शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

Google चं 'हे' App 24 फेब्रुवारीपासून होणार बंद; जाणून घ्या, कसा ट्रान्सफर करायचा डेटा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2021 15:49 IST

Google App : अँड्रॉईड स्मार्टफोन युजर्स याचा सर्वाधिक वापर करत असून 24 फेब्रुवारीपासून हे अ‍ॅप आता बंद होणार आहे.

नवी दिल्ली - स्मार्टफोनचा वापर हा मोठ्या प्रमाणात केला जातो. गुगल प्ले म्यूझिक अ‍ॅप (Google Play Music) चा वापर करणाऱ्या युजर्ससाठी आता एक बॅड न्यूज आहे. अँड्रॉईड स्मार्टफोन युजर्स याचा सर्वाधिक वापर करत असून 24 फेब्रुवारीपासून हे अ‍ॅप आता बंद होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गुगल आपल्या प्ले म्यूझिक (Google Play Music) अ‍ॅपला यूट्यूब म्यूझिक (YouTube Music) अ‍ॅपवरून रिप्लेस करत आहे. कंपनीने गेल्या वर्षी यासंबंधीची घोषणा केली होती. गेल्या 8 वर्षांपासून हे अ‍ॅप सुरू होतं.

अँड्रॉयड़ युजर्संना हे अ‍ॅप उघडल्यानंतर कंपनीकडून शटडाऊनचा मेसेज मिळत आहे. मेसेजमध्ये युजर्संना 24 फेब्रुवारी 2021 पासून तुमचा सर्व डेटा रिमूव्ह करण्यात येणार आहे  असं म्हटलं आहे. तसेच यात म्यूझिक लायब्ररी, सर्व अपलोड्स, पर्चेजेज किंवा काही गुगल प्ले म्यूझिक अ‍ॅप या सर्वांचा समावेश आहे. या दिवसांनंतर याला रिकव्हर करण्याची कोणतीही सोय करण्यात आलेली नाही. युजर्संना मेसेजमध्ये म्यूझिक रिप्लेस करण्याचा पर्याय सुद्धा मिळत आहे.

गुगलने काही वेळेआधी यूट्यूब म्यूझिक (YouTube Music) लॉन्च केले होते. त्यानंतर कंपनी प्ले म्यूझिक (Google Play Music) बंद करणार आहे, अशी माहिती मिळत होती. गुगलने आपल्या एका ब्लॉग पोस्टमध्ये प्ले म्यूझिकला युट्यूब म्यूझिक रिप्लेस करणार आहे. याचाच अर्थ युजर्स प्ले म्यूझिकवर कोणतेही गाणे आता वाजू शकणार आहे. कंपनीने गुगल प्ले म्यूझिक प्ले अ‍ॅपला २०११ मध्ये लाँच केले होते.

गुगल प्ले म्यूझिकवरून यूट्यूब मध्ये ट्रॅक्सला मायग्रेट करू शकता. अ‍ॅप ओपन केल्यानंतर Google Play Music No longer Available अशा शब्दात मेसेज येत आहे. या ठिकाणी गूगल प्ले म्यूझिकच्या कंटेंटला यूट्यूब म्यूझिक मध्ये ट्रान्सफ़र करू शकता. तसेच तुम्ही रिकमंडेशन हिस्ट्री डिलीट करू शकता. देशात डिजिटल पेमेंट युजर्स वाढत आहे. देशातील मोठ्या टेक्नोलॉजी कंपन्या सुद्धा डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन देत आहे. मात्र आता देशातील एका डिजिटल पेमेंट अ‍ॅपने भारतातील आपली सर्व्हिस बंद करण्याची घोषणा केली आहे. तुम्ही जर या अ‍ॅपचा वापर करत असाल तर लवकर आपले पैसे यातून काढून घ्या आणि आपलं अकाऊंट डिअ‍ॅक्टिव्ह करा. 

अलर्ट! 'हे' पेमेंट अ‍ॅप होतंय बंद, लवकरच तुमचे पैसे काढून घ्या अन् अकाऊंट करा बंद 

मीडिया सोर्सने दिलेल्या माहितीनुसार, PayPal हे डिजिटल पेमेंट अ‍ॅप देशातून बंद करण्यात येणार आहे. आता या अ‍ॅपची सेवा 1 एप्रिलपासून बंद करण्याची घोषणा करण्यात येणार आहे. मात्र आंतरराष्ट्रीय पेमेंटसाठी PayPal चा वापर सुरू राहणार आहे. जर तुम्ही पे पलचा वापर करत असाल तर आपल्या अकाऊंटला डिअ‍ॅक्टिव्ह करू शकता. जर आपण अकाऊंट डिअ‍ॅक्टिव्ह करू इच्छित असाल तर तुम्हाला ही प्रोसेस फॉलो करावी लागणार आहे. 

- सर्वात आधी PayPal च्या वेबसाईटवर जा. त्यानंतर सेटिंगमध्ये जा. 

- सेटिंगमध्ये गेल्यानंतर अकाऊंट ऑप्शनमध्ये जा. यानंतर आपल्या बँकच्या अकाउंट नंबर टाका. 

- नवीन पेजवर जाऊन क्लोज अकाऊंटवर क्लिक करा. 

- जर तुमचे अकाउंट अशाप्रकारे बंद होणार नसेल तर तुम्ही ईमेल वरूनही या अकाऊंट बंद करू शकता.

टॅग्स :googleगुगलtechnologyतंत्रज्ञानMobileमोबाइलSmartphoneस्मार्टफोन