आजूबाजूचा आवाज बंद करून ऐकता येणार गाणी; Google नं सादर केले Pixel Buds Pro
By सिद्धेश जाधव | Updated: May 12, 2022 13:25 IST2022-05-12T13:24:45+5:302022-05-12T13:25:15+5:30
Google Pixel Buds Pro मोठ्या बॅटरी बॅकअपसह ANC फीचरला सपोर्ट करतात.

आजूबाजूचा आवाज बंद करून ऐकता येणार गाणी; Google नं सादर केले Pixel Buds Pro
Google चे प्रोडक्ट्स ज्या लोकांना आवडतात त्यांच्यासाठी काल सुरु झालेला Google I/O 2022 इव्हेंट खूप खास ठरला आहे. कंपनीनं सर्वात स्वस्त स्मार्टफोन Google Pixel 6A सादर केला आहे. त्याचबरोबर Google Pixel Buds Pro देखील लाँच करण्यात आले आहेत. या इव्हेंटमधून Google Pixel Watch आणि Google Pixel Tablet वरून पडदा उठवण्यात आला आहे. Pixel 7 आणि Pixel 7 Pro स्मार्टफोनची झलक देखील बघायला मिळाली आहे.
स्पेसिफिकेशन
Pixel Buds Pro ची सॉफ्ट मॅट फिनिश आणि ट्रू-टोन डिजाईनसह सादर करण्यात आले आहेत. पाऊसाचा हलक्या सरी आणि जॉगिंग करताना येणारा घाम, यांच्यापासून देखील हे बड्स वाचतील. यासाठी गुगलनं IPX4 वॉटर रेजिस्टन्स दिला आहे. चार्जिंग केस देखील IPX2 वॉटर रेजिस्टन्ससह येतो.
Active Noise Cancellation (ANC) फीचर देण्यात आलं आहे, जे आजूबाजूचा आवाज बंद करतं. गुगलच्या इयरबड्स चांगल्या साउंड क्वॉलिटी आणि अनेक तासांच्या बॅटरी बॅकअपसह बाजारात आले आहेत. यात Google Voice Assistance सपोर्ट मिळतो. त्यामुळे फक्त आवाजाने तुम्ही अनेक फंक्शन्सचा वापर करू शकता.
मल्टीपॉइंट कनेक्टिव्हिटीसह बड्स प्रोशी जोडण्यात आलेल्या ब्लूटूथ डिवाइसेसमध्ये सहज स्विच करू शकता. Pixel Buds Pro वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करतात. ANC फिचरसह गाणी ऐकल्यावर देखील हे बड्स 11 तासांचा प्लेबॅक टाइम देतात.
Google Buds Pro Price
कंपनीनं Google Pixel Buds Pro ची किंमत 199 डॉलर ठेवली आहे. ही किंमत जवळपास 15000 रुपयांमध्ये रूपांतरित होते. येत्या 21 जुलैपासून हे बड्स प्री-ऑर्डर करता येतील. तुम्ही यांची खरेदी Coral, Lemongrass, Fog आणि Charcoal या चार रंगांत करू शकता.