ठळक मुद्देव्हॉट्सअ‍ॅपचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात असून व्हॉट्सअ‍ॅपही आपल्या युजर्ससाठी नवनवीन फीचर आणत असतं. एखाद्या व्यक्तीशी वाद झाला की लगेचच व्हॉट्सअ‍ॅपवर त्या व्यक्तीला  ब्लॉक करण्याचा निर्णय घेतला जातो.व्यक्तींना ब्लॉक केल्यावर मेसेज पाठवला अथवा रिसीव्ह केला जात नाही.

नवी दिल्ली - व्हॉट्सअ‍ॅपचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात असून व्हॉट्सअ‍ॅपही आपल्या युजर्ससाठी नवनवीन फीचर आणत असतं. मात्र व्हॉट्सअ‍ॅपवर काही कारणास्तव आपण आपल्याला नको असलेल्या व्यक्तींना ब्लॉक करू शकतो. त्या व्यक्तींना ब्लॉक केल्यावर मेसेज पाठवला अथवा रिसीव्ह केला जात नाही. तसेच चॅट म्हणजेच संवाद साधता येत नाही. 

एखाद्या व्यक्तीशी वाद झाला की लगेचच व्हॉट्सअ‍ॅपवर त्या व्यक्तीला  ब्लॉक करण्याचा निर्णय घेतला जातो. जोपर्यंत आपण अनब्लॉक करत नाही तोपर्यंत फोटो, व्हिडीओ, मेसेज पाठवता येत नाही. कधी कधी आपण एखादया व्यक्तीला मेसेज करतो पण तो मेसेज त्या व्यक्तीपर्यंत पोहचला आहे की नाही हे समजतच नाही. म्हणजेच त्या व्यक्तीने ब्लॉक केल्याची दाट शक्यता असते. आपल्याला कोणी ब्लॉक केलं आहे का? किंवा आवडत्या व्यक्तीने ब्लॉक केलंय का? हे तपासण्यासाठी काही ट्रिक्स आहेत त्या जाणून घेऊया. 

मेसेज डिलिव्हर टिक पाहा

व्हॉट्सअ‍ॅप ब्लॉकिंग नोटिफिकेशन्स येत नाही. त्यामुळे आपल्याला कोणी कोणी ब्लॉक केलंय हे समजू शकत नाही. मात्र एखादा मेसेज पाठवल्यानंतर येणाऱ्या डिलिव्हरी टिकवरुन याबाबत नक्कीच माहिती मिळते. यासाठी युजर्सना त्या नंबरवर एक मेसेज पाठवावा लागेल. मेसेज पाठवल्यानंतर मेसेजच्या खाली 2 टिक आल्या तर याचा अर्थ तुमचा मेसेज समोरच्या व्यक्तीला डिलिव्हर झाला आहे. म्हणजेच त्या व्यक्तीने तुम्हाला ब्लॉक केलेले नाही. मात्र, तुम्ही पाठवलेल्या मेसेजच्या खाली एकच टिक आली, तर ब्लॉक करण्यात आलं आहे. 

प्रोफाईल फोटो पाहा

ब्लॉक केलं आहे की नाही हे कन्फर्म करण्यासाठी प्रोफाईल फोटो मदत करतो. संबंधित व्यक्तीच्या प्रोफाईल फोटोवरुनही आपल्याला ब्लॉक केल्याची माहिती मिळू शकते. जर तुम्हाला त्या व्यक्तीने ब्लॉक केलं असेल तर तुम्हाला त्या व्यक्तीचा प्रोफाईल फोटो किंवा स्टेटस पाहाता येणार नाही. व्हॉट्सअ‍ॅपवर ब्लॉक करण्यात आलं आहे की नाही हे पाहण्याचा हा सर्वात सोपा मार्ग आहे. 

group invitation feature starts in india need permission to add members in whatsapp | WhatsApp चं भन्नाट फीचर; आपल्या मर्जीने ग्रुपमध्ये अ‍ॅड होणार युजर

लास्ट सीन आणि ऑनलाईन ऑप्शन

व्हॉट्सअ‍ॅपवर ब्लॉक केलं आहे की नाही हे चेक करण्यासाठी त्या व्यक्तीची चॅट विंडो पाहा. त्याच्या नावाखाली ऑनलाईन असल्याचं अथवा लास्ट सीन असल्याचं दिसत असेल तर तुम्हाला त्या व्यक्तीने ब्लॉक केलेलं नाही. मात्र या दोन्ही गोष्टी दिसत नसतील तर ब्लॉक केलंय असं समजा. 

व्हॉट्सअ‍ॅप कॉल करा

व्हॉट्सअ‍ॅप कॉल ब्लॉक केलं आहे की नाही हे पाहण्यासाठी फायदेशीर ठरेल. ब्लॉक केलं असेल तर त्या व्यक्तीला व्हॉट्सअ‍ॅप कॉल करता येत नाही. त्यामुळे तुम्ही अशा व्यक्तीलाव्हॉट्सअ‍ॅप कॉल करुन पाहू शकता. जर कोणतीही रिंग वाजली नाही, तर त्या व्यक्तीने तुम्हाला ब्लॉक केले आहे. मात्र, रिंग वाजली तर त्या व्यक्तीने तुम्हाला ब्लॉक केलेलं नाही.

ग्रुपमध्ये अ‍ॅड करा

जर एखाद्या व्यक्तीने तुम्हाला ब्लॉक केलंय असं वाटत असेल तर त्या व्यक्तीला ग्रुपमध्ये अ‍ॅड करा. जर त्या व्यक्तीला ग्रुपमध्ये अ‍ॅड करता आले नाही तर त्या व्यक्तीने तुम्हाला ब्लॉक केलं आहे. तसेच व्हॉट्सअ‍ॅपवर एक मेसेज येईल की तुम्ही या व्यक्तीला ग्रुपमध्ये अ‍ॅड करण्यासाठी ऑथराईज नाही. त्यावरून तुम्हाला ब्लॉक केल्याची माहिती मिळेल. 

whatsapp to get advertisement by 2020 company reveals | आता WhatsApp वरही जाहिराती दिसणार

आवडत्या व्यक्तीने ब्लॉक केल्यास असं करा स्वत: ला अनब्लॉक

- सर्वप्रथम व्हॉट्सअ‍ॅपपच्या सेटींगमध्ये जा आणि व्हॉट्सअ‍ॅप अकाऊंट डिलीट करा. 

- व्हॉट्सअ‍ॅप अकाऊंट डिलीट करण्यासाठी डिलीट माय अकाऊंटवर क्लिक करा आणि नंतर आपला मोबाईल नंबर टाका. 

- मोबाईल नंबर देऊन अकाऊंट डिलीट करा आणि नंतर व्हॉट्सअ‍ॅप मेसेंजर अनइन्स्टॉल करा. 

आता बनवा आपलं स्वतःचं व्हॉट्सअ‍ॅप स्टिकर, जाणून घ्या कसं...

- अनइन्स्टॉल केल्यावर फोन एकदा रिस्टार्ट करा. 

- प्ले स्टोअरवर जाऊन पुन्हा एकदा नव्याने व्हॉट्सअ‍ॅप इन्स्टॉल करा आणि पूर्ण माहिती द्या.

- यानंतर तुम्हाला ब्लॉक केलेल्या अकाऊंटने तुम्हाला अनब्लॉक केल्याचं दिसेल. 

WhatsApp वर आलं नवं फीचर; नोटीफिकेशनमध्ये दिसणार स्टीकर्स 

आता WhatsApp वरही जाहिराती दिसणार

WhatsApp वर आता प्रोफाईल फोटो डाऊनलोड करता येणार नाही, 'हे' आहे कारण

व्हॉट्सअ‍ॅप युजर्सना प्रोफाईल फोटो डाऊनलोड करता येणार नाही. कारण व्हॉट्सअ‍ॅप लवकरच सेव्ह आणि अनसेव्ह कॉन्टॅक्टचं प्रोफाईल फोटो डाऊनलोड करण्याचा पर्याय हटवणार आहे. WABetaInfo च्या रिपोर्टनुसार, व्हॉट्सअ‍ॅप अल्बम ले-आऊट आणि ऑडिओ फॉरमॅटमध्ये बदल करणारं फीचर आणणार आहे. व्हॉट्सअ‍ॅपमध्ये प्रोफाईल फोटो सेव्ह करण्याची सोय होती. मात्र आता युजर्सची सुरक्षितता लक्षात घेऊन हे फीचर काढण्यात येणार आहे. व्हॉट्सअ‍ॅपने कॉन्टॅक्टसचे प्रोफाईल फोटो कॉपी किंवा शेअर करण्यावर निर्बंध लावले आहेत. पण युजर्सना व्हॉट्सअ‍ॅपवर असलेल्या अनेक ग्रुपचे फोटो डाऊनलोड अथवा शेअर करता येणार आहेत.

जाणून घ्या WhatsApp चे 9 सिक्रेट्स; वाढेल चॅटिंगचा आनंद

स्क्रीनशॉट न घेता असं सेव्ह करा WhatsApp स्टेटस

फक्त एक सेटींग बदला, WhatsApp वर ऑटो सेव्ह होणार नाहीत फोटो

WhatsApp हे संवाद साधण्याचं अत्यंत प्रभावी माध्यम आहे. व्हॉट्सअ‍ॅपच्या मदतीने फोटो, व्हिडीओ, ऑडीओ, डॉक्यूमेंट्स शेअर करता येतात. व्हॉट्सअ‍ॅपच्या अनेक ग्रुपमध्ये युजर्स अ‍ॅड असतात. त्या ग्रुपमध्ये सातत्याने मेसेज, फोटो अथवा व्हिडीओ हे येत असतात. मात्र हे फोटो स्मार्टफोनच्या गॅलरीमध्ये ऑटो सेव्ह होतात. आपोआप सेव्ह झालेल्या गोष्टींमुळे फोनची मेमरी लवकर भरते. तसेच युजर्सना ही नको असलेले फोटो डिलीट करावे लागतात. व्हॉट्सअ‍ॅपवर आपोआप सेव्ह होणारे हे व्हिडीओ आणि फोटो अनेकदा युजर्सना नको असतात. मात्र या समस्येने ग्रस्त असलेल्या युजर्ससाठी आता एक खूशखबर आहे. स्मार्टफोनमध्ये फक्त एक सेटींग बदलून या समस्येपासून त्यांची सुटका होणार आहे. यामुळे आपोआप फोटो अथवा व्हिडीओ फोनमध्ये सेव्ह होणार नाहीत. अँड्रॉईड स्मार्टफोन आणि आयफोनमध्ये सेटींग बदलून असे करता येणार आहे. 

 


Web Title: how to know whether you are blocked on whatsapp or not
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.