शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

इंटरनेट असुरक्षिततेमुळे जागतिक स्तरावर वाढले हॅकिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2020 06:03 IST

गुगल इंडियाचे निरीक्षण; ‘पहले सेफ्टी, फिर इंटरनेट’ अभियानाद्वारे सुरक्षेबाबत करणार साक्षर

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : इंटरनेट असुरक्षिततेमुळे जगभरात हॅकिंगमध्ये वाढ झाल्याचे निरीक्षण गुगल इंडिया ट्रस्ट अ‍ॅण्ड सेफ्टी विभागाचे संचालक सैकत मित्रा यांनी सांगितले. मागील काही वर्षांत इंटरनेटची उपलब्धता झपाट्याने वाढली आहे; मात्र इंटरनेट साक्षरता नसल्यामुळे हॅकिंगचे प्रमाण वाढल्याचेही सैकत यांनी नमूद केले. या पार्श्वभूमीवर ‘सेफर इंटरनेट डे’च्या निमित्ताने गुगल इंडियाच्या वतीने ‘पहले सेफ्टी’ अभियानाच्या माध्यमातून नेटीझन्सना इंटरनेट सुरक्षेविषयी साक्षर करण्यात येणार आहे.

गुगल इंडियाचे सैकत मित्रा यांनी सांगितले, आजच्या काळात इंटरनेट साक्षरता खूप महत्त्वाची आहे. सध्या आॅनलाइन पेमेंट, आॅनलाइन बँकिंग खूप सहज हाताळले जाते; मात्र त्यामागील सुरक्षितता पडताळली जात नाही. या कारणामुळे सहज हॅकिंग, पैशांची फसवणूक केली जाते. हे गैरप्रकार टाळण्यासाठी गुगलने खास अभियान हाती घेतले असून डेटा सिक्युरिटी काऊन्सिल आॅफ इंडियाच्या संयुक्त विद्यमाने काम करणार आहे.

याशिवाय, काही खासगी संस्था आणि कंपन्यांसोबतही या अभियानाच्या माध्यमातून युझर्सना ुंइंटरनेट सुरक्षेसंदर्भात मार्गदर्शन करण्यात येईल.हॅकिंग व फसवणुकीचा धोका ओळखून गुगलने स्वत: पुढाकार घेऊन इंटरनेटवरून काही साइट्स ब्लॉक करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे अशी चुकीची किंवा खोटी संकेतस्थळे, अ‍ॅप्स गुगलवर थेट सुरूच होणार नाहीत याची काळजी आम्ही घेत आहोत, असे मित्रा यांनी सांगितले. तर डेटा सिक्युरिटी काउन्सिल आॅफ इंडियाच्या अमित घोष यांनी सांगितले, डिजिटल पेमेंट अभियान सात भाषांमध्ये राबविण्यात येणार आहे. त्यामुळे देशाच्या खेड्यापाड्यांत जिथे इंटरनेट उपलब्धता वेगाने वाढतेय, तिथे साक्षरताही वाढावी असा प्रयत्न आहे.पासवर्ड स्ट्राँग करणे गरजेचेइंटरनेट साक्षरतेसाठी अगदी सोशल मीडियाच्या अकाउंट पासवर्डपासून ते अगदी आॅनलाइन पेमेंटसाठी वापरण्यात येणारे पासवर्ड स्ट्राँग करण्याचा सल्ला गुगल इंडियाच्या तज्ज्ञांनी दिला. शिवाय, फोन्समध्ये सेव्ह करण्यात येणारे इमर्जन्सी संपर्कही ‘आॅनर इर्न्फोमेशन’ या विभागात फीड केल्यास त्याचा आपत्कालीन परिस्थितीत वापर होऊ शकतो, असे ते म्हणाले. आपल्या सर्व सोशल मीडियाचे स्रं२२६ङ्म१.िॅङ्मङ्मॅ’ी.ूङ्मे या संकेतस्थळावर पडताळूनही पाहता येतील. तसेच सोशल मीडियावर बऱ्याच वर्षांपासून असणारे पासवर्ड काही वर्र्षांनंतर बदलावेत; त्यामुळे इंटरनेटची असुरक्षितता टाळण्यास मदत होईल, असे त्यांनी सांगितले.

टॅग्स :googleगुगलInternetइंटरनेट