शहरं
Join us  
Trending Stories
1
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
2
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
3
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
4
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
5
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
6
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
7
अभिमानास्पद! वडील हवाई दलात अधिकारी, लेक झाली लेफ्टनंट; इंजिनिअरिंगनंतर देशसेवेचं स्वप्न
8
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
9
Video: उंटाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
10
Javelin Throw Final : भारताचा गोल्डन बॉय नीरज अन् पाक ऑलिम्पिक चॅम्पियन नदीमवर भारी पडला सचिन; पण...
11
यंदा रावण नाही, सोनम रघुवंशीचा पुतळा जाळणार! इंदूरच्या नागरिकांचा वेगळाच दसरा प्लॅन; राजाच्या कुटुंबालाही आमंत्रण
12
राहुल गांधींच्या हायड्रोजन बॉम्बपूर्वी चंद्रपूरच्या 'राजुरा' मतदारसंघात खळबळ ! निवडणूक आयोगावर मत वगळण्याचे गंभीर आरोप
13
घटस्फोटाचे प्रमाण कमी करण्यासाठी राज्यात दहा ठिकाणी सुरु होणार प्री-मॅरेज काउन्सिलिंग सेंटर
14
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
15
सात दिवस अविरत उपसले कष्ट, तेव्हा हाती लागली मौल्यवान रत्नं, मजूर महिलेचं नशीब उजळलं 
16
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
17
लग्न कधी करणार? श्रिया पिळगावकरला थेट प्रश्न; म्हणाली, "माझे आईबाबा सांगतात की..."
18
अंगणवाडी सेविकांना मिळणार स्मार्टफोन, वाढणार मानधन; योगी आदित्यनाथ यांची मोठी घोषणा
19
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
20
सुनेला वाचवण्यासाठी धावली सासू, पण तेवढ्यात धडाधड कोसळली भिंत, सून वाचली पण...  

नवीन फोनवर जुने WhatsApp मेसेज कसे मिळवायचे? अशाप्रकारे गुगल ड्राईव्हवर करा चॅट बॅकअप 

By सिद्धेश जाधव | Updated: September 8, 2021 19:28 IST

जर तुम्हाला एखाद्या नवीन डिवाइसवर जुने व्हॉट्सअ‍ॅप मेसेजेस हवे असतील तर तुम्ही जुन्या फोनवर व्हॉट्सअ‍ॅप चॅटचा बॅकअप गुगल ड्राईव्हमध्ये घेऊन तो नव्या फोनवर रिस्टोर करू शकता.  

WhatsApp युजर्स बऱ्याचदा नवीन फोन विकत घेतात किंवा जुन्या फोनमधील अ‍ॅप अनइन्स्टॉल करून पुन्हा इन्स्टॉल करतात. अश्यावेळी व्हॉट्सअ‍ॅपवर पुन्हा लॉगिन केल्यावर त्यांचे सर्व मेसेजेस गायब झालेले असतात. असे होऊ नये म्हणून व्हॉट्सअ‍ॅपवर चॅट बॅकअप आणि रिस्टोरचा पर्याय देण्यात आला आहे. यातील गुगल ड्राईव्हवर चॅट बॅकअप घेणे आणि तो रिस्टोर कसा करायचा याची माहिती आपण घेणार आहोत.  

व्हॉट्सअ‍ॅपचे बॅकअप आणि रिस्टोर चॅट फिचर अनेकांना परिचयाचे असेल. ज्यांना या फिचरची माहिती नाही त्यांच्यासाठी हा लेख आहे. गुगल ड्राईव्हवर बॅकअप चॅट बॅकअप करण्यासाठी तुमच्या फोनमध्ये गुगल अकॉउंट अ‍ॅक्टिव्ह असणे आवश्यक आहे, ज्या फोनमध्ये तुम्ही व्हॉट्सअ‍ॅप वापरत आहात. तसेच नवीन फोन किंवा अ‍ॅपमध्ये चॅट रिस्टोर करण्यासाठी तुम्ही चॅट बॅकअप घेणे आवश्यक आहे.  

व्हॉट्सअ‍ॅप चॅटचा गुगल ड्राईव्ह बॅकअप कसा घ्यायचा?   

  • सर्वप्रथम तुमच्या Android स्मार्टफोनवर व्हॉट्सअ‍ॅप ओपन करा. 
  • त्यांनतर उजवीकडे वरच्या बाजूला असलेल्या तीन डॉट्सवर क्लिक करा. 
  • आता सेटिंग ऑप्शनची निवड करा. 
  • त्यानंतर चॅटवर क्लिक करून चॅट बॅकअपवर जा. इथे तुम्हाला गुगल ड्राईव्ह सेटिंगचा ऑप्शन मिळेल. 
  • इथे बॅकअप टू गुगल ड्राईव्हचा ऑप्शन असेल. त्यात नेव्हर व्यतिरिक्त इतर कोणताही पर्याय निवडा. 
  • त्याखाली गुगल अकॉउंटचा ऑप्शन असेल. त्यावर क्लिक करा आणि अकॉउंट निवडा करा. 
  • आता बॅकअप ओव्हरवर क्लिक करून समोर आलेल्या ऑप्शनपैकी एकाची निवड करा.  
  • तुमच्या चॅटचा बॅकअप गुगल ड्राईव्हमध्ये होईल. 

व्हॉट्सअ‍ॅप चॅट बॅकअप रिस्टोर कसा करायचा? 

  • नवीन फोनमध्ये किंवा जुन्या फोनयामध्ये नव्याने व्हॉट्सअ‍ॅप इन्स्टॉल केल्यावर तुमच्या मोबाईल नंबरने लॉगिन करा. 
  • नंबर व्हेरिफाय करताच तुमच्या समोर रिस्टोरचा ऑप्शन येईल. 
  • त्यात रिस्टोरसाठी दिलेल्या बटणवर क्लिक करा. 
  • प्रोसेसर पूर्ण झाल्यावर नेक्स्टवर क्लिक करा. 
  • आता तुमचे जुने मेसेजेस तुमच्या व्हॉट्सअ‍ॅप अकॉउंटमध्ये दिसू लागतील. 
टॅग्स :WhatsAppव्हॉट्सअ‍ॅपSmartphoneस्मार्टफोनAndroidअँड्रॉईडgoogleगुगल