फेसबुक अकॉउंट कायमस्वरूपी डिलीट करायचं आहे का? या स्टेप्स फॉलो करा
By सिद्धेश जाधव | Updated: June 16, 2021 18:22 IST2021-06-16T18:20:20+5:302021-06-16T18:22:48+5:30
How to delete Facebook Account: फेसबुक अकॉउंट कायमस्वरूपी डिलीट केल्यावर तुमचे फोटोज, व्हिडीओज आणि पोस्ट देखील डिलीट होतात, या प्रक्रियेसाठी 90 दिवस लागू शकतात.

अकॉउंट डिलीट करणे आणि डीअॅक्टिव्हेट करणे दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत.
सध्या अनेक नवनवीन सोशल मीडिया अॅप्स बाजारात येत आहेत. परंतु, तरीही Facebook सर्वात मोठा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. 280 कोटी लोक प्रत्येक महिन्याला फेसबुकचा वापर करतात. असे जरी असले तरी अनेकांना फेसबुक अकॉउंट डिलीट करायचं असतं. कोणी गोपनीयता आणि सुरक्षेचं कारण देतो किंवा कोणी दोन अकॉउंट आहेत म्हणून एक अकॉउंट डिलीट करू इच्छितो. कारण कोणतंही असू दे, तुम्ही तुमचं Facebook account कायमस्वरूपी डिलीट (Permanently delete) करू शकता. यासाठी तुम्हाला पुढे दिलेल्या स्टेप्स फॉलो कराव्या लागतील.
फेसबुक अकॉउंट कसे डिलीट करावे?
अकॉउंट डिलीट करणे आणि डीअॅक्टिव्हेट करणे दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. डिलीट केलेले अकॉउंट पुन्हा वापरता येत नाही तर अकॉउंट डीअॅक्टिव्हेट केल्यावर पुन्हा वापरता येते. एक गोष्ट लक्षात असू द्या कि, अकॉउंट डिलीट केल्यावर तुमचे सर्व फोटोज, व्हिडीओज आणि पोस्ट्स डिलीट होतात. त्यामुळे या गोष्टीचा विचार करूनच अकॉउंट डिलीट करण्यासाठी पुढील स्टेप्स फोल्लो करा:
- Facebook मध्ये Settings & Privacy मध्ये जा
- त्यानंतर Settings वर टॅप करा
- आता Account Ownership and Control वर टॅप करा
- इथे तुम्हाला Deactivation and Deletion चा ऑप्शन मिळेल
- त्यावर टॅप करा आणि Delete Account चा पर्याय निवडा
- खाली Continue to Account Deletion ऑप्शनवर टॅप करा
- Facebook तुम्हाला अकॉउंट डिलीट करण्याचे कारण विचारेल, कारण सांगा आणि पुढे जा
- त्यापुढे कंपनी तुम्हाला तुमचा सर्व डेटा दाखवेल जो अकॉउंट डिलीट केल्यावर काढून टाकला जाईल
- Delete Account वर टॅप करा आणि तुमचा पासवर्ड टाकून Continue करा
Facebook अकॉउंट डिलीट करण्यासाठी 90 दिवसांचा वेळ घेते. यातील पहिल्या 30 दिवसांत जर तुमचा विचार बदलला तर तुम्ही पुन्हा तुमचे अकॉउंट सुरु करू शकता. त्यासाठी तुम्हाला फक्त नेहमीप्रमाणे लॉगिन करावी लागेल. 30 दिवसानंतर अकॉउंट पुन्हा सुरु करता येणार नाही. तुम्ही नवीन अकॉउंट मात्र बनवू शकता.