प्ले स्टोरवरून डाउनलोड करता येत नाही का नवीन PUBG? मग BGMI डाउनलोड करण्यासाठी वापरा हि सोप्पी ट्रिक
By सिद्धेश जाधव | Updated: June 17, 2021 19:43 IST2021-06-17T19:42:13+5:302021-06-17T19:43:48+5:30
How to download BGMI: गुगल प्ले स्टोरवर बीटा व्हर्जन डाउनलोड करता येत नाही परंतु टॅप टॅप अॅप स्टोरवरून तुम्ही हा गेम डाउनलोड करू शकता आणि खेळू शकता.

बॅटलग्रॉउंड मोबाईल इंडिया टॅप टॅप अॅप स्टोरवर उपलब्ध आहे.
अनेक महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर PUBG मोबाईलचा भारतीय अवतार भारतात दाखल झाला आहे. Battlegrounds Mobile India (BGMI) चे बीटा व्हर्जन प्ले स्टोरवर आज उपलब्ध झाला आहे. तुम्ही अधिकृत पेजवरून BGMI डाउनलोड करू शकता. परंतु, या अधिकृत पेजवर अनेक समस्या आहेत. जेव्हा अर्ली अॅक्सेसची सुरुवात झाली तेव्हा सर्वरवर लोड वाढल्यामुळे ‘500 Error’ किंवा ‘Internal Server Error’ असे एरर मेसेज येत होते. त्यानंतर बीटा टेस्टर्सची मर्यादा पूर्ण झाल्यामुळे बीटा व्हर्जन डाउनलोड करता येत नाही. (How to install PUBG India aka BGMI APK and obb)
परंतु काळजी करू नका, बॅटलग्रॉउंड मोबाईल इंडिया टॅप टॅप अॅप स्टोरवर उपलब्ध आहे. या लेखात आपण BGMI Tap Tap अॅपवरून कसा डाउनलोड करायचा हे बघणार आहोत. तुम्हाला कोणतीही अतिरिक्त ओबीबी फाईल देखील डाउनलोड करावी लागणार नाही. तुम्ही फक्त पुढील स्टेप्स फोल्लो करा.
BGMI टॅप टॅप वरून कसा डाउनलोड करायचा ?
- सर्वप्रथम या लिंक वर जा
हि टॅप टॅप वरील BGMI ची अधिकृत लिंक आहे.
- तिथे असलेल्या डाउनलोड बटनवर क्लीक करा
BGMI च्या पेजवरील डाउनलोड बटन वर क्लिक करा. जर तुमच्या फोनमध्ये टॅप टॅप अॅप इन्स्टॉल केलेले असेल तर बॅटल ग्राऊंड मोबाईल डाउनलोड होण्यास सुरुवात होईल.
जर हे अॅप स्टोर तुमच्या फोनमध्ये नसेल तर पुढील स्टेप्स फोल्लो करा.
- ‘Download Tap Tap apk’ बटनवर क्लीक करा
आता तुमच्या फोनमध्ये टॅप टॅप डाउनलोड होण्यास सुरुवात होईल. टॅप टॅप डाउनलोड झाल्यावर इन्स्टॉल करा आणि वरील स्टेपपासून सुरुवात करा.
गेम आपोआप इन्स्टॉल होऊ द्या. गेम इन्स्टॉल झाल्यावर तुमच्या सोयीनुसार पर्याय निवडा आणि लॉगिन करा. सुरुवातीला काही एरर येऊ शकतात परंतु काही वेळाने लॉगिन केल्यास तुम्ही गेमचा आस्वाद सहज घेऊ शकता.