अरे वाह! गाणी ऐकताना देखील बोला लोकांशी; ट्रान्सपरंट मोडसह आले Honor Earbuds 2 SE
By सिद्धेश जाधव | Updated: June 18, 2021 14:08 IST2021-06-18T14:07:09+5:302021-06-18T14:08:56+5:30
Honor Earbuds 2 SE: Honor Earbuds 2 SE फक्त दहा मिनिटांत 40% चार्ज होऊ शकतात आणि केससह 32 तासांचा बॅटरी बॅकअप देतात.

Honor Earbuds 2 SE
ऑनरने काल चीनमध्ये आपली फ्लॅगशिप स्मार्टफोन सीरिज लाँच केली आहे. Honor 50 नावाच्या सीरिजमध्ये कंपनीने तीन स्मार्टफोन लाँच केले आहेत. Honor 50, Honor 50 Pro आणि Honor 50 SE या तीन स्मार्टफोन्ससोबत कंपनीने वायरलेस एयरबड्स देखील लाँच केले आहेत. Earbuds 2 SE ऑनलाईन इव्हेंटच्या माध्यमातून लाँच करण्यात आले आहेत. (Honor earbuds 2 se launched in china with transparent mode)
या वायरलेस एयरबड्सची किंमत 469 युआन ठेवण्यात आली आहे, भारतीय चलनात हि किंमत अंदाजे 5,400 रुपये इतकी होते. हे बड्स हलके आणि कॉम्पॅक्ट आहेत. अर्गोनॉमीकली डिजाईन करण्यात आलेले हे एयरबड्स मिडनाईट ब्लॅक आणि आईस व्हाईट अश्या रंगात उपलब्ध होतील. 25 जूनपासून Earbuds 2 SE चीनमध्ये खरेदीसाठी उपलब्ध होतील.
Honor Earbuds 2 SE मध्ये नॉइज रिडक्शन टेकनॉलॉजी देण्यात आली आहे, हि टेक्नॉलॉजी आजूबाजूचा आवाज कमी करते. तसेच यात एक ट्रान्सपरंट मोड देण्यात आला आहे, जो गाणी ऐकत असताना देखील तुम्हाला माणसांशी बोलण्याची मुभा देतो. म्हणजे तुम्ही तुमचे म्युजिक न थांबवता लोकांशी संवाद साधू शकता, तसेच तुम्हाला आजूबाजूच्या आवाजांची जाणीव देखील राहील.
या ट्रू वायरलेस एयरबड्समध्ये गेमर्ससाठी लो लेटन्सी मोड देखील देण्यात आला आहे. डिवाइसमध्ये ड्युअल मायक्रोफोन AI नॉइज रिडक्शन फीचर्ससह देण्यात आले आहेत. AI नॉइज रिडक्शन आजूबाजूच्या आवाजांमधून माणसांचा आवाज वेगळा करू शकतो.
चार्जिंग केससह हे एयरबड्स 32 तासांचा बॅटरी बॅकअप देऊ शकतात. तसेच, फास्ट चार्जिंग सपोर्ट असल्यामुळे हे बड्स फक्त दहा मिनिटांत 40% चार्ज होऊ शकतात.