मच्छर पळवणाऱ्या ऑल आऊटला किती वीज लागते? रात्रभर चालवल्यास किती बील येते? आपण विचारही केला नसेल
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2023 18:31 IST2023-02-22T18:28:32+5:302023-02-22T18:31:41+5:30
डासांपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी आपण ज्या मशीनचा वापर करता त्या मशीनसाठी किती वीज खर्च होते? यासंदर्भात आपण कधी विचार केला आहे का? जर नाही, तर जाणू घ्या...

मच्छर पळवणाऱ्या ऑल आऊटला किती वीज लागते? रात्रभर चालवल्यास किती बील येते? आपण विचारही केला नसेल
उन्हाळा असो वा हिवाळा बहुतांश घरांमध्ये मच्छर पळवण्यासाठी लोक ऑल आऊट अथवा गुड नाईट सारख्या वस्तूंचा वापर करतात. या मशीनच्या सहाय्याने लोक डासांपासून स्वतःचे संरक्षण करतात. पण डासांपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी आपण ज्या मशीनचा वापर करता त्या मशीनसाठी किती वीज खर्च होते? यासंदर्भात आपण कधी विचार केला आहे का? जर नाही, तर जाणू घ्या...
खरे तर हे मशीन आपण कशा पद्धतीने आणि किती वेळ वापरता, यावर याला किती वीज लागणार हे अवलंबून असते. महत्वाचे म्हणजे, कमीत कमी वीज कशी लागेल, हे लक्षात घेऊन मशीन बनवले जाते. सर्वसाधारणपणे मच्छर मारणाऱ्या अथवा पळवणाऱ्या मशीनला 5 ते 7 वॅट वीज लागते. अर्थात या मशीनला तेवढीच वीज लागते, जेवढी एका नाईट बल्बला लागते. मात्र, आता LED आल्याने नाईट बल्ब पूर्वीच्या तुलनेत कमी वॅट्सचे येत आहेत.
किती वीज खर्च होते? -
संपूर्ण महिन्याचा विचार केल्यास, मॉस्किटो किलर मशीनला फार कमी वीज लागते. याचा आपल्या वीज बिलावर फारसा परिणाम होत नाही. हे मशीन सलग 10 तास वापरण्यासाठी साधारणपणे केवळ अर्धा युनिट एवढीच वीज लागते. यामुळे आपल्या एकूण वीज बिलावर याचा फार विशेष परिणाम होत नाही.
हीटर सारखे काम करते मशीन -
महत्वाचे म्हणजे, हे मशीन हीटर सारखे काम करते. यात लिक्विड असते. या लिक्विजमध्ये एक रॉड जोडलेला असतो. हा रॉड मशीन आणि लिक्विड यांना कनेक्ट असतो. जेव्हा मशीन ऑन होते तेव्हा हा रॉड गरम होतो आणि मशीनच्या रिफिलमध्ये असलेले लिक्वविड संपूर्ण रूममध्ये पसरवतो. यामुळे रूममधील मच्छर सहजपणे पळून जातात आणि आपण आरामात झोपू शकता.