शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
2
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
3
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
4
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
5
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
6
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
7
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
8
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
9
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
10
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
11
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
12
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
13
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
14
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
15
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
16
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
17
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
18
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
19
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
20
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के

Xiaomi-Redmi च्या Smart TV वर जबरदस्त सूट; ७२ हजारांनी स्वस्त झाला सर्वात प्रीमिअम टीव्ही

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2021 19:38 IST

Xiaomi-Redmi Smart TV : जर तुम्ही LED SMART TV घेण्याच्या विचारात असाल तर Xiaomi नं आणलीये एक भन्नाट ऑफर. कंपनीकडून देण्यात येत आहे मोठी सूट.

ठळक मुद्देजर तुम्ही LED SMART TV घेण्याच्या विचारात असाल तर Xiaomi नं आणलीये एक भन्नाट ऑफर. कंपनीकडून देण्यात येत आहे मोठी सूट.

जर तुम्ही LED SMART TV घेण्याच्या विचारात असाल तर Xiaomi नं एक भन्नाट ऑफर आणली आहे. कंपनीच्या वेबसाईटवर शाओमी आणि रेडमीच्या स्मार्ट टीव्हीवर कंपनीकडून 12 हजार रूपयांपर्यंतची सूट देण्यात येत आहे. इतकंच नाही तर कंपनीनं आपल्या 75 इंचाच्या QLED TV वर 72 हजार रूपयांचा डिस्काऊंट ऑफर करत आहे. इतकंच नाही, जर तुम्ही HDFC ची बँकेच्या क्रेडिट कार्डाचा वापर करून खरेदी करेली तर तुम्हाला 7500 रूपयांचा इन्स्टंट डिस्काऊंटही देण्यात येणार आहे. 

Mi TV 4X 43 इंच कंपनीच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार या टीव्हीवर ग्राहकांना 5 हजार रूपयांची सूट देण्यात येत आहे. यानंतर या टीव्हीची किंमत 34,999 रूपयांवरून कमी होऊन 29,999 रूपये इतकी झाली आहेय या टीव्हीमध्ये 4K HDR डिस्प्ले देण्यात आला असून 20 वॉटचे स्पीकरही मिळतात. हे स्पीकर्स डॉल्बी आणि DTS HD साऊंड सोबत येतात. 

Redmi Smart TV X65 (65 इंच)Redmi Smart TV X65 या टीव्हीची किंमत 74,999 रूपये इतकी आहे. हा टीव्हीवर शाओमीच्या ऑफिशिअल वेबसाईटनुसार 12 हजार रूपयांची सूट देण्यात येत आहे. यानंतर या टीव्हीची किंमत 62,999 रूपये इतकी आहे. अँड्रॉईड टीव्ही 10 वर चालणाऱ्या या स्मार्ट टीव्हीमध्ये डॉल्बी व्हिजनसह 4K HDR डिस्ल्पे देण्यात आला आहे. दमदार साऊंडसाठी या टीव्हीमध्ये 30 वॉट डॉल्बी ऑडियो सपोर्ट देण्यात आला आहे. 

Mi LED TV 4C (32 इंच)Mi LED TV 4C 32 इंचाचा टीव्ही तुम्हाला ऑफरअंतर्गत 19,999 रूपयांऐवजी 16,999 रूपायांना खरेदी करता येणार आहे. उत्तम क्वालिटीसाठी यामध्ये कंपनीनं विविड पिक्चर इंजिन दिलं आहे. दमदार साऊंडसाठी यात 20 वॉटचे स्पीकरही देण्यात आले आहेत. हे स्पीकर्स DTS-HD सपोर्टसह येतात. टीव्हीत मिळणाऱ्या डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 60Hz इतका आहे. 

Redmi Smart TV X50 (50 इंच) या टीव्हीवर कंपनीकडून ६ हजार रूपयांचा डिस्काऊंट देण्यात येत आहे. यानंतर या टीव्हीची किंमत 38,999 रूपये इतकी झाली आहे. हा टीव्ही डॉल्बी ऑडिओ, डीटीएस व्हर्च्युअल X, विविड पिक्चर इंजिनसह येतो. या टीव्हीची खास बाब म्हणजे, यामध्ये डॉल्बी व्हिजनसह 4k HDR सपोर्ट मिळतो.

Mi QLED TV (75 इंच)शाओमीचा हा प्रीमिअम टीव्ही ७२ हजार रूपयांच्या डिस्काऊंटसह खरेदी केला जाऊ शकतो. या टीव्हीची किंमत 1,99,999 रूपये इतकी आहे. परंतु डिस्काऊंटनंतर या टीव्हीची किंमत 1,27,999 रूपये इतकी झाली आहे. यामध्ये कंपनीनं 4K QLED डिस्प्ले दिला आहे. तसंच तो 120HZ रिफ्रेश रेटसह येतो. दमदार साऊंडसाठी यामध्ये 30 वॉटची डॉल्बी ऑडिओ सिस्टमही देण्यात आली आहे.

टॅग्स :xiaomiशाओमीTelevisionटेलिव्हिजनAndroidअँड्रॉईडonlineऑनलाइन