप एका भन्नाट फीचरवर काम करत आहे. यामध्ये पाठवलेला मेसेज किती वेळ दिसेल याची वेळ पाठवणाऱ्याला ठरवता येणार आहे. म्हणजेच एखाद्याने मेसेज केला तर त्या मेसेजचे आयुष्य ठरवता येणार आहे. ही वेळ संपल्यानंतर चॅट आपोआप डिलीट होणार आहे. व्हॉट्सअ‍ॅपमध्ये लवकरच डिसअ‍ॅपेरिंग हे फीचर देण्यात येणार आहे. हे सिलेक्ट केल्यावर सर्व चॅट गायब होणार आहे. टेलिग्राम अ‍ॅपवर हे फीचर आधीपासूनच उपलब्ध आहे.

'या' बातम्याही नक्की वाचा

4G, 5G ला विसरा आता 6G येणार, 'या' देशात इंटरनेट सुस्साट

Airtel Plan : एअरटेलच्या 'या' प्रीपेड प्लॅनवर मिळणार 2 लाखांचा विमा आणि बरंच काही...

Instagram टिकटॉकला टक्कर देणार, बुमरँगमध्ये नवीन फीचर्स मिळणार

Whatsapp Web वरचे 'हे' खास फीचर्स माहीत आहेत का?

आता स्मार्टफोनला करा टीव्हीचा रिमोट; कसं ते जाणून घ्या

 

टॅग्स :WhatsAppव्हॉट्सअ‍ॅपtechnologyतंत्रज्ञानMobileमोबाइल